AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cotton Market : पांढऱ्या सोन्याला ऐतिहासिक ‘झळाळी’, शेतकऱ्यांची रणनिती अन् व्यापाऱ्यांचा फायदा!

खरीप हंगामात कापसाचे उत्पादन घटल्याने यंदा दर तेजीत राहणार हे साहजिकच होते. इथपर्यंत तर शेतकऱ्यांनीही अंदाज बांधून हंगामाच्या सुरवातीपासून कापूस साठवणूकीवर भर दिला होता. मात्र, अपेक्षित दर मिळताच शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने का होईना कापसाची विक्री केली.शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा झाला असला तरी यापेक्षा कित्येक पटीने फायदा हा व्यापाऱ्यांना होताना दिसत आहे.

Cotton Market : पांढऱ्या सोन्याला ऐतिहासिक 'झळाळी', शेतकऱ्यांची रणनिती अन् व्यापाऱ्यांचा फायदा!
अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समितीमध्ये कापसाची झालेली आवकImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Mar 22, 2022 | 9:29 AM
Share

अकोला :  (Kharif Season) खरीप हंगामात कापसाचे उत्पादन घटल्याने यंदा दर तेजीत राहणार हे साहजिकच होते. इथपर्यंत तर शेतकऱ्यांनीही अंदाज बांधून हंगामाच्या सुरवातीपासून (Cotton Stock) कापूस साठवणूकीवर भर दिला होता. मात्र, अपेक्षित दर मिळताच शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने का होईना कापसाची विक्री केली. शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा झाला असला तरी यापेक्षा कित्येक पटीने फायदा हा व्यापाऱ्यांना होताना दिसत आहे. कारण शेतकऱ्यांनी विक्री केल्यानंतर आता (Cotton Rate) कापसाला विक्रमी दर मिळाला आहे. जिल्ह्यातील अकोट बाजार समितीमध्ये जे गेल्या 50 वर्षामध्ये झाले नाही ते यंदा घडले आहे. सोमवारी 11 हजार 845 असा विक्रमी दर मिळाला आहे. शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कापसाची विक्री केली. त्यामुळे वाढत्या दराचा फायदा हा व्यापाऱ्यांनाच होत असल्याचे बोलले जात आहे. वाढीव दर मिळवण्यासाठी सबंध चार महिने जे शेतकऱ्यांनी केले त्यापेक्षा महिनाभरात अधिकचा मोबदला हा व्यापाऱ्यांना मिळालेला आहे.

उत्पादनात घट, वाढीव दराने दिलासा

खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे सर्वच पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये सोयाबीन आणि कापसाला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. कापूस पीक अंतिम टप्यात असतानाच ढगाळ वातावरणामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन निम्म्यावरच आले होते. महाराष्ट्रसह इतर राज्यामध्येही कापसाचे उत्पादन घटले. गेल्या काही वर्षापासून कापूस क्षेत्रात घट होत असतानाच घटलेले उत्पादन यामुळे यंदा विक्रमी दर मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. अखेर तो सत्यात उतरला असून वाढीव दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

50 वर्षातला ऐतिहासिक दर

अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समिती ही कापसाची मुख्य बाजारपेठ आहे. जिल्ह्यासह इतर भागातूनही कापसाची मोठी आवक होत असते. सध्या शेतकरी केवळ फरदडचा कापूस विक्रीसाठी आणत आहेत. असे असतानाही हंगामाच्या अंतिम टप्प्यात कापसाला तब्बल 11 हजार 845 असा विक्रमी दर मिळाला आहे. वाढलेली मागणी आणि घटलेला पुरवठा यामुळेच हे शक्य झाले आहे. अखेरच्या टप्प्यात शेतकऱ्यांनी साठवलेला कापूस विकला आणि आता त्याचाच फायदा व्यापाऱ्यांना झाला आहे. शिवाय हे दर टिकून राहतील किंवा यामध्ये वाढच होणार असल्याचा अंदाज आहे.

‘कॉटन सिटी’ ला मिळणार गतवैभव

काळाच्या ओघात अकोला जिल्ह्यातही कापसाचे क्षेत्र हे घटले आहे. कापसाचे दर आणि बोंडअळीमुळे होणारे नुकसान यामुळे शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करुन खरिपात सोयाबीनला पसंती दिली आहे. त्यामुळे सरासरी क्षेत्रापेक्षा कमी लागवड झाली होती. पण यंदाचे उत्पादन आणि मिळालेले विक्रमी दर यामुळे पुन्हा कापसाच्या क्षेत्रात वाढ होईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. सध्या शेतकरी फरदडमधून उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करीत असले तरी आगामी वर्षात परस्थिती बदलेल असा विश्वास शेतकरी व्यक्त करीत आहेत.

संबंधित बातम्या :

fish farming : शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ अन् दुहेरी उद्देशही साध्य, व्यवस्थापनावरच मत्स्यशेतीचे भवितव्य

Paddy Growers : धान उत्पादकांना बोनस की प्रति एकर मदत..! नियमितता साधण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांचा मधला मार्ग

Watermelon : कोरोनाचा प्रादुर्भाव नाही पण परिणाम कायम, भंडाऱ्यातून कलिंगडच गायब..!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.