AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांधावर केली लागवड, सेंद्रिय पद्धत असल्यामुळे बाजारात मागणी वाढली, ग्राहक म्हणतात…

महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांनी विविध ठिकाणचं मार्गदर्शन घेऊन चांगली शेती केली आहे. शेवग्याची लागवड सेंद्रिय पद्धतीने केल्यामुळे त्याचा भाव अधिक वाढला आहे.

बांधावर केली लागवड, सेंद्रिय पद्धत असल्यामुळे बाजारात मागणी वाढली, ग्राहक म्हणतात...
Cultivation of fenugreekImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 08, 2023 | 12:11 PM
Share

विनय जगताप, पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर (pune bhor) तालुक्यातील वेळू गावाचे प्रयोगशील शेतकरी गुलाब महादेव घुले (farmer gulab ghule) यांची सध्या सगळीकडं चर्चा सुरु आहे. त्यांनी दोन एकर शेताच्या बांधावरती शेवग्याची लागवड केली होती. त्या झाडांना आता चांगल्या शेंगा आल्या आहेत. त्याची विक्री सुध्दा अधिक प्रमाणात होत असल्यामुळे शेतकरी गुलाब महादेव घुले यांना त्याचा फायदा होत आहे. ओडिसी शेवगा (Cultivation of fenugreek) असा प्रकार आहे. विशेष म्हणजे त्यांनी लागवड केलेल्या झाडाला साडेचार फूट लांबीच्या शेवग्याच्या शेंगा लावण्यात आल्या आहेत. सध्या ती शेती सगळ्यांसाठी आकर्षणाचं केंद्र झालं आहे.

महाराष्ट्रात अनेक शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करीत आहेत. त्यासाठी काही शेतकऱ्यांनी बाहेर जाऊन मार्गदर्शन घेतलं आहे. तर काही शेतकऱ्यांनी युट्यूबच्या माध्यमातून शेतीचा प्रकार शिकून घेतला आहे. कांदा, केळी, आंबा, ऊस या प्रकारची अनेक पीकं शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं घेतली आहेत.

पुण्याच्या भोर तालुक्यातील वेळू गावाचे प्रयोगशील शेतकरी गुलाब महादेव घुले यांनी, ओडिसी शेवग्याच्या शेंगाच्या वाण लावून शेवग्याचं भरघोस उत्पादन घेतलं आहे. 2 एकर क्षेत्रावरील शेतीच्या बांधावर शेवग्याची 70 झाडं लावत सेंद्रिय पद्धतीने शेती केली. झाडाला आलेल्या साडेचार फुट लांबीच्या शेवग्याच्या शेंगा लांबीमुळे ग्राहकांसाठी विशेष आकर्षणाचं केंद्र झालंय. चवीला स्वादिष्ट, लांबीला उंच, पातळ साल, हिरवा रंग असणाऱ्या ह्या शेंगेला बाजारात चांगला भाव मिळत आहे.

टोमॅटोला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मागच्या महिन्यात प्रचंड नुकसान झाले होते. सध्या बाजारात टोमॅटोला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत. इतर भाज्यांचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. नंदुरबार बाजार समितीमध्ये टोमॅटो १२० रुपयांनी विक्री केली जात आहे. हिरवी मिरची देखील १२० किलोने विक्री केली जात आहे. मेथी १२० ते १५०, कोथांबिर १२०, कोबी फ्लॉवर ६० ते ८०, गवार ४० ते ६०, भेंडी ६०, वांगे ३० ते ४०, शेवगा शेंग ८० ते 120, भाजीपाल्याचे अचानक भाव वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.