रिस्क नव्हे उत्पन्न फिक्स! शेतीत चौपट उत्पादन वाढ, Multi Layer Farming एकदा करुन पाहाच!

Multi Layer Farming : अनेक शेतकरी कमी खर्चात जास्त नफा मिळवण्यात यशस्वी होत आहे. शेतकरी सध्या एका नव्या पीकपद्धतीचा वापर करत आहेत, ज्यामुळे त्यांना भरघोस नफा मिळत आहे.

  • Updated On - 4:50 pm, Sat, 24 April 21
रिस्क नव्हे उत्पन्न फिक्स! शेतीत चौपट उत्पादन वाढ,  Multi Layer Farming एकदा करुन पाहाच!
'किसान सन्मान निधी' शिवाय शेतकऱ्यांचे आर्थिक आरोग्य सुधारण्यासाठी सरकारकडून स्वस्त दरात कर्जदेखील दिले जाते. किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) च्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार सहजपणे शेतीसाठी कर्ज मिळते. आपण शेतकरी असल्यास आपण केसीसी योजनेचा लाभ घेऊ शकता.

मुंबई : शेतकरी सध्या पारंपारिक शेतीला फाटा देत, (Farmer) नवे प्रयोग करत आहेत. त्यातूनच नवी पीकपद्धती, नव्या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी कमी खर्चात जास्त नफा मिळवण्यात यशस्वी होत आहे. शेतकरी सध्या एका नव्या पीकपद्धतीचा वापर करत आहेत, ज्यामुळे त्यांना भरघोस नफा मिळत आहे. शेतकरी बहुस्तरीय पीकपद्धतीचा ( Multi Layer Farming) वापर करत आहेत. त्यामुळे एकाचवेळी शेतकरी 3-4 पीकं घेऊन, कमी कालावधीत नफा मिळवत आहेत. (What is Multi Layer Farming farmers may gets 4 time extra income all about to know)

बहुस्तरीय पद्धतीमुळे केवळ मशागत, पाणी किंवा खर्चात बचत होते असं नाही, तर नफ्याचं प्रमाणही वाढतं. बहुस्तरीय पद्धती नेमकी काय? शेतकरी नेमका कसं नफा कमावत आहेत, त्याचाच आढावा

बहुस्तरीय पीक पद्धती 

बहुस्तरीय पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना आधी तीन ते चार पिकांची निवड करावी लागते. एक पीक जे जमिनीत म्हणजे आत येतं तर दुसरं जमिनीवर येतं, अशी निवड करावी. त्यानंतर द्राक्ष किंवा वेलीसारखे वाढणाऱ्या पिकांची निवड करावी. पिकांची निवड करताना माती परीक्षण, वायू, पाणी यांचा आढावा घेऊनच पिकं निवडावी.

बहुस्तरीय शेती कशी होते?

याप्रकारच्या शेतीचा सर्व खेळ हा पिकांची निवड आणि त्यांची लागवड यावर आहे. अनेक शेतकरी उन्हाळ्याऐवजी हिवाळ्याची निवड लागवडीसाठी करतात. ते गरजेचंही असतं. जसे आल्याची लागवड काही शेतकरी जमिनीच्या पोतानुसार फेब्रुवारीत करतात. त्याची नीट लागवड झाल्यावर, त्याचवेळी पालेभाजीची लागवड केली जाते. याच शेतात तारेच्या सहाय्याने वेल असणाऱ्या पालेभाज्या-फळभाज्यांची लागवड केली जाते. अशामुळे संपूर्ण जमिनीला वेल असणाऱ्या पीकामुळे आधार मिळतो. उन्हाच्या झळा थेट जमिनीवर पोहोचत नाहीत किंवा अवकाळी पाऊस झाला तरी पीकाला फटका बसत नाही.

एकीकडे ही लागवड झाल्यानंतर मध्येच पपईसारख्या फळ पिकांची लागवड केली जाते. या सर्वांची लागवड करताना पिकांना फटका बसणार नाही याची खबरदारी घ्यावी लागते.

या सर्व प्रक्रियेसाठी तुम्ही कृषी केंद्रांचं सहकार्य जरुर घ्या. त्यांच्या सल्ल्यानुसार वर्षाचं नियोजन करुन पिकांची निवड, लागवड, मशागत सर्व ठरवून घ्या.

एकाचवेळी चार पिकांचा फायदा

एकाचवेळी चार पिकं घेतल्यामुळे मोठा फायदा होतो. एकाच जमिनीत ही सर्व पिकं घेतली जातात. त्यामुळे जागा वाचते. शिवाय पाणी देण्यासाठीही प्रत्येक पिकाला वेगळं पाणी देण्याची गरज नाही. याशिवाय मशागत, खतं यांचीही बचत होते. इतकंच नाही तर यामध्ये नुकसानीचा धोकाही खूपच कमी राहतो. परिणामी नफा निश्चित वाढतो.

किती फायदा होऊ शकतो?

जर सर्व काही नीट झालं तर तुम्हाला नियमित नफ्यापेक्षा चार ते आठपट नफा मिळू शकतो. बहुस्तरिय शेतीमुळे कमी खर्चात जास्त नफा मिळतो. एका पिकामुळे दुसऱ्या पिकाला पोषक तत्व मिळतात. शिवाय पाणी, खतं आणि मशागत यांची बचत झाल्याने होणारा फायदाही मोठा आहे. जर ढोबळ हिशेब काढला तर 1 वर्षात 1 एकर शेतीत 5-7 लाख रुपयांची बचत होते.

संबंधित बातम्या 

शेतकऱ्यांच्या खिशात पैसे आले आणि चेहऱ्यावर आनंद; वाचा, काय आहे डीबीटी योजना? 

उन्हाळ्यात मिल्की मशरुमची शेती करा अन् दहापट पैसा कमवा; कमाईची ही अफलातून आयडिया वाचाच!

(What is Multi Layer Farming farmers may gets 4 time extra income all about to know)