AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आनंदवार्ता : सोयाबीन 6 हजाराच्या पार, शेतकऱ्यांचा संयम आला कामी

दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात कायम सुधारणा झाली आहे. बुधवारी तर लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सौद्यामध्ये 6 हजार 92 रुपये असा दर मिळाला आहे तर पोटलीत सोयाबीनला 5750 चा दर मिळाला आहे.

आनंदवार्ता : सोयाबीन 6 हजाराच्या पार, शेतकऱ्यांचा संयम आला कामी
लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती
| Edited By: | Updated on: Nov 17, 2021 | 4:04 PM
Share

लातूर : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यालाच काय पण व्यापाऱ्यांना देखील सोयाबीनच्या (Soybean Rate) दरात एवढ्या झपाट्याने वाढ होईल असे वाटत नव्हते.  बाजारपेठेत सर्वकाही नकारात्मक चित्र तयार झाले होते. कधी नव्हे ते (Farmer) शेतकऱ्यांना शेती माल तारण योजनेचा लाभ घेऊन सोयाबीनची साठवणूक करावी लागली होती. मात्र, आता सर्वकाही सुरळीत होऊ लागले आहे. दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात कायम सुधारणा झाली आहे. बुधवारी तर (Latur Agricultural Produce Market Committee) लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सौद्यामध्ये 6 हजार 92 रुपये असा दर मिळाला आहे तर पोटलीत सोयाबीनला 5750 चा दर मिळाला आहे.

हंगामाच्या सुरवातीपासूनच सोयाबीनला बाजारात उठाव नव्हता. यातच पावसामुळे उत्पादनात तर घट झालीच होती पण दर्जाही ढासळल्याने दर घटत होते. दिवाळीपूर्वी सोयाबीनला 4800 रुपये प्रति क्विंटल दर होता. आता यामध्ये तब्बल 1 हजाराने वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठाही मर्यादित असल्यानेच सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे. आज (बुधवारी) सलग आठव्या दिवशी दरात वाढ झालेली आहे.

शेतकऱ्यांचा संयम आला कामी

सोयाबीनचे दर कमी असतानाही आणि आता वाढल्यानंतरही शेतकऱ्यांनी सर्वकाही संयमाने घेतलेले आहे. दोन आठवड्यापूर्वी सोयाबीनला दर नव्हते तेव्हाही शेतकऱ्यांनी साठवणूकीवरच भर दिला होता तर आता दर वाढूनही मोठ्या प्रमाणात आवक केली जात नाही. सध्या दर वाढले असताना आवक वाढली तर याचा परिणाम थेट दरावर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही बाजारपेठेचे गणित कळाले असून आता दर वाढले तरी टप्प्याटप्प्यानेच सोयाबीनची आवक केली जाणार आहे.

आवक वाढत नसल्यानेच दर टिकून

मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाला तर त्याचा दरावर परिणाम हा होतोच. पण यावेळी शेतकऱ्यांनी सोयाबीन मालच रोखून धरला आहे. याबाबतचा उल्लेखही इंडिया पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशने पशूसंवर्धन मंत्र्यांना लिहलेल्या पत्रातही केला आहे. आता दर वाढूनही शेतकरी सोयाबीनची अधिकच्या प्रमाणात आवक होऊ देत नाहीत. त्यामुळे भविष्यात सोयाबीनच्या दरात अणखीन वाढ होणार आहे. मंगळावारच्या तुलनेत बुधवारी सोयाबीनच्या दरात 150 रुपयांनी लातूरच्या बाजार समितीमध्ये वाढ झाली होती तर आवक केवळ 15 हजार पोत्यांची होती. सोयाबीन विक्रीची गडबड आता शेतकऱ्यांना नाही तर पुरवठा कमी होत असल्याने प्रक्रिया उद्योजकांना गरज राहिलेली आहे.

अशी घ्या साठवणूक केलेल्या सोयाबीनची काळजी

सोयाबीनची मळणी झाली की शेतकऱ्यांनी भाव नसल्यामुळे सोयाबीनच्या साठवणूकीवर भर दिला होता. आता दिवाळी, रब्बी हंगामाची पेरणी आणि अनुदानाची रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता नाही. शिवाय दिवसाला सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा ऊंचावल्या आहेत. मात्र, साठवणूक केलेल्या सोयाबीनला ऊन देऊन त्याच्यामधील आर्द्रतेचे प्रमाण 10 ते 12 टक्केवर आणणे गरजेचे आहे. तर योग्य दरही शेतकऱ्यांना मिळणार आहे.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. बुधवारी लाल तूर- 5790 रुपये क्विंटल, पांढरी तूर 5851 रुपये क्विंटल, पिंकू तूर 5730 रुपये क्विंटल, जानकी चना 4844 रुपये क्विंटल, विजय चणा 4900, चना मिल 4700, सोयाबीन 6092, चमकी मूग 7300, मिल मूग 6200 तर उडीदाचा दर 7250 एवढा राहिला होता.

संबंधित बातम्या :

PM किसान योजनेत अनियमितता, महाराष्ट्रातील 4 लाख 45 हजार शेतकऱ्यांना द्यावा लागणार परतावा

सात दिवसांत 1 हजार रुपयांनी कांद्याच्या दरात घट, सरकारच्या निर्णयामुळेच शेतकऱ्यांचा वांदा

शेतकरी दुहेरी संकटात, शेळीपालनाचा जोडव्यवसायही अडचणीत

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.