‘ई-पीक पाहणी’ म्हणजे नेमकं काय ? पहा त्याचे फायदे अन् तोटे

गावखेड्यात दिवस उजाडताच चर्चा सुरु होत आहे ती 'ई-पीक पाहणी'ची. अनेक शेतकऱ्यांना याबद्दल पुरेशी माहिती नसली तरी कुणालाही गळ घालून 'ई-पीक पाहणी'मध्ये नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे. त्यामुळे नेमकं हे 'ई-पीक पाहणी' काय आहे आणि त्याचे फायदे-तोटे काय हे जाणून घेण्यात आले आहे..

'ई-पीक पाहणी' म्हणजे नेमकं काय ? पहा त्याचे फायदे अन् तोटे
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 14, 2021 | 5:36 PM

लातुर : दोन दिवसांपासून मराठवाड्यात (Marathwada) पावसाने उसंत घेतली आहे. मात्र, शेतकऱ्यांची धावपळ ही सुरुच आहे. गावखेड्यात दिवस उजाडताच चर्चा सुरु होत आहे ती ‘ई-पीक पाहणी’ची. अनेक शेतकऱ्यांना याबद्दल पुरेशी माहिती नसली तरी कुणालाही गळ घालून ‘ई-पीक पाहणी’मध्ये नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे. त्यामुळे नेमकं हे (E-Pik Pahni)’ई-पीक पाहणी’ काय आहे आणि त्याचे फायदे-तोटे काय हे जाणून घेण्यात आले आहे..

आतापर्यंत शेतकऱ्यांच्या पिक पेऱ्याची नोंद ही तलाठी यांच्यामार्फत केली जात होती. प्रत्यक्ष गटात न जाता शेतकरी ज्या पिकाची नावे सांगेल त्याच पिकाचा पेरा झाला असे ग्राह्य धरुण त्याची नोंद होत असत. त्यामुळे नुकसानभरपाईच्या दरम्यान अनेक अडचणींचा सामना आधिकारी यांना करावा लागत होता. अनेक शेतकऱ्यांच्या पिकाच्या नोंदी नसतानाही शासकीय मदत लाटली जात होती. शेतकऱ्याने पेरलेल्या पिकाची अचू्क नोंद शासन दप्तरी व्हावी आणि शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा व्हावा या दृष्टीने ‘ई-पीक पाहणी’ अॅप निर्माण करण्यात आले आहे. यामाध्यमातून शेतकऱ्याने कोणत्या गटामध्ये कोणते पिक घेतले आहे याची नोंद तर होणारच आहे शिवाय ते ठिकाणही अक्षांश / रेखांशमध्ये नोंद केले जाणार आहे.

‘ई-पीक पाहणी’चे असे आहेत फायदे

1) ‘ई-पीक पाहणी’ या अॅपमुळे शेतकऱ्यांच्या पीक पेरणीची अचूक नोंद होणार आहे. यामुळे ना शेतकऱ्याचे नुकसान होणार आहे ना सरकारची फसवणूक. 2) या अॅपरील नोंदीमुळे राज्यात, देशात एखाद्या पिकाचा पेरा किती झाला आहे याची अचूक आकडेवारी एका क्लिकर उपलब्ध होणार आहे. 3) पिकाच्या अचूक आकडेवारीमुळे उत्पादनाबद्दल अंदाज बांधता येतो. यावरुन भविष्यात बी-बियाणे लागणारे खत हे पण उपलब्ध करुन देता येणार आहे. शेतावरील गटावर झालेल्या पीक नोंदीचा फायदा हा देशात कीती क्षेत्रावर कीती ऊत्पन्न झाले हे सांगण्यासाठी देखील होणार आहे. 4) पिकाच्या छायाचित्रामुळे किती अक्षांश: आणि किती रेखाअंशावर कोणत्या पिकाचा पेरा झाला आहे हे समजले जाणार आहे. 5) एका मोबाईलहून 20 शेतकऱ्यांच्या नोंदी करता येणार आहेत. प्रत्येक शेतकऱ्याकडे मोबाईल नसतो त्यामुळेच अशा प्रकारची सोय करण्यात आली आहे.

‘ई-पीक पाहणी’ अॅपमधील त्रुटी

1) ‘ई-पीक पाहणी’बाबत शेतकऱ्यांना आतापर्यंत योग्य जनजागृती आणि मार्गदर्शन झालेले नाही. 2) अत्याधुनिक प्रकारचे मोबाईल वापराची माहिती शेतकऱ्यांना नाही. अॅपमध्ये नेमकी माहिती भरायची कशी हेच शेतकऱ्यांना माहिती नसल्याने शेतकरी या प्रक्रियेकडे दुर्लक्ष करी आहेत. 3) यंदा अशाप्रकारे माहिती भरुन घेतली जात आहे. मात्र, दरवर्षी अशाच प्रकारे शेतकऱ्यांना माहिती द्यावी लागणार हे स्पष्ट नाही.

सर्व शेतकऱ्यांना समावून घेण्याचे सरकारचे धोरण

‘ई-पीक पाहणी’टचे हे पहिलेच वर्ष आहे. असे असतानाही सर्व शेतकऱ्यांना समावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. नुकसान भरपाईची तक्रार नोंदवण्यासाठी ‘फार्मामित्र’ हे अॅप आहे तर पिक पेऱ्याची माहिती नोंदवण्यासाठी ई-पीक पाहणी हे अॅप आहे.

अशाप्रकारे करा आपल्या शेतातील पिकाची ई-पिक पाहणी

शेतकऱ्यांनी प्ले स्टोअर मधून ‘ई-पिक पाहणी’ हे अॅप डाऊनलोड करुन घ्यायचे आहे. हे अॅप ओपन करुन नविन खातेदार नोंदणी करुन घ्यावयाची आहे. यामध्ये आपला जिल्हा, तालुका आणि गावाची निवड करयाची आहे. त्यानंतर खातेदारमध्ये पहिले नाव, मधले नाव, अडनांव आणि गट क्रमांक टाकायचा आहे. गट क्रमांक टाकल्यानंतर शेतकऱ्याला आपले नाव समोर येते. त्यानंतर खातेक्रमांक तपासून आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे जो पुन्हा बदलता येणार नाही. त्यानंतर मोबाईलवर चार अंका पासवर्ड येईल तो कायम लक्षात ठेवावा लागणार आहे. कारण या अॅपमध्ये तोच पासवर्ड लागणार आहे तो एसएमएस द्वारे पाठवला जाईल. यानंतरच तुमची नोंदणी यशस्वी होणार आहे. यानंतर अॅप हे पूर्णपणे बंद करुन चालू करायचे आहे. अॅप पुन्हा चालू केल्यानंतर पुन्हा तुम्हाला खातेदार म्हणजे तुमचे नाव निवडावे लागेल. मॅसेजद्वारे आलेला पासवर्ड येथे नमूद करायचा आहे. त्यानंतर पुढे जाऊन परीचयमध्ये खातेदाराचा फोटो अपलोड करायचा त्यानंतर दिलेली माहिती भरून सबमिट करायचे. त्यानंतर होममध्ये येऊन पिकाची माहिती नोंदवा असा एक फॅार्म येतो. यामध्ये खातेक्रमांक नंतर गट क्रमांक, जमिनीचे क्षेत्र हे हेक्टरमध्ये भरायचे यानंतर हंगाम निवडायचा म्हणजे खरीप की संपूर्ण वर्ष ते निवडायचे, त्यानंतर पिक पेरणीसाठीचे क्षेत्र किती याचा उल्लेख करायचा आहे. त्यानंतर पिकाचा वर्ग यामध्ये जे आपलं पिक आहे तेच निवडायचे यातील वेगवेगळे प्रकारही असू शकतात. त्यानंतर दिलेल्या पर्यापैकी तुमचं कोणतं पिक ते निवडायचे आहे. पुन्हा त्या पिकाचे क्षेत्र भरायचे.. त्यानंतर सिंचनाचे साधन काय आहे त्याचा उल्लेख करायचा त्यानंतर ठिबक पध्दती कशी आहे याची दिलेल्या पर्यातून निवड करायची..त्यानंतर पिक लागवडीची तारीख याची नोंद करायची. त्यानंतर कॅमेराचा पर्याय येईल यातून फोटो काढायचा आणि तो फॅार्म सबमिट करायचा आहे. सबमिट झाल्यानंतर पुन्हा होमवर यायचं ही नोंदवलेली माहिती केवळ तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह झाली.. ती बघायची असेल तर पुन्हा पिकाची माहिती नोंदवा याच्यावर क्लिक करायचे आहे. यामध्येही पिकाची माहिती यावर क्लिक करयाचे यामध्ये तुम्ही भरलेली माहिती दिसेल जी मोबाईलमध्ये सेव्ह झालेली असेल ही माहिती संबंधित सर्वरला पाठवण्यासाठी अपलोड या बटनाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आलेल्या दोन पर्यापैकी परिचय माहिती क्लिक करुन माहीती अपलोड झालेली पहायला मिळते त्याच प्रमाणे पिक माहितीवरती क्लिक करुन अपलोड करायचे आहे…अशा प्रकारे ‘ई-पिक पाहणी’ या अॅपद्वारे आपल्याला पिकाची माहिती भरता येते.

What is ‘e-peak inspection’ ? See peak pahni advantages and disadvantages

संबंधित इतर बातम्या :

ई-पीक पाहणीच्या अंमलबजावणीची शेतकऱ्यांवर सक्ती नको, बच्चू कडूंकडून अडचणींचा पाढा, थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

E-pik pahni: प्रशासनाकडून समर्थन, शेतकऱ्यांमध्ये मात्र नाराजी कायम

राज्यात 15 ऑक्टोंबरपासून होणार ऊसाचे गाळप, साखर कारखान्यांचे ‘बॅायलर’ पेटणार

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.