AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतामध्येच टोमॅटोचा ‘लाल चिखल’, भाजीपाला कवडीमोल दरात

मध्यंतरी नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्याने टोमॅटो भर रस्त्यात फेकून दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तर आता शेतामधून काढणीही परवडत नसल्याने तुळजापूर तालु्क्य़ातील शेतकऱ्याने टोमॅटो चक्क शेतातच सडून दिली आहेत. खरिप पिकातूनही नाही आणि भाजीपाल्यातूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आहे.

शेतामध्येच टोमॅटोचा 'लाल चिखल', भाजीपाला कवडीमोल दरात
टोमॅटोचे संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Sep 14, 2021 | 3:15 PM
Share

उस्मानाबाद : पावसाने खरिपातील पिके ही अजूनही पाण्यातच आहेत. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे तर दुसरीकडे भाजीपाल्यातून चार पैसे कमवण्याचे शेतकऱ्यांचे प्रयत्नही निष्फळ ठरत आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून भाजीपाल्याला कवडीमोल दर मिळत आहे. मध्यंतरी नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्याने टोमॅटो भर रस्त्यात फेकून दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तर आता शेतामधून काढणीही परवडत नसल्याने तुळजापूर तालु्क्य़ातील शेतकऱ्याने टोमॅटो चक्क शेतातच सडून दिली आहेत. खरिप पिकातूनही नाही आणि भाजीपाल्यातूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आहे.

तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील सागर वाघमारे याने पदवीचे पूर्ण केले आहे. एवढेच नाही तर बॅंकेतील नौकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. पारंपारिक शेती न करता भाजीपाल्याची लागवड केली होती. यामध्ये प्रामुख्याने त्याने टोमॅटोचे मोठ्या उत्पादन घेतले होते. मात्र, लागवडीपासूनच संकटाची मालिका सुरु आहे ती आतापर्यंत. मध्यंतरी कोरोनामुळे ओढावलेल्या परस्थितीमुळे बाजारपेठा ह्या बंद होत्या. त्यामुळे वाहतूक करणे शक्य झाले नाही. स्थानिक बाजारपेठेत मिळेल त्या दरात विक्री करण्याची नामुष्की वाघमारे यांच्यावर ओढावली होती. किमान आता तरी योग्य दर मिळेल आणि झालेले नुकसान भरुन काढता येईल म्हणून अधिकचा खर्च करून वाघमारे यांनी टोमॅटो जोपासली पण आता बाजारात दरच नसल्याने त्यांनी मालही वावराबाहेर काढलेला नाही. पाण्याचे नियोजन, औषध फवारणी, त्यासाठी आवश्यक असलेला मांडवाचा असा एकरी लाखाहून अधिकचा खर्च त्यांनी केला होता.

मात्र, बाजारात टोमॅटोला 3 ते 4 रुपये दर मिळत असेल तर कसा काढणीचा आणि कर्मचाऱ्यांचा खर्च काढायचा कसा? यामुळे सागरने आहे त्या वावरातच टोमॅटो सडू देण्याचा निर्णय घेतलाय. मध्यंतरी नाशिक जिल्ह्यातील येवला बाजारातही टोमॅटो वाहवातूनच भर रस्त्यावर फेकून देण्यात आली होती तर सिमला मिरचीलाही दर नसल्याने राज्य कृषी मंत्र्याच्या गावातीलच शेतकऱ्याने आक्रमक होत सिमला मिरची रस्त्यावर फेकून दिली होती. (Tomatoes rotten in the field, vegetable prices fall in Market)

उत्पादन तर सोडाच पदरमोड करावी लागली

एका एकरामध्ये सागर वाघमारे याने टोमॅटोची लागवड केली होती. लागवडीपासून काढणीपर्यंत त्यांना एक लाखाहून अधिकचा खर्च आला होता. यामधून पाच लाखाचे उत्पादन वाघमारे यांना अपेक्षीत होते. परंतु, काढणीचाही खर्च परवडत नसल्याने त्यांनी टोमॅटोची काढणी न करता वावरातच ठेवणे पसंत केले आहे.

मुख्य पिकाचे नुकसान भाजीपाला कवडीमोल

पावसामुळे खरिप तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार होता तो भाजीपाल्याचा. मात्र, या भाजी-पाल्याचेही पावसाने नुकसान होत आहे तर दुसरीकडे दर कोसळल्याने कवडीमोल दरात विक्री करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे. भाजीपाल्याची वाहतू्क, काढणी, मशागत आणि बाजारात मिळत असलेला दर याचा ताळमेळ लागत नसल्याने शेतकरी भाजीपाला फेकून देत आहे.

सिमला मिरचीला 4 रुपयाचा भाव

बाजारपेठेत वाढत असलेली भाजीपाल्याची आवक आणि पावसामुळे झालेला परिणाम यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. मध्यंतरी टोमॅटोचे दर कमा झाले होते तर आता सिमला मिरचीचे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करावेत की नाही हा प्रश्नय

इतर बातम्या :

‘ई-पीक पाहणी’ म्हणजे नेमकं काय ? पहा त्याचे फायदे अन् तोटे

मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा, अतुल भातखळकरांची थेट पोलिसात तक्रार

लॉकडाऊनमध्ये रोजगार बुडाला म्हणून खोट्या नोटा छापल्या, नाशकात सात जणांना अटक

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.