Sangola : वातावरणातील बदलाने डाळिंब बागा उध्वस्त, शेतकरी परिषदेत नेमका तोडगा काय?

यंदा वातावरणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम हा फळपिकांवर झालेला आहे. आंबा आणि द्राक्षाच्या उत्पादनात घट झाली असली तरी सांगोल्यात मात्र, डाळिंब बागा मोडाव्या लागल्या आहेत. तालुक्यातील कोरडवाहू क्षेत्रावर शेतकऱ्यांनी ही किमया साधली असली तरी वातावरणातील बदल आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे डाळिंब बागांचे अस्तित्वच धोक्यात येऊ लागले आहे. मध्यंतरी खोडकिडीचा नेमका परिणाम काय याची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक थेट बांधावर दाखल झाले होते. तर गुरुवारी तालुक्यातील महुद येथे डाळिंब उत्पादकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

Sangola : वातावरणातील बदलाने डाळिंब बागा उध्वस्त, शेतकरी परिषदेत नेमका तोडगा काय?
सांगोला तालुक्यातील महुद येथे डाळिंब उत्पादकांचे प्रश्न जाणून घेण्याासाठी शेतकरी परिषद पार पडली.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 9:35 AM

सोलापूर : यंदा (Climate Change) वातावरणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम हा फळपिकांवर झालेला आहे. आंबा आणि द्राक्षाच्या उत्पादनात घट झाली असली तरी सांगोल्यात मात्र, (Pomegranate Grower) डाळिंब बागा मोडाव्या लागल्या आहेत. तालुक्यातील कोरडवाहू क्षेत्रावर शेतकऱ्यांनी ही किमया साधली असली तरी वातावरणातील बदल आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे डाळिंब बागांचे अस्तित्वच धोक्यात येऊ लागले आहे. मध्यंतरी खोडकिडीचा नेमका परिणाम काय याची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक थेट बांधावर दाखल झाले होते. तर गुरुवारी तालुक्यातील महुद येथे डाळिंब उत्पादकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी (Farmer Council) शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कृषितज्ञांनी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तर राजकीय नेत्यांनी सोई-सुविधा उभारणार असल्याचे आश्वासन. यामुळे डाळिंब उत्पादकांच्या अडचणी मिटणार का हे पहावे लागणार आहे.

डाळिंब बागांना नेमका धोका कशाचा?

सांगोलाकरांनी कोरडवाहू क्षेत्रावर डाळिंब बहरले आहे. अथक परीश्रम आणि पीक पध्दतीमध्ये सातत्य ठेवल्याने हे शक्य झाले आहे. तालुक्याात तब्बल 22 हजार 700 हेक्टरवर डाळिंब लागवड करण्यात आली आहे. मात्र, वातावरणातील बदलामुळे उत्पादनात तर घट झालीच आहे पण पीन होल बोरर अर्थात खोडकिडीमुळे तब्बल 17 हजार 500 हेक्टरावरील बागा बाधित झाल्या आहेत. डाळिंबामुळे तालुक्याचे वैभव गेल्या 20 ते 25 वर्षापासून टिकून आहे. आता डाळिंब उत्पादकांना अस्मानी संकटाचा सामना करावा लागत असल्याचे आ. शहाजी बापू पाटील यांनी सांगितले. तर डाळिंब बागा जीवंत ठेवयच्या असतील तर योग्य ती उपाययोजना राबवणे गरजेचे आहे.

डाळिंब संशोधन केंद्रासाठी पाठपुरावा : मंत्री छगन भुजबळ

तालुक्यातील महुद येथे पार पडलेल्या शेतकरी परिषदेस अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ देखील उपस्थित होते. रोग, किड आणि अतिवृष्टीमुळे यंदा फळबागायत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सांगोल्यात डाळिंबाचे तर नाशकात द्राक्षाचे नुकसान झाले आहे. रोगांसह किडीवर उपाययोजना शोधण्याचे काम हे कृषी विद्यापीठांसह कृषी विज्ञान केंद्राचे आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक भागात संशोधन केंद्र उभारणीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. मात्र, मंजूर संशोधन झालेले संशोधन केंद्र इतर ठिकाणी गेले आहे. असे दोन वेळा झाल्याचेही आ. शहाजी पाटील यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

शेतकऱ्यांसह लोकप्रतिनीधींचा संशोधन केंद्रावरच ठपका

शेतकऱ्यांना मार्गदर्शन हाच संशोधन केंद्राचा खरा उद्देश आहे. मात्र, डाळिंब बागा धोक्यात असताना किंवा वातावरणातील बदलानंतरही संशोधन केंद्राकडून शेतकऱ्यांना योग्य असे मार्गदर्शन झाले नसल्याचा सूर या शेतकरी परिषदेत उमटला होता. संशोधन केंद्राकडून उंटावरुन शेळ्या हाकण्याचे काम झाले आहे. सांगोल्यातील शेतकऱ्यांनी जलक्रांती करुन डाळिंबाच्या बागा जोपासल्या आहेत. त्यामुळे खोडकिड आणि अन्य रोगांबाबत योग्य ते मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. मध्यंतरी केंद्रीय पथकानेही डाळिंबाच्या लागवडीत आणि अतिवृष्टीमध्ये काळजी घेण्यात शेतकऱ्यांकडून चूक झाल्याचे सांगितले पण खोड किडीचा बंदोबस्त कसा करायचा याचे मार्गदर्शन झाले नाही. या शेतकरी परिषदेस जलतज्ञ राजेंद्रसिंह, मंत्री छगन भुजबळ, आमदार शहाजी पाटील, माजी आमदार दिपक साळुंखे यांची उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

Central Government : शेतकऱ्यांचे उत्पन्न करण्यासाठी सरकारचे काय आहे धोरण, कृषीमंत्र्यांनीच सांगितला Plan..!

‎SMAM Kisan Yojana : शेती उपकरणे खरेदी करताय? मग ‘या’ योजनेचा लाभ घ्याच..!

ऊस उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान होऊ देऊ नका, अजितदादांच्या सूचना; हार्वेस्टर ताब्यात घेण्याचेही आदेश

Non Stop LIVE Update
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.