Gondia : पावसाने बदलले खरिपाचे चित्र, कृषी विभागाचा सल्ला वाचा अन् कामाला लागा..!

आतापर्यंत पुरेशी जमिनीत ओल नसल्याने भात रोवणी झाली तरी धोका कायम अशी स्थिती होती. पण आता विदर्भात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. शिवाय गेल्या दोन दिवसांपासून यामध्ये वाढ झाल्याने भात लागवडीसाठी पोषक वातावरण झाले आहे. जमिनीत पुरेशा ओलावा असल्याने हीच पेरणीची योग्य वेळ असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Gondia : पावसाने बदलले खरिपाचे चित्र, कृषी विभागाचा सल्ला वाचा अन् कामाला लागा..!
गोंदिया जिल्ह्यामध्ये भात रोवणीच्या कामाला गती आली आहे.
Image Credit source: TV9 Marathi
शाहिद पठाण

| Edited By: राजेंद्र खराडे

Jul 05, 2022 | 12:33 PM

गोंदिया : पावसाने मनात आणले तर काय होऊ शकते याचा प्रत्यय सबंध महाराष्ट्र घेत आहे. जुलै महिना उजाडेपर्यंत यंदा (Kharif Sowing) खरिपाच्या पेरण्या होतात की नाही अशी स्थिती ओढावली होती. राज्यात केवळ 60 लाख हेक्टरावर पेरण्या झाल्या होत्या. त्यामुळे गतवर्षी अधिकच्या पावसाने नुकसान तर यंदा (Monsoon) पावसाने दडी मारल्याने नुकसान होते की काय अशी स्थिती होती. पण जुलै महिन्यात पाऊस आपले रुपडे बदलेन असा अंदाज (Met Department) हवामान विभागाने वर्तवला होता. अखेर गेल्या दोन दिवसांमध्ये चित्र बदलले आहे. 75 ते 100 मिमी पाऊस जिल्ह्यात झाला असून शेतकऱ्यांनी आता भात लागवड केली तरी हरकत नाही. शिवाय ज्या चारसूत्री कार्यक्रमामुळे उत्पादनात वाढ होणार आहे त्याचाच अवलंब करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

दमदार पावसाने शेतजमिनीत ओलावा

आतापर्यंत पुरेशी जमिनीत ओल नसल्याने भात रोवणी झाली तरी धोका कायम अशी स्थिती होती. पण आता विदर्भात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. शिवाय गेल्या दोन दिवसांपासून यामध्ये वाढ झाल्याने भात लागवडीसाठी पोषक वातावरण झाले आहे. जमिनीत पुरेशा ओलावा असल्याने हीच पेरणीची योग्य वेळ असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. विदर्भात पावसामध्ये सातत्य होते पण दोन दिवसांपासून वाढलेला जोर अधिक फायदेशीर ठरणार आहे. आता भात लागवडीला वेग येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.

रोवण्या आटोपून घ्या अन् उत्पादन वाढवा

आतापर्यंत पावसाअभावी रोवण्या रखडल्या होत्या तर आता मुसळधार पाऊस होण्यापूर्वी ही शेती कामे आटोपून घ्या असे आवाहन कृषी विभागाला करावे लागत आहे. कारण आगामी पाच दिवसांमध्ये विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पावसाने अधिक प्रमाणात हजेरी लावली तर रोवणीची कामेही खोळंबली जातील. आगोदरच रोवणी कामाला उशीर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोवणी कामे उरकून उत्पादन कसे वाढेल यावर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

हे सुद्धा वाचा

पाच दिवस पावसाचेच

कोकण मुंबईसह विदर्भात अधिकचा पाऊस पडेल असा अंदाज आहे. आगामी 5 दिवस विदर्भात पावसाचे सातत्य राहिले तर मात्र, शेती कामे तर खोळंबतीलच पण जिल्ह्यातील 96 गावांना पूराचा विळखा पडेल असे चित्र आहे. त्यामुळे भात रोवण्या झाल्या की या पिकाला कोणताच धोका राहत नाही. मात्र, शेतकऱ्यांनी रोवणीचे टायमिंग साधणे गरजेचे आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें