AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवघ्या 1.10 लाखात खरेदी करा Maruti Wagon R, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल तर काळजी करण्याची गरज नाही.

अवघ्या 1.10 लाखात खरेदी करा Maruti Wagon R, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
Wagon R (PS- OLX)
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jun 26, 2021 | 10:23 PM
Share

मुंबई : तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत कार खरेदी करु शकाल. (bumper offer! buy Maruti Wagon R in just rs 110000, know more about it)

कोरोना काळात आपल्याकडे स्वतःची वैयक्तिक कार असणे गरजेजे झाले आहे. जर आपण सेकंड हँड कार (Second Hand Car) विकत घेण्याचा विचार करत असाल परंतु बजेटमुळे चिंतेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार डीलबाबत माहिती देणार आहोत.

परवडणारी किंमत, मायलेज आणि फीचर्समुळे मारुती सुझुकी वॅगनआर (Maruti Suzuki Wagon R) ही कंपनीच्या सर्वाधिक विक्री करणाऱ्या कारच्या यादीत समाविष्ट आहे. या कारची किंमत 4.80 लाखांपासून सुरू होते आणि 7.40 लाखांमध्ये ही कार खरेदी करता येते. परंतु आपण ही कार सेकंड हँड कार मार्केटमधून (Second Hand Car Market) खूपच कमी किंमतीत खरेदी करू शकता. ही कार ओएलएक्स (OLX) या वेबसाइटवर सूचीबद्ध आहे. एकंदरीत, ही एक शानदार डील आहे.

अवघ्या 1.10 लाखात खरेदी करा Maruti Suzuki WagonR 1.0 LXi

ही सेकेंड ऑनरशिप कार असून महाराष्ट्राच्या क्रमांकावर नोंदवलेली आहे. कारचे मेकिंग ईयर 2007 आहे आणि ती फक्त 1,10,000 रुपयांमध्ये सूचीबद्ध करण्यात आलेली आहे. अधिक माहिती मिळविण्यासाठी आपण विक्रेत्याशी संपर्क साधू शकता.

कशी आहे कार?

वेबसाइटवर दिलेल्या तपशीलांनुसार ही कार केवळ 52,000 किमी चालली आहे. हे कारचं LXI मॉडेल (मॅन्युअल ट्रांसमिशनसह) आहे. ही एक पेट्रोल कार आहे. कारच्या फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास, यामध्ये 998 CC क्षमतेचं इंजिन देण्यात आलं आहे. कारच्या मालकाने दिलेल्या माहितीनुसार कार चांगल्या स्थितीत आहे. कारचं इंजिन उत्तम आहे. ही कार चांगल्या प्रकारे मेन्टेन करण्यात आली आहे.

सध्या विक्रेत्याने या कारची किंमत केवळ 1,10,000 रुपये ठेवली आहे, परंतु आपण विक्रेत्याशी बोलू शकता आणि ही कार अजून कमी किंमतीत खरेदी करु शकता.

महत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड कार घेणार असाल तर सर्व बाजूंनी कार तपासून पाहा. कारचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. कार मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, कार आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच ही कार खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही ओएलएक्सवरुन घेतली आहे.

इतर बातम्या

अपडेटेड डिझाईन, जबरदस्त फीचर्ससह रेनॉ अधिकृत Dacia ची 2022 Duster बाजारात

5 नव्या फीचर्ससह Maruti Suzuki Baleno लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या कशी असेल नवी कार

लांचिंगआधीच Hyundai च्या ‘या’ SUV साठी 4000 हून अधिक बुकिंग्स, डिझेल व्हेरिएंटला पसंती

(bumper offer! buy Maruti Wagon R in just rs 110000, know more about it)

Follow Us
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?.
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय.
महिलेला नको तसे व्हिडीओ पाठवले अन् कार्यालयातच.... NCP अजित पवार गटात
महिलेला नको तसे व्हिडीओ पाठवले अन् कार्यालयातच.... NCP अजित पवार गटात.
NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा...
NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा....
मोठी बातमी! पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मात्र कारण काय?
मोठी बातमी! पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मात्र कारण काय?.
कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत
कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत.