प्रतीक्षा संपली! येत्या 6 महिन्यात येणार ‘या’ 5 इलेक्ट्रिक एसयूव्ही
ऑटो कंपन्या सणासुदीच्या काळात अनेक नवीन इलेक्ट्रिक वाहने लाँच करण्याच्या तयारीत आहेत. महिंद्रा, विनफास्ट आणि मारुती सुझुकी सारख्या कंपन्या नवीन ईव्ही एसयूव्ही घेऊन बाजारात धुमाकूळ घालण्याच्या तयारीत आहेत.

तुम्हाला इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल तर ही बातमी नक्की वाचा. कारण, येत्या काळात म्हणजेच येत्या 6 महिन्यात काही खास कार बाजारात येत आहेत. त्यामुळे तुम्हाला देखील कार खरेदीला अनेक पर्याय मिळू शकतात. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.
ऑटो कंपन्या सणासुदीच्या काळात धुमाकूळ घालण्याच्या तयारीत असून, यंदा सणासुदीच्या काळात अनेक नवीन इलेक्ट्रिक वाहने लाँच होण्याची शक्यता आहे. बाजारात इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीचा फायदा घेण्यासाठी महिंद्रा, मारुती सुझुकी आणि विनफास्ट सारखे प्रमुख ब्रँड नवीन वाहने बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. चला तर मग जाणून घेऊया पुढील 6 महिन्यांत कोणते नवे मॉडेल्स भारतीय रस्त्यांवर येणार आहेत.
VinFast VF 6 आणि VF 7
Gaadiwaadiने दिलेल्या वृत्तानुसार, सणासुदीच्या पार्श्वभूमीवर विनफास्टने तामिळनाडू प्लांटमध्ये सीकेडी मार्गाने VinFast VF 6 आणि VF 7 चे असेंबलिंग सुरू केले आहे. ड्रायव्हिंग रेंजबद्दल बोलायचे झाले तर ही वाहने एकदा चार्ज केल्यावर 480 किलोमीटरपेक्षा जास्त रेंज देऊ शकतात. कंपनीने या मॉडेल्ससाठी बुकिंग घेण्यास सुरुवात केली आहे, दोन्ही एसयूव्ही भरपूर फीचर्स आणि टेक्नॉलॉजीने सुसज्ज असतील. Maruti Suzuki e Vitara
Maruti Suzuki e Vitara लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे, देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेसाठी गुजरात प्लांटमध्ये त्याचे उत्पादन केले जाईल. मिड साइज इलेक्ट्रिक एसयूव्ही 2026 च्या सुरुवातीच्या महिन्यांत लाँच होण्याची शक्यता आहे आणि डेल्टा, झेटा आणि अल्फा पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. ही एसयूव्ही 61.1 किलोवॉट आणि 48.8 किलोवॅट बॅटरीपर्यायांसह उपलब्ध असण्याची शक्यता आहे आणि एकदा चार्ज केल्यावर 500 किमीपेक्षा जास्त रेंज देऊ शकते.
Mahindra XEV 7e और XUV 3XO EV
महिंद्रा आपली पहिली थ्री रो इलेक्ट्रिक एसयूव्ही एक्सईव्ही 7 ई लाँच करणार असून ती एक्सयूव्ही.ई 8 संकल्पनेवर आधारित आहे. यात एक्सयूव्ही 700 ची ट्रिपल स्क्रीन, पॅनोरॅमिक सनरूफ आणि एडीएएस सारखे फीचर्स मिळतील, याशिवाय यात एक्सईव्ही 9E आणि BE6 सारखे बॅटरी पर्याय दिले जाऊ शकतात.
यासोबतच एक्सयूव्ही 3XO ईव्हीचीही सतत चाचणी घेतली जात आहे, जर ही गाडी लाँच झाली तर एक्सयूव्ही 400 च्या खाली लाँच केली जाऊ शकते. एक्सईव्ही 7E आणि एक्सयूव्ही 3EO ईव्ही दोन्ही 2026 च्या पहिल्या सहामाहीत लाँच होण्याची अपेक्षा आहे.
