वारे बहाद्दर ! 10 हजार सोयाबीनला भाव, तरच व्यापाऱ्यांना गावात ‘एंन्ट्री’

प्रतिकूल परस्थितीमध्येही एका गावाने असा निर्णय घेतला आहे की, जर सोयाबीनला 10 हजाराचा भाव दिला तरच सोयाबीनची विक्री होणार आहे. हा केवळ निर्णयच नाही तर गावच्या वेशीवर तसा फलकही लावण्यात येणार आहे. त्यामुळे सोयाबीनची साठवणूक केली तरी चालेल पण कमी दराने सोयाबीनची विक्री न करण्याचा निर्णय गावातील सर्व शेतकऱ्यांनी घेतलेला आहे त्या गावचे नाव कुंभारगाव.

वारे बहाद्दर ! 10 हजार सोयाबीनला भाव, तरच व्यापाऱ्यांना गावात 'एंन्ट्री'
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 5:39 PM

सातारा : सोयाबीनच्या दराला उतरती कळा लागलेली आहे. अशा परस्थितीमध्ये सोयाबीनची विक्री करावी का नाही या मनस्थितीमध्ये शेतकरी आहेत. शिवाय खरीपातील पीकावर हजारोंचा खर्च करुनही पदरी काही पडलेले नाही. या प्रतिकूल परस्थितीमध्येही एका गावाने असा निर्णय घेतला आहे की, जर सोयाबीनला 10 हजाराचा भाव दिला तरच सोयाबीनची विक्री होणार आहे. हा केवळ निर्णयच नाही तर गावच्या वेशीवर तसा फलकही लावण्यात येणार आहे. त्यामुळे सोयाबीनची साठवणूक केली तरी चालेल पण कमी दराने सोयाबीनची विक्री न करण्याचा निर्णय गावातील सर्व शेतकऱ्यांनी घेतलेला आहे त्या गावचे नाव कुंभारगाव.

शेतीमालाला योग्य दर मिळण्यासाठी शेतकऱ्यांची एकजूटन गरजेची आहे…योग्य दर मिळाल्याशिवाय विक्री करु नये असे अवाहन केवळ सोशल मिडीयापर्यंतच मर्यादित राहते. पण सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथील शेतकऱ्यांनी ही कल्पना वास्तवात आणलेली आहे. सोयाबीनच्या दरात दिवसागणिक चढ-उतार पाहवयास मिळत आहे. आता सण तोंडावर असल्याने सोयाबीनची आवक ही वाढणारच असा अंदाज व्यापाऱ्यांनी बांधलेला आहे. मात्र, परस्थिती कितीही बेताची झाली तरी सोयाबीनला प्रति क्विंटल 10 हजाराचा दर मिळाल्याशिवाय सोयाबीनची विक्री न करण्याचा निर्णय कुंभारगाव येथील शेतकऱ्यांनी घेतलेला आहे.

म्हणून घेण्यात आला हा निर्णय…

कुंभारगावात अधितर शेतकरी हे अल्पभुधारक आहेत. त्यामुळे नगदी पीकावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आहे. यातच सोयाबीन या मुख्य पीकाचे दर हे घसरत आहेत. हंगामाच्या सुरवातीला सोयाबीनला 10 हजाराचा दर मिळालेला होता. मात्र, हे दर स्थिर तर राहिलेच नाहीत शिवाय यामध्ये कमालीची घट झालेली आहे. या मुख्य पिकाची विक्री ही कवडीमोल दरात झाली तर भविष्यात कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा असा सवाल उपस्थित झाल्याने गावातील बहुतांश शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे.

गावाच्या प्रवेशद्वारावरच फलक

सध्या सोयाबीनची काढणी कामे अंतिम टप्प्यात आहेत. यातच पावसाने गेल्या आठ दिवसांपासून उघडीप दिलेली आहे. त्यामुळे काढणी-मळणी ही कामे शेतकरी उरकून घेत आहे. पण सोयाबीनला योग्य दर नसल्याने शेतकऱ्यांची निराशा ही कायम आहे. सध्याच्या दरानुसार उत्पादनावर झालेला खर्चही पदरी पडणार नाही असे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी गावच्या प्रवेशद्वारावरच ‘ सोयाबीन घेण्यासाठी व्यापाऱ्यांनी दर 10 हजार झारल्याशिवाय फिरकू नये’ अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहे. मात्र, प्रत्येक शेतकऱ्यासाठी हा नियम ऐच्छिक असणार आहे.

सध्या काय आहेत सोयाबीनचे दर

हंगामाच्या सुरवातीला सोयाबीनला 11 हजारापर्यंतचा दर मिळाला होता. मात्र, यानंतर साोयाबीनचे दर हे कमी होण्यास सुरवात झाली ती अद्यापही कायम आहे. सोयाबीनला सरासरी 7 हजारपर्यंत दर मिळावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. पण सध्या सोयाबीनला 5700 चा दर मिळत आहे. त्यामुळे सोयाबीनची विक्री करावी का नाही या संभ्रमात आहे. (Sale of soyabean only if 10,000 quintals are received, farmers in Kumbhargaon decide)

संबंधित बातम्या :

सागवान शेतीमध्ये मुबलक पैसा, गरज आहे ‘ती’ अभिनव उपक्रमाची

गाळप सुरु होण्याच्या तोंडावर थकीत ‘एफआरपी’ रक्कम अदा, साखर आयुक्तालयाचा ‘कडू’ टोला झाला ‘गोड’

रुपडे बदललेला सातबारा थेट शेतकऱ्यांच्या दारी, कसा काढायचा डिजीटल सातबारा ?

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.