Latur Market : सोयाबीनच्या दरात घसरण सुरुच, शेतकऱ्यांना चिंता उन्हाळी हंगामातील पिकांची

सध्या बाजारपेठेत खरीप हंगामातील सोयाबीनची आवक होत आहे. साठवणूक केलेले सोयाबीनही आता अंतिम टप्प्यात आहे. असे असले तरी शेतकऱ्यांना चिंता आहे ती उन्हाळी हंगामातील सोयाबीनची. उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे सोयाबीनची जोपसणा केली आहे. असे असताना आता दरात झपाट्याने घसरण सुरु झाली आहे. खरिपात उत्पादनात घट झाली तर आता घटत्या दरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान हे ठरलेलेच आहे.

Latur Market : सोयाबीनच्या दरात घसरण सुरुच, शेतकऱ्यांना चिंता उन्हाळी हंगामातील पिकांची
सलग चौथ्या दिवशी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे.
Follow us
| Updated on: May 04, 2022 | 1:46 PM

लातूर : गेल्या काही दिवसांपासून शेतीमालाच्या दरात सुरु झालेली घसरण ही कायम आहे. तूर आणि हरभऱ्यापेक्षा (Soybean Rate) सोयाबीनचे दर झपाट्याने घसरत आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अधिकच्या दराच्या अपेक्षेने साठवणूक केली होती त्यांचे मोठे नुकसान होणार आहे. सध्या (Kharif Season) खरीप हंगामातील सोयाबीनची आवक ही अंतिम टप्प्यातील आहे. त्यामुळे सध्याच्या घटत्या दराबरोबरच (Summer Season) उन्हाळी हंगामातील सोयाबीनचे काय होणार याची धास्ती शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. सोयाबीनच्या मागणीत घट झाल्याने ही परस्थिती ओढावली आहे. सोयाबीन प्रमाणेच तूर आणि हरभऱ्याच्या दरात घसरण होत आहे. सोयापेंडच्या आयातीमुळे सोयाबीनच्या दरावर परिणाम झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

उत्पादन वाढले तरी फायदा काय?

सध्या बाजारपेठेत खरीप हंगामातील सोयाबीनची आवक होत आहे. साठवणूक केलेले सोयाबीनही आता अंतिम टप्प्यात आहे. असे असले तरी शेतकऱ्यांना चिंता आहे ती उन्हाळी हंगामातील सोयाबीनची. उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे सोयाबीनची जोपसणा केली आहे. असे असताना आता दरात झपाट्याने घसरण सुरु झाली आहे. खरिपात उत्पादनात घट झाली तर आता घटत्या दरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान हे ठरलेलेच आहे. उन्हाळी हंगामातील सोयाबीनची काढणी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच दरात होत असलेली घट शेतकऱ्यांसाठी नुकसानीची ठरणार आहे.

गेल्या 8 दिवसांमध्ये शेतीमालाच्या दरात घसरण

केवळ सोयाबीनच्या दरात घसरण नव्हे तर तूर आणि रब्बी हंगामातील हरभऱ्याच्या दरातही घसरण सुरुच आहे. आठ दिवसांपूर्वी सोयाबीन हे 7 हजार 200 रुपयांवर स्तिर होते तर हरभरा आणि तूर हे हमीभावाच्या बरोबरीने. असे असताना केंद्र सरकारच्या काही निर्णयामुळे सोयाबीन आणि तुरीच्या दरात घसरण झाली आहे. तर हरभऱ्याची आवक वाढल्याने दर 4 हजार 500 वर येऊन ठेपला आहे.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यांची भूमिका महत्वाची

शेतीमालाच्या दरात घसरण सुरु असली तरी आवक ही सुरुच आहे. शेतकरी आता सोयाबीन दरवाढीच्या प्रतीक्षेत नाही तर आहे ते सोयाबीन विक्री करण्याच्या भूमिकेत आहे. शिवाय तूर आणि हरभऱ्याच्या दरातही घसरण होत असताना आवक ही सुरुच आहे. अशा परस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काही दिवस साठवणूक करुन दरवाढीची प्रतिक्षा करणे गरजेचे आहे. उर्वरीत सोयाबीनचे नाही पण उन्हाळी हंगामातील सोयाबीनच्या दरवाढीसाठी शेतकऱ्यांनी ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका घेणे गरजेचे असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.