Latur Market : हंगामाच्या अंतिम टप्प्यात तुरीचा बोलबाला, सोयाबीनला उतरती कळा

खरिपातील सर्वात शेवटी येणारे पीक म्हणून तुरीची ओळख आहे. गतवर्षी परतीच्या पावसाचा परिणाम तुरीच्या दरावर झाला तर यंदा हंगामाच्या सुरवातीलाच पावसामध्ये सातत्य राहिल्याने तुरीचा पेराच होऊ शकलेला नाही. सबंध हंगामात 6 हजार 300 या हमीभावापेक्षा अधिकचा दर तुरीला मिळालेला नव्हता. अखेर नाफेडची केंद्र बंद झाली तरी दरातील घसरण सुरुच होती. शिवाय तुरीची आयात सुरु असतानाही दर वाढले हे विशेष.

Latur Market : हंगामाच्या अंतिम टप्प्यात तुरीचा बोलबाला, सोयाबीनला उतरती कळा
हंगामाच्या अंतिम टप्प्यात लातुरात तुरीला विक्रमी दर मिळत आहे.
राजेंद्र खराडे

|

Aug 08, 2022 | 2:52 PM

लातूर : हंगामाच्या सुरवातीला जे चित्र बाजारपेठेत होते त्याच्या अगदी उलटी परस्थिती निर्माण आता झाली आहे. सुरवातीपासूनच तुरीचे दर हे घटलेले होते. तर सोयाबीन आणि कापसाचा आलेख कायम चढता राहिलेला होता. पण आता परस्थिती बदलत आहे. कारण (Latur Market) लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीन महिन्यापूर्वी 6 हजार 200 रुपयांवर असलेली (Toor Rate) तूर आता थेट 8 हजार 500 रुपये क्विंटलवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी तुरीचा साठा केला आहे त्यांची चांदी असून आगामी महिन्यात तुरीचे दर आणखी वाढले जाणार असल्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. मागणीत वाढ आणि (Toor Production) पुरवठा कमी यामुळे हंगामाच्या अंतिम टप्प्यात हा बदल झाला आहे. तर दुसरीकडे खरिपातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनच्या दरात घसरण ही सुरुच आहे. 7 हजार 300 वर गेलेले सोयाबीन आता 6 हजार रुपये क्विंटल असे विकले जात आहे.

तुरीच्या दरात विक्रमी वाढ

खरिपातील सर्वात शेवटी येणारे पीक म्हणून तुरीची ओळख आहे. गतवर्षी परतीच्या पावसाचा परिणाम तुरीच्या दरावर झाला तर यंदा हंगामाच्या सुरवातीलाच पावसामध्ये सातत्य राहिल्याने तुरीचा पेराच होऊ शकलेला नाही. सबंध हंगामात 6 हजार 300 या हमीभावापेक्षा अधिकचा दर तुरीला मिळालेला नव्हता. अखेर नाफेडची केंद्र बंद झाली तरी दरातील घसरण सुरुच होती. शिवाय तुरीची आयात सुरु असतानाही दर वाढले हे विशेष. वाढती मागणी आणि घटलेले उत्पादन यामुळे तुरीच्या दरात वाढ होत आहे. गेल्या महिन्यात तुरीचे दर हे 7 हजार 500 होते तर आता 8 हजार 500 येऊन ठेपले आहेत.

6 हजार 300 असा होता हमीभाव

खरीप हंगामातील तुरीची काढणी होताच राज्यात नाफेडच्या माध्यमातून खरेदी केंद्र सुरु करण्यात आली होती. या खरेदी केंद्रावर तुरीला 6 हजार 300 असाच दर ठरवून देण्यात आला होता. खरेदी केंद्रावरील आणि बाजारपेठेतील दर हे सरासरीपेक्षा कमीच असल्याने शेतकऱ्यांनी तूर साठवणुकीवर भर दिला गेला होता. ज्या शेतकऱ्यांना साठा करुन ठेवला त्या शेतकऱ्यांची आता चांदी होत आहे. तब्बल 2 हजाराहून अधिकचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.

इतर शेतीमालाचे काय आहेत दर?

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आधार केवळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच नाहीतर मराठावाड्यातून येथे मालाची आवक असते. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, हरभरा आणि तुरीचा समावेश होतो. सध्या या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला 4 हजार 850 रुपये क्विंटल, सोयाबीन 6 हजार 250 असा दर आहे तर तुरीला 8 हजार 500 रुपये क्विंटल असा दर मिळत आहे. शिवाय आगामी महिन्यात सणसुद लक्षात घेता तुरीच्या दरात वाढ होणार असल्याचे व्यापारी अशोक आग्रवाल यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें