AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vegetable Price hike : या जिल्ह्यात भाजीपाला महागला, व्यापाऱ्यांनी सांगितलं कारण

Maharashtra Farmer : महाराष्ट्रात सध्या अनेक जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. बहुतांश ठिकाणी अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

Vegetable Price hike : या जिल्ह्यात भाजीपाला महागला, व्यापाऱ्यांनी सांगितलं कारण
Vegetable Price hikeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 03, 2023 | 11:55 AM
Share

महाराष्ट्र : महाराष्ट्रात (Maharashtra) अनेक जिल्ह्यात मागच्या आठदिवसांपासून पाऊस सुरु झाला आहे. काही जिल्ह्यात मध्यम व हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला आहे. काही भागात अजिबात पाऊस न झाल्यामुळे शेतकरी (farmer) वर्ग मोठ्या चिंतेत आहे. कारण जूनच्या महिन्यात ज्या पध्दतीने पाऊस व्हायला हवा होता. त्यापद्धतीने पाऊस झालेला नाही. राज्याच्या अनेक भागात पावसाने ओढ दिली असली तरी, सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील जुन्नर तालुक्यात पावसाची संततधार सुरू असून असल्यामुळे आदिवासी शेतकरी (farmer news) सुखावला आहे. सध्या आदिवासी भागातील शेतीही पावसाने तुडुंब भरली असून पावसाअभावी करपू लागलेल्या भातसाळीच्या रोपांनाही जीवदान मिळालं आहे.

वाशिममध्ये भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढले आहेत. टोमॅटो 120 रुपये, हिरवी मिरची 160 रुपये प्रति किलो आणि कोथिंबीर 50 रुपये जुडीने विकल्या जात आहेत. बाजारात फुल कोबी, भेंडी, दोडकी आणि वांग्याचा दर 80 रुपये प्रति किलो झाला आहे. काही दिवसांनंतर भाजीपाला आणखी महाग होणार आहे.

मागच्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या महिन्यात टोमॅटो २० रुपये किलो होता. सध्या टोमॅटोचा दर १०० रुपये किलो झाला आहे. विशेष म्हणजे काही शहरात १२० रुपये किलो टॅमोटो मिळत आहे. मान्सून महाराष्ट्रात उशीरा दाखल झाल्याचा फटका सामान्य नागरिकांना बसला आहे.

सध्याचे भाज्याचे दर

टोमॅटो – 80 ते 120 रुपये किलो भेंडी – 40 रुपये किलो दुधीभोपळा – 40 रुपये किलो कोबी – 50-60 रुपये किलो कारले – 50-60 रुपये किलो शिमला मिरची – 50 ते 60 रुपये किलो वांगी – 30 रुपये किलो हिरवी मिरची – 60 रुपये किलो लिंबू – 60 रुपये किलो अदरक – 250 रुपये किलो

भाज्याचे दर का वाढले ?

देशात अनेक ठिकाणी मान्सून वेळेत दाखल झालेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी भाजीपाला करपून गेला आहे. त्याचबरोबर अवकाळी पावसाने भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. सध्या भाव अधिक वाढल्यामुळे सामान्य नागरिकांना त्याचा अधिक फटका बसला आहे.

सध्या भाज्याचे वाढलेले दर कमी करण्यासाठी सरकार पुढाकार घेण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुढच्या पंधरा दिवसात टोमॅटोची किंमत कमी होण्याची शक्यता आहे.

ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव, रोहित कुमार सिंग यांनी हिमाचल प्रदेशातील सोलन आणि सिरमौर जिल्ह्यांमधून या दोन जिल्ह्यामधून टोमॅटोचा चांगला पुरवठा झाल्यानंतर दिल्लीत टोमॅटोच्या किरकोळ किमती लगेच खाली येतील. त्याचबरोबर केंद्र सरकार किमती कमी करण्यासाठी उपाय शोधत आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.