New Generation Mahindra XUV500 ची वाट पाहताय? नव्या कारबाबत कंपनीचा मोठा निर्णय

भारतीय वाहन निर्माता महिंद्रा (Mahindra) येत्या काळात नवीन XUV500 सह अनेक नवीन वाहने लाँच करण्याची योजना आखत आहे.

New Generation Mahindra XUV500 ची वाट पाहताय? नव्या कारबाबत कंपनीचा मोठा निर्णय
Mahindra XUV500
Follow us
| Updated on: Apr 01, 2021 | 7:13 AM

मुंबई : भारतीय वाहन निर्माता महिंद्रा (Mahindra) येत्या काळात नवीन XUV500 सह अनेक नवीन वाहने लाँच करण्याची योजना आखत आहे. स्कॉर्पियो आणि बोलेरो निओ या गाड्यादेखील या यादीत आहेत. हे मॉडेल्स या वर्षाच्या अखेरपर्यंत लाँच केले जातील. न्यू जनरेशन महिंद्रा एक्सयूव्ही 500 या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत लाँच करण्याची योजना आखण्यात आली होती, परंतु आता ती योजना 2021 वर्षाच्या उत्तरार्धात शिफ्ट करण्यात आली आहे. (Bad news for customers waiting for New Generation Mahindra XUV500, company took big decision)

टीम बीएचपीच्या अहवालानुसार न्यू जनरेशन महिंद्रा XUV500 चं लाँचिंग सप्टेंबर 2021 मध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत, या नवीन मॉडेलचं वितरण नोव्हेंबर 2021 पासून सुरू होईल. यामुळे न्यू जनरेशन महिंद्रा स्कॉर्पिओच्या लाँचिंग डेटवरही याचा परिणाम होऊ शकतो. तसेच जागतिक बाजारातील सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे देखील हे लाँचिंग पुढे ढकलले जाऊ शकते.

फीचर्स

न्यू जनरेशन महिंद्रा XUV500 नवीन फ्रंट व्हील ड्राइव्ह monocoque प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. ही कार दोन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये 2.0 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि 2.2 लीटर टर्बोचार्ज्ड डिझेलचा समावेश आहे. पेट्रोल इंजिन 190bhp आणि 350Nm टॉर्क देतं तर डिझेल इंजिन 180bhp ची पॉवर देतं. दोन्हीमध्ये आपल्याला 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड टॉर्क कनव्हर्टर ऑटोमॅटिक मिळेल.

नवीन XUV500 अनेक सेगमेंटमधील दमदार फीचर्ससह येते, ज्यामध्ये ADAS म्हणजेच अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिमचाही समावेश आहे. ड्रायव्हर असिस्टन्स फीचर्समध्ये ऑटोनॉमस इमरजन्सी ब्रेकिंग अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल फ्रंट कॉलिजन वॉर्निंग, लेन डिपार्चर वॉर्निंग आणि पार्क असिस्टचा समावेश आहे. सेफ्टी आणि सुरक्षेसाठी यामध्ये तुम्हाला अनेक एअरबॅग्स, पार्किंग सेन्सर्स, 360 डिग्री कॅमेरा, ESP आणि टायर प्रेशर मॉनिटरसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

या कारमधील आणखी काही वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाल्यास यामध्ये तुम्हाला, एक टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल दिले जाईल. ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, पॅनारोमिक सनरूफ, पॉवर ड्रायव्हर सीट, वेंटिलेटेड सीट्स, कीलेस एन्ट्री अशी सर्व वैशिष्ट्ये या एसयूव्हीमध्ये मिळतील.

इतर बातम्या

2 रुपयात 5 किमी धावणार, ‘ही’ इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या उड्या

Kia ची इलेक्ट्रिक कार EV6 चा फर्स्ट लूक जारी, नव्या डिझाईनसह कार सादर होणार

तुमच्याकडे मारुती सुझुकीची ‘ही’ कार असल्यास सावध व्हा; क्रॅश टेस्टमध्ये नापास

Renault Kiger खरेदी करताय? इतके महिने वाट पाहावी लागेल

(Bad news for customers waiting for New Generation Mahindra XUV500, company took big decision)

Non Stop LIVE Update
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?.