AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गडकरी गाडी ‘स्वस्त’करी | तर दिवाळीपूर्वी १२५ सीसी पर्यंतच्या टू-व्हिलर्सची किमती कमी होण्याची शक्यता

नव्या टू व्हिलर महागल्याने जुन्या टू व्हिलर गाड्यांना मागणी आली आहे. जुन्या टू व्हिलर मालकांनी ही गाडी, गाडीच्या शोरुममधून ज्या किंमतीने घेतली. त्यापेक्षा जास्त किंमतीत विकण्यात सुरुवात केली आहे.

गडकरी गाडी 'स्वस्त'करी | तर दिवाळीपूर्वी १२५ सीसी पर्यंतच्या टू-व्हिलर्सची किमती कमी होण्याची शक्यता
gadkariImage Credit source: socialmedia
| Updated on: Aug 12, 2023 | 1:32 PM
Share

मुंबई | 11 ऑगस्ट २०२३ : केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितिन गडकरी यांचे बहुतेक निर्णय हे क्रांतीकारी असतात. नितिन गडकरी यांचा एक किस्सा अनेकांना माहित असेल, ते कसे स्कूटरवर पक्ष वाढवण्यासाठी गावोगावी फिरले. अर्थात टू-व्हीलरवर जगण्याची धडपड ही नितिन गडकरी यांनी जवळून पाहिली आहे. सर्वसामान्यांच्या कुटुंबासाठी १०० सीसी किंवा १२५ सीसी वाहन एक मोठं स्वप्न असतं, अनेकांची रोजंदारी त्यावर अवलंबून असते. पण जीएसटीच्या फेऱ्यात ही जगण्याची धडपड असलेली टू-व्हिलर लक्झरी समजून तिच्यावर आणि तिच्या पार्टसवर जीएसटी लावला गेला, काही बाबतीत १८ ते काही ठिकाणी २८ टक्के. अगदी २०१६ साली होंडा अ‍ॅक्टीव्हा ५२ ते ५४ हजारांना मिळत होती, ती आता ८८ हजारांवर आली आहे. यामुळे सर्वसामान्यांची पायपीट आणि जगण्याची धडपड अधिक कठीण होऊन बसली आहे.

प्राथमिक स्तरावरील गाड्या, ज्या आरामदायी वा स्पोर्टस बाईक नाहीत, त्यांना २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी आल्याने त्यांच्या किंमती दुप्पट झाल्या आहेत. सर्वसामान्यांसाठी आता या गाड्या पाहतच राहणे हे स्वप्न पूर्ण करण्याचा एकमेव मार्ग राहिलेला आहे. २०१६ मध्ये ज्यांनी ५५ हजारांना मोटरसायकल घेतली, तिची किंमत सेकंड हॅण्डच्या किंमतीत तेवढीच, किंवा त्याच्यापेक्षा जास्त झाली आहे. होंडा अ‍ॅक्टीव्हा लोकांनी २०१६ साली जेवढ्या किंमतीला घेतली, त्यापेक्षा जास्त किंमतीत ती विकली जात आहे, अनेक कंपन्यांच्या टू व्हिलर वाहनांच्या बाबतीत असंच घडतंय. बाईकच्या किंमती दुप्पट वाढल्याने सर्वसामान्यांचा भ्रमनिरास झाला आहे. गाडीची किंमत ८० ते ९० टक्क्यांनी वाढल्याने, टू व्हिलरच्या विक्रीत मोठी घट झाली आहे.

जुन्या गाड्यांना किंमत जास्त

नव्या टू व्हिलर महागल्याने जुन्या टू व्हिलर गाड्यांना मागणी आली आहे. जुन्या टू व्हिलर मालकांनी ही गाडी, गाडीच्या शोरुममधून ज्या किंमतीने घेतली. त्यापेक्षा जास्त किंमतीत विकण्यात सुरुवात केली आहे. अर्थात सर्वसामान्यांना दोन्ही बाजूंनी फटका हा ठरलेला आहे. गाडी जुनी घ्या, किंवा नवी, पडणार ती महागातच. हे सर्व झालं आहे ते फक्त जीएसटीमुळे, यामुळे टू व्हिलर वाहन उद्योगातील विक्री मंदावल्याचीही चर्चा आहे. ही कोंडी नितिन गडकरी यांच्याकडून फोडली जाईल, अशी अपेक्षा दिसून येत आहे. असं झालं तर सर्वसामान्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी असणार आहे.

गडकरींमुळे आशा पल्लवित

देशातील वाहन विक्रेत्यांची संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने (FADA) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन एंट्री लेव्हल दुचाकींवरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी)चा आढावा घेण्याची मागणी केल्याने ही आशा पल्लवीत झाली आहे. एंट्री लेव्हल मोटरसायकल टू-व्हीलरवर २८ टक्के जीएसटी आकारला जातो. FADA ने मंत्र्याला पत्र पाठवून GST दर 18 टक्के करण्याची विनंती केली आहे. सर्वोच्च जीएसटी दर आकर्षित करण्यासाठी मोटारसायकल आणि स्कूटरला लक्झरी वस्तू मानता येणार नाही, असेही FADA ने यापूर्वी स्पष्ट केले होते.

अशी वाढली किंमत

जीएसटी दरांचा दुचाकींच्या किंमतीवर आणि त्यायोगे सेगमेंटमधील विक्रीवर कसा परिणाम झाला हे FADA ने हिशेब करुन सांगितले आङे. लोकप्रिय Honda Activa स्कूटरची किंमत 2016 मध्ये 52,000 रुपयांवरून 2023 मध्ये 88,000 रुपयांपर्यंत वाढली आहे. त्याचप्रमाणे, बजाज पल्सरची किंमत 2016 मध्ये 72,000 रुपयांवरून 1.5 लाख रुपयांवर गेली आहे.

70 टक्क्यांहून अधिक वाटा

100 cc आणि 125 cc मधील मॉडेल्ससह, दुचाकी विभागातील एकूण विक्रीत 70 टक्क्यांहून अधिक वाटा आहे, असे डीलर्स असोसिएशनने म्हटले आहे. परंतु कोविड महामारी आणि लॉकडाऊनमुळे या विभागातील विक्रीत सातत्याने घट झाली आहे. एचटी ऑटोने अहवाल दिला आहे की FADA चे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया म्हणाले की प्री-कोविड स्तरावर परत येण्यासाठी आणि विक्रीतील घट दूर करण्यासाठी प्रोत्साहन आवश्यक आहे.

मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.