Agricultural Department : … म्हणून वाढले उन्हाळी सोयाबीन अन् सुर्यफूलाचे क्षेत्र, काय आहे कृषी विभागाची भूमिका?

पीक पध्दतीमध्ये बदल होत नाही. उत्पादनात वाढ होऊ अथवा घट शेतकऱ्यांचा कायम परंपारिक पिकांवरच भर राहिलेला आहे. यामध्ये मराठवाड्यातील शेतकरी असतील तर हा बदल शक्यच नाही. मात्र, कृषी विभागाने ठरवले तर काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण सध्या मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, जालना तसचे इतर जिल्ह्यांमध्ये पाहवयास मिळत आहे.

Agricultural Department : ... म्हणून वाढले उन्हाळी सोयाबीन अन् सुर्यफूलाचे क्षेत्र, काय आहे कृषी विभागाची भूमिका?
यंदा उन्हाळी हंगामात सुर्यफूलाचे क्षेत्र वाढले आहे.
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 4:00 AM

औरंगाबाद : (Crop Change) पीक पध्दतीमध्ये बदल होत नाही. उत्पादनात वाढ होऊ अथवा घट शेतकऱ्यांचा कायम परंपारिक पिकांवरच भर राहिलेला आहे. यामध्ये मराठवाड्यातील शेतकरी असतील तर हा बदल शक्यच नाही. मात्र, कृषी विभागाने ठरवले तर काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण सध्या (Marathwada) मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, जालना तसचे इतर जिल्ह्यांमध्ये पाहवयास मिळत आहे. दरवर्षी कापूस हंगाम संपला असतानाही शेतकरी फरदडचे उत्पादन घेऊन चार पैसे कमावण्याचे धाडस करीत असतो. यंदाही अशीच काहीशी अवस्था शिवाय कापसाला अधिकचा दर यामुळे फरदडचे उत्पादन हे घेतले जाणारच असेच वातावरण निर्माण झाले होते. मात्र, (Agricultural Department) कृषी विभागाने केलेली जनजागृती आणि शेतकऱ्यांची बदललेली मानसिकता यामुळे शेतकऱ्यांनी फरदडचे उत्पादन न घेता याला पर्याय शोधत उन्हाळी सोयाबीन आणि सुर्यफूलाचा पेरा केला आहे. त्यामुळे होणारे नुकसान टळलेले आहे.

यंदा कापसाला विक्रमी दर

खरिपातील कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले होते. उत्पादन घटल्यामुळे हंगामाच्या सुरवातीपासून कापसाच्या मागणीत वाढ झाली होती. मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने यंदा कधी नव्हे तो कापासाचे दर हे 10 हजार रुपये क्विंटलपेक्षा अधिक झाले होते. कापसाचे दर वाढल्याने पुन्हा फरदडचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल होता. मात्र, फरदडमुळे शेत जमिनीचे आणि पर्यायाने आगामी हंगामातील पिकांचे कसे नुकसान होते हे पटवून देण्यात कृषी विभागाला यश आले आहे. त्यामुळेच फरदडला पर्याय म्हणून सुर्यफूल, भुईमूग, उन्हाळी सोयाबीन, टरबूज यासारखे पीके घेण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले होते.

फरदड कापूस म्हणजे नेमके काय?

खरीप हंगामातील कापसाची वेचणी तशी दिवाळी किंवा नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंतच केली जाते. वेळेत तोडणी केली तर कापसावरील बोंडअळीचा प्रादुर्भाव इतर पिकांवर होत नाही शिवाय शेतीचा दर्जाही टिकून राहतो. मात्र, जो कापूस उन्हाळ्यापर्यंत कायम ठेऊन त्याची जोपासना केली जाते त्यास फरदड असे म्हणतात. फरदडचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना नविन असे काहीच करावे लागत नाही. आहे त्या क्षेत्रावरील कापसाची जोपासना करायची आणि उत्पादन घ्यावयाचे एवढेच काही ते कष्ट.

फरदड कापसामुळे काय होते?

सध्या वातावरणातील बदलामुळे कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच कापूस शेतामध्ये कायम ठेवला तर अळीचा प्रादुर्भाव हा वाढणारच आहे. बोंडअळीचे जीवनचक्र संपवण्यासाठी किमान 6 ते 7 महिने कापूस पीक वावरामध्ये नसणे गरजेचे आहे. एवढेच नाही तर फरदड कापसाचा शेत जमिनीवरही परिणाम होत असतो. आगामी हंगामातील पिकांच्या उगवण क्षमतेवर त्याचा परिणाम होतो.  त्यामुळे तात्पूरत्या फायद्यासाठी शेतकऱ्यांनी आगामी हंगामातील आणि शेतजमिनीचे नुकसान करुन घेऊ नये असा सल्ला कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या :

Onion: बाजार समितीच्या एका निर्णयाने कांदा उत्पादकांचा प्रश्न मिटला, आवक सुरुच उलट दरात सुधारणा

Crop Insurance : पीकविम्यासाठी राज्याची स्वतंत्र योजना, कृषिमंत्र्यांनीही दिले संकेत, कशामुळे निर्माण झाली परस्थिती?

Drone farming | जमलंच गड्या! इकडं अर्थमंत्र्यांनी सांगितलं अन् भंडाऱ्याच्या बहाद्दरानं ड्रोन शेतीचा प्रयोगही केला!

Non Stop LIVE Update
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.