सोयाबीन, उडदाच्या चढ-उताराने धाकधूक, हरभऱ्याने मात्र शेतकऱ्यांना दिलासा

गेल्या दोन दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात मोठ्या प्रमाणात घट झाली तर उडीदाचे दर काही प्रमाणात वाढले होते असे असताना (chickpea) हरभऱ्याचे दर मात्र टिकून आहेत. यंदा हरभऱ्याच्या उत्पादनात घट झाली होती तर आता मागणी वाढत असल्याने दर हे टिकून आहेत. शिवाय भविष्यातही अशाच प्रकारे दर राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सोयाबीन, उडदाच्या चढ-उताराने धाकधूक, हरभऱ्याने मात्र शेतकऱ्यांना दिलासा
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 1:09 PM

लातूर : आता खरिपातील पिकांची आवक वाढत आहे. (grain price) त्यामुळे शेती मालाच्या दरात दिवसागणिक बदल हे होत आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात मोठ्या प्रमाणात घट झाली तर उडीदाचे दर काही प्रमाणात वाढले होते असे असताना (chickpea) हरभऱ्याचे दर मात्र टिकून आहेत. यंदा हरभऱ्याच्या उत्पादनात घट झाली होती तर आता मागणी वाढत असल्याने दर हे टिकून आहेत. शिवाय भविष्यातही अशाच प्रकारे दर राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही हरभऱ्याला 5 हजार ते 5 हजार 500 रुपये प्रति क्विंटलचा दर राहिलेला आहे. एकीकडे खरिपातील पिकांची आवक ही सुरु झाली आहे. शिवाय या हंगामातील सर्वच पिकांना हा पावसाचा फटका बसला होता. आता निर्यातीसही अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळेच हरभऱ्याचा दर बाजारात टिकून आहे. आयातीबाबत सरकारचे धोरण आणि हरभरा पिकाबद्दल व्यापाऱ्यांनी घेतलेली वायदाबंदीची भुमिका यामुळे हरभऱ्याचे दर हमी भावापेक्षा कमी आले होते. मात्र, सरकारच्या धोरणामुळे हरभऱ्याच्या मागणीत वाढ झाली शिवाय देशात यंदा हरभऱ्याचे उत्पादनही घटलेले आहे.

बाजारात हरभऱ्याचा तुटवडा भासत असल्यानेच आज हमी भावापेक्षा अधिकचा दर हा मिळत आहे. महाराष्ट्रप्रमाणे राज्यस्थान, मध्यप्रदेशमध्येही क्विंटलमागे 50 ते 100 रुपयांनी दर हे सुधारलेले आहेत. त्यामुळे सोयाबीनचे दर घटत असले तरी हरभऱ्याच्या स्थिर दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा आहे.

असे आहेत हरभऱ्याचे दर

हरभऱ्याची आवक ही बाजार पेठेत सुरु झाली असली तरी यामध्ये सातत्य नाही. आवक ही कमी-अधिक प्रमाणात होत आहे. मात्र, मागणी असल्याने हरभऱ्याचे दर काही प्रमाणात का होईना वाढत आहेत. आठवडाभरात 50 ते 100 रुपयांनी दरामध्ये वाढ झालेली आहे. अकोला बाजार समितीमध्ये 5200 ते 5575 रुपये दर तर नागपूरमध्ये 5340 ते 5600 लातूर बाजार समितीमध्ये 5190 ते 5700 असे दर हरभऱ्याला मिळालेले आहेत.

चार पटीने वाढली सोयाबीनची आवक

सोयाबीनची आवक ही झपाट्याने वाढत आहे तर त्याच तुलनेत दरावरही त्याचा परिणाम हा होत आहे. आवक वाढली की दर घटणार हे बाजाराचे सुत्रच आहे. त्यानुसार सोयाबीनची अवस्था झालेली आहे. सोमवारी बाजार समितीमध्ये तब्बल 40 हजार कट्ट्यांची आवक झाली होती. शनिवारी सोयाबीनची आवत ही 10 हजार कट्ट्यांची होती. आता नविन सोयाबीन दाखल होत असून अशीच अवस्था राहीली सोयाबीनचे दर आणखीन घटतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दोन दिवसापूर्वी सोयाबीनचे मार्केटमधील चित्र

सुरवातीच्या काळात 8910 रुपये क्विंटलवर गेलेले सोयाबीन शनिवारी थेट 8375 येऊन ठेपले आहे. एक दिवसाच्या फरकाने 535 रुपये फरक पडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे ढग आहेत. सोमवारी तर सोयाबीनच्या दरात 2 हजाराने घट झाली आहे. तर उडदाने शेतकऱ्याला दिलासा दिला होता. दोन दिवसापुर्वी 7000 रुपये क्विंटल प्रमाणे विकला जाणारा उडीदाला शनिवारी मात्र, 7200 रुपये असा दर मिळाला आहे. शनिवारी सोयाबीनची 100000 कट्टांची आवक झाली होती. (Soyabean-urad prices fluctuate, chickpea prices stable, market market fluctuations)

संबंधित बातम्या :

मराठवाड्यतील प्रकल्पांनी गाठली सरासरी, शेती सिंचनाचा प्रश्नही मार्गी

पीक पेऱ्याच्या नोंदी वाढवण्यासाठी नांदेड प्रशासनाचा अभिनव उपक्रम, गाव स्तरावर यंत्रणा

‘एफआरपी’ चा साखर कारखानदारांना विसर, राज्यातील कारखान्यांकडे कोट्यावधीची थकबाकी

Non Stop LIVE Update
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.