शेतकरीच करणार आता कृषीचा विस्तार, राज्य समितीवर शेतकऱ्यांचीच निवड

कृषी विस्तार कार्यक्रमात सुधारणा घडवून आणण्यासाठी या 'आत्मा' अंतर्गत राज्य स्तरीय सल्ला समिती स्थापन करण्याच्या सुचना ह्या केंद्र सरकारने दिलेल्या आहेत. त्याचीच अंमलबजावणी आता स्थानिक पातळीवर होताना पाहवयास मिळत आहे. राज्य सरकारने निवडलेल्या या समितीवर राज्यभरातील 20 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

शेतकरीच करणार आता कृषीचा विस्तार, राज्य समितीवर शेतकऱ्यांचीच निवड
संग्रहीत छायाचित्र
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: राजेंद्र खराडे

Nov 22, 2021 | 12:44 PM

मुंबई : कृषी विभागाच्या बरोबरीनेच आत्मा विभागाचेही काम सुरु आहे. योजनांची अंमलबजावणी आणि योग्य शेतकऱ्यांची याकरिता निवड यासाठी हा विभाग कार्यरत आहे. कृषी विस्तार कार्यक्रमात सुधारणा घडवून आणण्यासाठी या ‘आत्मा’ अंतर्गत राज्य स्तरीय सल्ला समिती स्थापन (Agriculture Committee) करण्याच्या सुचना ह्या (Central Government) केंद्र सरकारने दिलेल्या आहेत. त्याचीच अंमलबजावणी आता स्थानिक पातळीवर होताना पाहवयास मिळत आहे. राज्य सरकारने निवडलेल्या या समितीवर राज्यभरातील 20 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

कृषी योजनांची अंमलबजावणी आणि याचा थेट लाभ हा शेतकऱ्यांना मिळावा या दृष्टीने कृषीचा विस्तार वाढावा म्हणून समित्या स्थापन करण्याच्या सुचना केंद्र सरकारच्यावतीने देण्यात आल्या होत्या. याची अंमलबजावणी करण्याची सुरवात आता राज्य सरकारने केली आहे.

म्हणून शेतकऱ्यांचा थेट समितीमध्ये सहभाग

शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळावा तसेच नवनविन उपक्रम राबविणे सहज सोपे व्हावे म्हणून कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केंद्र सरकारने ठरवून दिल्यानुसार समित्या गठित करण्याच्या सुचना ह्या आत्मा विभागातील संचालकांना दिल्या होत्या. त्यानुसार समित्यांची निवडही करण्यात आली होती. मात्र, थेट शेतकऱ्यांशी संवाद असणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश करण्याच्या सुचना राज्य कृषिमंत्री तसेच कृषी कार्यालयकडून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमधून दोन सदस्य तर इतर 18 सदस्य हे खुल्या वर्गातून निवडण्यात आले आहेत.

समितीवरील सदस्यांवर काय आहे जबाबदारी ?

आत्मा विभागाअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी या समितीवर 20 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. आत्मा विभागाअंतर्गत विविध योजना राबविल्या जात आहेत. पण त्याची अंमलबजावणी ही स्थानिक पातळीवर होत नाही. यामधील अडचणी काय आहेत. थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणीची उकल करावी लागणार आहे. तर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार राज्य सरकारकडे निधीची मागणी करुन त्याची पूर्तता करण्यासाठी पाठपुरावा करावा लागणार आहे. शेतकरी आणि आत्मा विभागातील दुवा म्हणून या समितीमधील सदस्यांना काम करावे लागणार आहे.

जनजागृती आणि प्रसार

काळाच्या ओघात सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचा कल कमी होत आहे. त्यामुळे शेतकरी उत्पादक गटांना याबाबत मार्गदर्शन करुन सेंद्रिय शेतीचे क्षेत्र वाढविणे, याकरिता प्रशिक्षण देऊन शेतकऱ्यांच्या सहलींचे आयोजन करुन वेगवेगळ्या प्रगत शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घडवून आणावे लागणार आहे. शेती विकासाबाबतची प्रात्याक्षिके शेतकऱ्यांना करुन दाखवावी लागणार आहे. शेतकरी केवळ नगदी पिकांवर भर देत आहे. ज्या पिकांचे क्षेत्र कमी होत आहे. त्या पिकांचे महत्व सांगून क्षेत्र वाढविणे हा उद्देश या समितीचा आहे असे अभिमान अवचर यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांनो चिंता सोडा, आता शेतीमालाचे बाजारभाव तुमच्या मोबाईवरच, कसे ते पहा..!

गुजरात सरकारने शेतकऱ्यांसाठी जे केले, ते महाराष्ट्र सरकारला जमणार का?

अवकाळीने दोन्ही हंगामातील पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी ?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें