Weather Update: पावसात खंड पडल्यानं उष्णता, आर्द्रता वाढल्यानं नागरिक त्रस्त, विदर्भात जून महिन्यात किती पाऊस?

गजानन उमाटे

| Edited By: |

Updated on: Jul 01, 2021 | 6:16 PM

विदर्भात यंदा मान्सून वेळेआधी दाखल झालाय. शिवाय जून महिन्यात अकोला सोडल्यास विदर्भातील सर्वच जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलाय. (Weather Update)

Weather Update: पावसात खंड पडल्यानं उष्णता, आर्द्रता वाढल्यानं नागरिक त्रस्त, विदर्भात जून महिन्यात किती पाऊस?
प्रातिनिधिक फोटो

Follow us on

नागपूर: महाराष्ट्रात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल झाला. मात्र, जूनच्या अखेरच्या काही दिवसांमध्ये पावसानं दडी मारली आहे. आपल्याकडे मान्सूनचा पाऊस अरबी समुद्रावरुन येतो. विदर्भात यंदा मान्सून वेळेआधी दाखल झालाय. शिवाय जून महिन्यात अकोला सोडल्यास विदर्भातील सर्वच जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलाय. पावसामध्ये आता खंड पडल्यानं वातावरणातील उष्णता वाढली असून आर्द्रता वाढलीय, अशी माहिती नागपूर हवामान विभागाचे संचालक मोहनलाल शाहू यांनी सांगितलं. (Weather Update  Heat and Humidity increased due to lack of Rain in Vidarbha)

आर्द्रता वाढल्यानं नागरिाकांना त्रास

महाराष्ट्रासह राज्यातील विविध भागात पावसानं दडी मारल्यानं चिंता वाढली आहे. नागपूरसह विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड पडल्याने वातावरणातील उष्णता वाढली. यासोबत वातावरणात आर्द्रता वाढलीय. गेल्या काही दिवसांत विदर्भात तापमान सर्वसामान्य असलं तरिही आर्द्रता वाढल्याने लोकांना असह्य होत आहे. चांगला पाऊस येईपर्यंत अशीच स्थिती राहिल, असं हवामान विभागाचं मत आहे.

विदर्भात अकोला वगळता सरासरीपेक्षा अधिक पाऊस

नागपूर हवामान विभागाचे संचालक मोहनलाल शाहू यांनी जून महिन्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाल्याची माहिती दिली. जून महिन्यात जितका पाऊस होतो त्यापेक्षा सरासरीच्या 19 टक्के अधिक पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.

चंद्रपूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस

बुधवार प्रमाणं चंद्रपुरात गुरुवारी देखील जोरदार पाऊस झाला. धान उत्पादक शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा होती. सोयाबीन-कापूस- धान ही पिकं जगविण्यासाठी पाऊस आवश्यक होता. 1200 मिमी वार्षिक सरासरीच्या जिल्ह्यात केवळ 22 टक्के पाऊस संपूर्ण जून महिन्यात पडला. जून महिन्यात 20 दिवसांची उघडीप झाली होती. प्रचंड उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसाच्या आगमनाने दिलासा मिळाला आहे.

30 जून पर्यंतचे राज्यातले पावसाचे चित्र

राज्यात मान्सून सक्रिय झाल्यापासून सातारा, कोल्हापूर, मुंबई, जालना, परभणीमध्ये सर्वाथिक पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. तर सर्वात कमी पाऊस अकोला, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये झाला आहे. तर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पुणे, सांगली,पालघर, औरंगाबाद, बीड, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर मध्ये नियमित सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झालीय. तर, नाशिक, अहमदनगर, बुलडाणा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, गडचिरोली, गोंदियामध्ये देखील समाधानकारक पाऊस झाला आहे.

संबंधित बातम्या

कृष्णा साखर कारखान्यावर कुणाची सत्ता? शेतकऱ्यांचा कौल कुणाला? प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण

चाळीसगावमधील भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू, आई, वडील आणि बहिण गमावलेला चिमुरडा गंभीर जखमी

Weather Update  Heat and Humidity increased due to lack of Rain in Vidarbha

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI