सोयाबीन दराचा परिणाम बाजारपेठेवर ; आवकही घटली

सोयाबीन दराचा परिणाम आता थेट बाजारपेठेवर होत आहे. दर कमी झाल्याने बुधवारी सोयाबीनची आवक घटली होती. पावसाने उघडीप दिल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून सोयाबीनची आवक ही वाढलेली होती. मात्र, मंगळवारी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला केवळ 5100 रुपये दर मिळाला.

सोयाबीन दराचा परिणाम बाजारपेठेवर ; आवकही घटली
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 3:13 PM

लातूर : सोयाबीन (Soyabean Rate) दराचा परिणाम आता थेट बाजारपेठेवर होत आहे. दर कमी झाल्याने बुधवारी सोयाबीनची आवक घटली होती. पावसाने उघडीप दिल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून सोयाबीनची आवक ही वाढलेली होती. (Latur Market) मात्र, मंगळवारी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला पोटलीत केवळ 5100 रुपये दर मिळाला. त्यामुळे सोयाबीन विक्रीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असल्याचे दिसून आले आहे. हंगामाच्या सुरवातीला सोयाबीनला 11 हजारपर्यंत दर मिळाला होता. त्या तुलनेत आता दर हे निम्म्यावर आले आहेत.

सोयाबन हे खरीपातील मुख्य पीक असले तरी यंदा या पीकातून शेतकऱ्यांचे अधिकचे नुकसानच झालेले आहे.पीक जोमात असाताना पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला होता तर आता काढणीला पीक असताना अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे अजूनही सोयाबीन हे शेतामध्येच आहे.

गेल्या चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने काढणी कामाला वेग आला आहे. तर इकडे बाजारपेठेत दर कोसळत आहेत. 6800 रुपये क्विंटल असलेले सोयाबीन बुधवारी 5300 वर आले होते. तर मंगळवारी सोयाबीनला सर्वात कमी म्हणजे 5100 रुपये दर मिळालेला होता. तेलबियांचे दर हे कमी होत आहेत तर खाद्यतेलाचे दर हे दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप आता शेतकरी करीत आहेत.

5000 हजार क्विंटल सोयाबीनची आवक

लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही सोयाबीनसाठी महत्वाची मानली जाते. कारण सोयाबीनचे दर हे याच बाजार समितीमधून काढले जातात एवढेच नाही तर हेच दर मराठवाड्यात लागू होतात. मराठवाड्यासह कर्नाटक, सोलापूर येथील सोयाबीनची आवकही लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत असते. यंदा मात्र, हंगामाच्या सुरवातीपासूनच सोयाबीनची उलाढाल ही ठप्प आहे.सुरवातीचा काळ वगळता पुन्हा सोयाबीनचे दर वाढलेले नाहीत तर दर नसल्याने आवकही कमी होत आहे. बुधवारी 5000 क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.

खाद्यतेलाच्या दरात वाढ, मग तेलिबयाच कवडीमोल दरात का?

खाद्यतेलाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने एक ना अनेक पर्याय खुले केले होते. मध्यंतरी खाद्यतेलावरील आयातशुल्क कमी केले होते. मात्र, असे असतानाही खाद्यतेलाच्या दरात वाढच होत आहे. तर दुसरीकडे तेलिबयांच्या किमती ह्या कमी होत आहेत. सोयाबीनच्या दरात कायम घसरण सुरु झाली आहे. शिवाय अजून सोयाबीनची काढणी-मळणी सुरु आहे. भविष्यात आवक वाढली तर काय होणार हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

उडदाच्या दरात वाढ

उडीद या पीकाने शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने आधार दिलेला आहे. हंगामाच्या सुरवातीपासून उडदाला 7000 चा दर मिळालेला होता. यामध्ये काही प्रमाणात चढउतार झाला असला तरी शेतकऱ्यांच्या पदरी पैसे पडलेले आहेत. उडदाचे दर मंगळवारच्या तुलनेत 200 रुपयांनी वाढलेले होते. मात्र, आता उडदाची आवक ही कमी होत आहे. शेतकऱ्यांनी साठवणूकीवर भर दिलेला आहे.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. बुधवारी लाल तूर- 6260 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6346 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6223 रुपये क्विंटल, जानकी चना 4930 रुपये क्विंटल, विजय चणा 5000, चना मिल 4850, सोयाबीन 5802, चमकी मूग 7180, मिल मूग 6200 तर उडीदाचा दर 7351एवढा राहिला होता. (Soyabean prices fall, arrivals also fall, Latur Agricultural Produce Market Committee)

संबंधित बातम्या :

शेवटचे दोन दिवस, 90 लाख शेतकऱ्यांनी केली ‘ई-पिक पाहणी’च्या माध्यमातून नोंदणी

पावसानंतर कपाशीवर किडीचा प्रादुर्भाव, काय आहे उपाययोजना ?

रब्बी हंगामाच्या तोंडावर खतांची कृत्रिम टंचाई ; शेतकऱ्यांच्या समस्या कायम

Non Stop LIVE Update
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.