रुपडे बदललेला सातबारा थेट शेतकऱ्यांच्या दारी, कसा काढायचा डिजीटल सातबारा ?

ऑनलाईद्वारे हा उतारा काढता येणार आहे. प्राथमिक स्वरुपात आता महसूल विभागाचे अधिकारी हा डिजीटल सातबारा उतारा घेऊन थेट शेतकऱ्यांच्या दारी येणार आहेत. या दरम्यान 4 कोटी डिजीटल सातबाऱ्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे या अत्याधुनिक प्रणालीची माहिती शेतकऱ्यास होणार असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.

रुपडे बदललेला सातबारा थेट शेतकऱ्यांच्या दारी, कसा काढायचा डिजीटल सातबारा ?
संग्रहीत छायाचित्र

लातूर : राज्यसरकारने कारभारात त्परता येण्याच्या अनुशंगाने ऑनलाईनवर भर दिलेला आहे. (E- Pik Pahni) ई-पीक पाहणी, पीक नुकसानीचे दावे ही ऑनलाईनच करुन घेण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे आता डिजीटल सातबारा करण्यात आला असून शेतकऱ्यांना दरवेळेस कागदोपत्री सातबारा देण्याची आवश्यकता भासणार नाही. ऑनलाईद्वारे हा उतारा काढता येणार आहे. प्राथमिक स्वरुपात आता महसूल विभागाचे अधिकारी हा (Digital Satbara) डिजीटल सातबारा उतारा घेऊन थेट शेतकऱ्यांच्या दारी येणार आहेत. या दरम्यान 4 कोटी डिजीटल सातबाऱ्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे या अत्याधुनिक प्रणालीची माहिती शेतकऱ्यास होणार असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.

कर्मचाऱ्यांची काय होती भुमिका

सातबारा उतारा हा आता डिजीटल माध्यमातून शेतकऱ्यांना दिल्यास पुन्हा त्याचे वाटप कशासाठी असा सवाल महसूलच्या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला होता. मात्र, या उपक्रमामुळे शेतकरी आणि महसूलचे अधिकारी यांचा थेट संवाद होणार आहे. त्यामुळे डिजीटल सातबाऱ्यातील अडचणी काय आहेत याची माहिती शेतकऱ्यांनाही करुन देता येणार आहे. याबाबतचा उद्देश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी समोर आणल्याने या मोहिमेला सुरवात झालेली आहे.

कसा काढायचा डिजीटल सातबारा

ऑनलाईन सातबारा (7/12) उतारा कसा काढायचा?
1. सर्वप्रथम https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr या महाराष्ट्र महसूल विभागाच्या वेबसाईट जावं लागतं. ऑनलाईन सातबारा Satbara utara काढण्यासाठी वेबसाईटवर दोन पद्धती दिसतील:

A). Regular Login

B). OTP Login

A). Regular Login – जर तुम्ही आगोदरच यावर Login केले असेल तर तुम्हाला इथे नोंदणी करावी लागले. त्यात तुम्हाला OTP ची गरज लागत नाही. हा पर्याय जास्त सोईस्कर असतो.

B). OTP Login – यामध्ये तुमच्या मोबाईलवर एक OTP येतो. तो प्रत्येक वेळेस तुम्हाला सातबारा काढण्यासाठी टाकावा लागतो.
जर तुम्ही आधीच या वेबसाईटवर नोंदणी केली असेल तर लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या साईटवरील सेवांचा लाभ घेऊ शकता.

2. सातबारा काढण्याची तुमची पहिलीच वेळ असेल तर, ‘New User Registration’ इथे क्लिक करून, तुमची वैयक्तिक माहिती भरुन नोंदणी करायची आहे.

3. यानंतर खाली ‘Please Check Availability of your Login Id’ इथे क्लिक करून यूजर नेम आणि पासवर्ड निवडायचा आहे. त्यानंतर ‘Submit’ वर क्लिक केल्यांनतर तुम्हाला ‘User Registration successful Click Here to Login’ म्हणून मेसेज दिसेल. म्हणजेच तुमची यशस्वीरित्या नोंदणी झाली आहे.

4. त्या मेसेजे वरील ‘Click Here to ‘Login’यावर क्लीक करावं. यानंतर तुम्ही निवडलेला यूजरनेम, पासवर्ड आणि ‘Captcha'(कोड वर्ड) टाकून त्यात लॉगिन व्हावे.

5. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यात तुमचा जिल्हा, तालुका, गाव टाकून सातबाराचा सर्वे नंबर/गट नंबर टाकून, अंकित सातबारा हा पर्याय निवडावा.

६. त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी प्रथम ‘Recharge Account ‘ या पर्यायवर क्लीक करून अगोदर तुमच्या अकाउंटमध्ये काही रक्कम घ्यावी लागेल. प्रत्येक डिजिटल स्वाक्षरी सातबाराचे digital online satbara एक पेज डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला रु. 15 इतकी किंमत आकारली जाते. ही रक्कम तुम्ही बनवलेल्या सातबारा डिजिटल स्वाक्षरी या ऑनलाईन अकाउंटमध्ये रिचार्ज केलेल्या रकमेतून कमी केली जाते.

महसूल विभाग करतंय काय?

राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे कागदोपत्री असलेले सातबारा उतारे आता संगणकात साठवण्यात आले आहेत.
साठवलेले उतारे डिजिटल स्वाक्षरीसह ऑनलाइन रूपात शेतकऱ्यांना उपलब्ध आहेत.
हेच संगणकीय उतारे बॅंकांना तसेच कृषी विभागालाही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
महसूलमंत्र्यांच्या संकल्पनेनुसार संगणकीय उतारे आता पीडीएफ फाईलमध्ये रुपांतरीत केले जात आहेत.
संगणकातील पीडीएफ रूपांतरित सातबाऱ्याची कागदी प्रत बाहेर काढली जाते.
गावोगावी सातबारा उताऱ्याची ही प्रत शेतकऱ्यांना मोफत वाटली जात आहे.
नव्या स्वरुपातील ही प्रत शेतकऱ्यांना देताना त्याचे वाचन, दुरुस्ती व सुधारणा ही कामेही केली जात आहेत.  (Digital satbara benefits farmers, how to remove digital satbara)

संबंधित बातम्या :

शेतकरीही वर्तवणार आता पावसाचा अंदाज, हवामान तज्ञांचा शेतकऱ्यांना सल्ला

नैसर्गिक आपत्तीमुळे जनावराचा मृत्यू ; नुकसानभरपाईसाठी असा करा अर्ज…

ज्याला मागणी, त्याच फळाची होणार लागवड ; सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना होणार फायदा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI