आस्मानी संकट त्यात चोरट्यांचा धुमाकूळ, हताश 65 वर्षीय शेतकऱ्याची कहाणीच निराळी

संकट आली की ती चोहीबाजूने येतात म्हणूनच 5 एकरातील बागच काढून टाकली, हे बोल आहेत यवतमाळ जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील 65 वर्षीय शेतकऱ्याचे. शेतकरी परस्थितीसमोर हताश झाला की काय करु शकतो याचे वास्तव चित्र या शेतकऱ्याच्या नैराश्यातून समोर येतंय...

आस्मानी संकट त्यात चोरट्यांचा धुमाकूळ, हताश 65 वर्षीय शेतकऱ्याची कहाणीच निराळी
संग्रबीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 30, 2021 | 5:06 PM

यवतमाळ : आख्खं आयुष्य शेतामध्ये घातलं पण कधी एवढे वाईट दिवस पाहयला मिळाले नाहीत. (Yavatmal)बहरात असलेल्या ( orange orchards) संत्री बागेचं पावसामुळं न भरुन निघणारं नुकसान झालंय त्यात वय अधिकचं असल्याने बाग जोपासताना अनंत अडचणी येत होत्या हे कमी म्हणून की काय यंदा तर (theft of fruits) बागेतील संत्र्याचीही चोरी होऊ लागली होती. संकट आली की ती चोहीबाजूने येतात म्हणूनच 5 एकरातील बागच काढून टाकली, हे बोल आहेत यवतमाळ जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील 65 वर्षीय शेतकऱ्याचे. शेतकरी परस्थितीसमोर हताश झाला की काय करु शकतो याचे वास्तव चित्र या शेतकऱ्याच्या नैराश्यातून समोर येतंय…

यवतमाळ जिल्ह्यात फळबागायत क्षेत्र अधिकचे आहे. काळाच्या ओघाच या क्षेत्रमाध्ये वाढ होत असताना आपणच कशाला मागे राहयचे म्हणून 65 वर्षीय रघुनाथ मेश्राम यांनीही भाजीपाल्याच्या जोडीला 5 एकरावर संत्री बाग लावली होती. भाजीपाल्यावर कुटूंबाचा उदरनिर्वाह आणि बागेतून चार पैशाचे उत्पादन असा त्यांचा हिशोब होता. पण वयोवृध्द शेतकऱ्यांचे कष्ट आणि पैसा या दोन्हीही बाबी फोल ठरल्या आहेत. बाग ऐन बहरात असतानाच पावसाने धुमाकूळ घातला आणि पीक पोसायच्या आतच फळगळती झाली. सर्वकाही होत्याचे नव्हते झाले होते. हे कमी म्हणून की काय झाडाला असलेल्या संत्र्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. त्यामुळे हताश रघुनाथ यांनी थेट फळबागेवरच आरी चालवली आहे. तब्बल 5 एकरात तळहातावरील फोडाप्रमाणे जोपासलेली बागेवर आरी चालवताना रघुनाथ मेश्राम यांना अश्रू अनावर झाले होते.

पावसाने फळबागेचे नुकसान

पावसाने झालेल्या नुकसानीच्या खुना आता प्रकर्षाने जाणवू लागल्या आहेत. प्रमाणापेक्षा अधिक पाऊस झाल्याने रघुनाथ मेश्राम यांच्या संत्र्याची फळगळती मोठ्या प्रमाणात झाली होती. उमरी तालुक्यात मोठ्या संत्रा लागवड मोठ्या प्रमाणात आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी बागेची जोपासना केली मात्र, रघुनाथ यांना वाढत्या वयामुळे शक्य झाले नाही. 5 एकरातील बागेचे नुकसान झालेले आहे. बागक्षेत्रात संत्र्याचा अक्षरश: सडा झाल्याचे हताश रघुनाथ यांनी सांगितले आहे.

चोरट्यांचा डल्ला अन् हताश शेतकरी

पावसाचे संकट कमी म्हणून की काय, पुन्हा संत्र्याची चोरीचे प्रमाण वाढले होत. दरवर्षी फळबागा बहरात असल्या की या भागात चोरी हे ठरलेलेच आहे. त्यामुळे शेतकरी राखण्यासाठी शेतातच राहतात पण रघुनाथ यांना हे शक्य झाले नाही. पावसाने झालेले नुकसान त्यामध्ये पुन्हा राहिलेल्या फळांची अशाप्रकारे चोरी होत असल्याने या 5 एकरातील बाग मोडून इतर पीक घेण्याचा विचार केला. मात्र, नैसर्गिक आपत्तीबरोबर चोरट्यांच्या धुमाकाळामुळे या परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे.

शासन दरबारीही मिळाला नाही न्याय

पावसाने फळबागेचे नुकसान झाल्यानंतर किमान नुकसानभरपाई मिळावी या आशेने मेश्राम यांनी कृषी कार्यालयात अनेक वेळा खेटेही मारले मात्र, अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. अखेर नुकसानीचे पंचनामे हे झालेच नाहीत. फळबागेची लागवड करुन उत्पादन वाढवण्याचा प्रयत्नात असेलल्या मेश्राम यांच्या नुकसानीला जेवढा जबाबदार निसर्ग आहे त्याहूनही अधिक येथील प्रशासन असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. अखेर रघुनाथ यांना भाजीपाल्यावरच आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्याची नामुष्की ओढावली आहे. (Rain damages orange orchards, thieves dump edifying fruits, farmers remove orchards)

संबंधित बातम्या :

खरीपातील विमा परताव्यानंतर रब्बीच्या पीकविमा योजनेसाठी ‘अशी’ आहे प्रक्रिया

मत्स्यपालनाच्या सर्वोत्तम 5 टीप्स अन् जाणून घ्या सापळा लावण्याचे महत्वही

…यामुळे वाढली लातूरच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक, काय आहेत कारण?

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.