मुंबई एपीएमसीत 4 वर्षातील विक्रमी भाजीपाल्याची आवक, दरामध्ये मोठी घसरण

श्रावण महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात नवी मुंबई येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला घाऊक बाजारात वर्षातील उच्चांकी आवक झाली आहे. आज भाजीपाला मार्केटमध्ये 840 गाड्यांची आवक झाली आहे.

मुंबई एपीएमसीत 4 वर्षातील विक्रमी भाजीपाल्याची आवक, दरामध्ये मोठी घसरण
बाजार समिती
Follow us
| Updated on: Aug 16, 2021 | 3:40 PM

नवी मुंबई: श्रावण महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात नवी मुंबई येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला घाऊक बाजारात वर्षातील उच्चांकी आवक झाली आहे. आज भाजीपाला मार्केटमध्ये 840 गाड्यांची आवक झाली आहे. मोठ्या प्रमाणात आवक झाल्यानं भाजीपाला दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. तर जवळपास 4 वर्षांनंतर एवढी मोठी आवक बाजारात झाली असल्याचे व्यापारी सांगत आहेत. यापूर्वी गेल्यावर्षीच्या मकरसंक्रांतीला 813 गाड्यांची आवकर होती. मात्र, चार वर्षांनंतर 840 एवढी आवक झाली आहे. परिणामी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली शिवाय 150 ते 200 भाजीपाला गाड्या बाजार आवारात पडून आहे.

श्रावणात दरवर्षीच भाज्यांना चांगली मागणी असते. भेंडी, हिरवी मिरची, पापडी, वांगी, घेवडा, सिमला मिरची, भुईमूग शेंग, वाटाणा आणि इतर भाज्यांच्या भावात घसरण झाली आहे. तर जवळपास सर्व भाज्यांचे दर 10 रुपये किलोच्या खाली आले आहेत. दरवर्षी श्रावणात भाज्यांना मागणी वाढून दर सुद्धा चांगले मिळतात. मात्र, यावर्षी बाजारभावात घसरणच सुरु असल्याने व्यापारी देखील आवाक झाले आहेत. तर यावर्षीच्या श्रावण मासत भाज्यांच्या आणखी किती दर खाली येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे, असं व्यापारी बबन झेंडे यांनी सांगितलंय.

एपीएमसी भाजीपाला मार्केटमधील सध्यस्थितीत भाजीपाला दर

टोमॅटो 8 रुपये, काकडी 8 ते 10 रुपये , भेंडी 4 ते 8 रुपये, दुधी 8 ते 10 रुपये, वांगी 10 रुपये, फ्लॉवर 6 रुपये, कोबी 6 रुपये, कारली 10 रुपये, मेथी जुडी10 रुपये, कोथांबीर जुडी 8 रुपये असा दर भाज्यांचा राहिला.

श्रावणाच्या पहिल्या शनिवारीही घसरण

श्रावण महिन्याच्या पाहिल्याच शनिवारी मुंबई एपीएमसी भाजीपाला बाजारात भाज्यां दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. याबाबत व्यापाऱ्यांनी देखील आश्चर्य व्यक्त केले आहे. तर गेल्या अनेक वर्षांमधील हा पहिला श्रावण मास आहे, ज्यात भाज्यांच्या दरात प्रचंड घसरण झाली असल्याचे व्यापारी सांगत आहेत. या श्रावणात काही वेगळीच स्थिती पाहायला मिळत आहे. श्रावण मासात मोठ्या प्रमाणात शाकाहार घेतला जातो. त्यामुळे भाजीपाला आणि फळांना मागणी वाढून भाज्यांत दरात वाढ होत असते, मात्र यावेळी तसं घडलेलं नाही.

मुंबई एपीएमसी भाजीपाला बाजारात शनिवारी 620 गाड्यांची आवक झाली होती. आठवड्याचा शेवटचा दिवस असताना पुरेसे ग्राहक बाजारात न आल्याने कवडीमोल भावाने आज भाजीपाला विकावा लागला. जवळपास सर्वच भाज्यांचे दर 10 रुपये प्रतीकिलोच्या खाली आले होते.

इतर बातम्या:

भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण, मुंबई बाजार समितीकडे ग्राहकांची पाठ, हे पहिल्यांदाचं घडतंय, व्यापाऱ्यांचं मत

मुंबई एपीएमसी परिसरात कारमध्ये अचानक स्पार्क, काही सेकंदात जळून खाक

Vegetables rates down in Mumbai Apmc on second Monday of Shravana Month

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.