Lasalgaon : मेंढ्यांच्या दावणीला चक्क कांदा, कारण वाचून चक्रावून जाताल..! नेमकी काय आहे भानगड?

मेंढ्यासाठी 300 क्विंटल कांद्याची खरेदी कशाला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण दादा साळे यांच्याकडे तब्बल 600 मेंढ्या आहेत. दिवसभर या मेंढ्या पडिक क्षेत्रात चरण्यासाठी ते घेऊन जात असत. त्यामुळे चाऱ्याची कधी गरज भासलीच नव्हती. मात्र, यंदा असा काय पाऊस लागून राहिला आहे की, निवाऱ्याच्या बाहेरही मेंढ्या निघत नाहीत. शिवाय मेंढ्यांची संख्या ही शेकडोमध्ये आहे.

Lasalgaon : मेंढ्यांच्या दावणीला चक्क कांदा, कारण वाचून चक्रावून जाताल..! नेमकी काय आहे भानगड?
पावसामुळे मेंढ्या चरायला घेऊन जाणे शक्य नसल्याने चारा म्हणून विकतचा कांदाच त्यांच्यापुढे टाकण्याची नामुष्की मेंढपाळावर ओढावली आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 9:31 AM

लासलगाव : आतापर्यंत घटत्या दरामुळे शेतकऱ्यांनी कांदा काढून बांधावर फेकला किंवा जनावरांच्या दावणीला टाकळा इथपर्यंत ठिक होते. पण गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या (Heavy Rain) पावसामुळे (Sheep to graze) मेंढ्या चरायला घेऊन जाणे शक्य नसल्याने एका मेंढपाळाने (Onion) कांदा खरेदी करुन चक्क मेंढ्यापुढे टाकला आहे. त्यामुळे पावसाने केवळ खरीप हंगामातील पिकांचेच नुकसान केले असे नाही तर शेतकऱ्यांवर काय वेळ आणली आहे याचे उदाहरण पाहवयास मिळत आहे. पिंपळगाव बसवंत येथील मेंढपाळ दादा साळे यांनी मेंढ्यांसाठी असे पाऊल उचलले आहे. यातच कांद्याचे दरही घसरल्याने हे शक्य झाल्याचे साळे यांचे म्हणणे आहे. गेल्या 12 दिवसातील पावसामुळे शेतकऱ्यांचे आणि शेती व्यवसयाचे गणितच बिघडले आहे.

300 क्विंटल कांद्याची खरेदी

मेंढ्यासाठी 300 क्विंटल कांद्याची खरेदी कशाला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण दादा साळे यांच्याकडे तब्बल 600 मेंढ्या आहेत. दिवसभर या मेंढ्या पडिक क्षेत्रात चरण्यासाठी ते घेऊन जात असत. त्यामुळे चाऱ्याची कधी गरज भासलीच नव्हती. मात्र, यंदा असा काय पाऊस लागून राहिला आहे की, निवाऱ्याच्या बाहेरही मेंढ्या निघत नाहीत. शिवाय मेंढ्यांची संख्या ही शेकडोमध्ये आहे. त्यामुळे थोडा-थोडा कांदा विकत घेणे परवडत नसल्याने साळे यांनी एकाच वेळी तब्बल 300 क्विंटल कांद्याची खरेदी केली आहे. सध्या विकतच्या कांदा हाच मेंढ्यांचा चारा आहे.

बाजार समितीची कृपादृष्टी

दादा साळे यांच्याकडे 600 मेंढ्या असल्या त्यांच्या निवाऱ्याची कोणतीच सोय नाही. त्याची कधी त्यांना आवश्यकताही भासली नाही. दरवर्षी पाऊस आला तरी लागलीच उघडीप होत असत. यंदा मात्र, चित्र वेगळे आहे. गेल्या 12 दिवसांपासून पावसाने उघडीप दिलेली नाही. त्यामुळे मेंढपाळाना पिंपळगाव बसवंत बाजार समितीने शेड उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे निवाऱ्याची तर सोय झाली पण चाऱ्याचे काय? त्यामुळे मेंढपाळ हे बाजार समितीमधूनच कांदा विकत घेतात आणि मेंढ्यापुढे टाकतात.

हे सुद्धा वाचा

काय आहेत कांद्याचे दर?

गेल्या काही महिन्यांपासून ‘नाफेड’ च्या माध्यमातून कांद्याची खरेदी केली जात होती. त्यामुळे 1 हजार 400 रुपये क्विंटल असा दरही कांद्याला मिळत होता. कांद्याच्या दर्जावर हा दर ठरलेला होता. पण गेल्या तीन दिवसांपासून नाफेडचे उद्दिष्टपूर्ती झाल्याने खरेदी बंद करण्यात आली आहे. त्याचा बाजारपेठीतील दरावर परिणाम झालेला आहे. त्यामुळे मेंढपाळांना 200 ते 300 रुपेय क्विंटल दराने कांदा मिळत आहे. मेंढ्यासाठी कांदा घ्यावा लागत असल्याने त्याचा दर्जाही खलावलेलाच असतो. मात्र, गरजेच्या वेळी मेंढपाळांना चारा म्हणून कांदा टाकावा लागत आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.