AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Citroen C5 Aircross ची पहिली झलक पाहिलीत का? ‘या’ फीचर्सने ठरतेय खास…

एसयुव्ही लाँच झाल्यानंतर Citroen C5 Aircross फेसलिफ्ट डीलरशिपवर येण्यास सुरुवात झाली आहे. नवीन एसयुव्हीमध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. सिट्रोनने या वर्षाच्या सुरुवातीला C5 Aircross फेसलिफ्ट युरोपियन बाजारात लॉन्च केली आहे.

Citroen C5 Aircross ची पहिली झलक पाहिलीत का? ‘या’ फीचर्सने ठरतेय खास...
| Updated on: Sep 12, 2022 | 4:04 PM
Share

फ्रेंच कार कंपनी सिट्रोएनने (Citroen) नुकतीच C5 Aircross Facelift लॉन्च केली आहे. कंपनीने भारतात याची एक्सशोरूम किंमत 36.7 लाख रुपये इतकी ठेवली आहे. देशातील 19 शहरांमध्ये असलेल्या कंपनीच्या La Maison शोरूममध्ये नवीन मिड साईजच्या एसयुव्हीची चाचणी सुरू झाली आहे. त्याच वेळी कंपनी नवीन एसयुव्हीचे (New SUV) एकूण 100 टक्के ऑनलाइन बुकिंग (Booking) करेल. रिपोर्ट्सनुसार, C5 एअरक्रॉस फेसलिफ्टची पहिली बॅच डीलरशिपवर येण्यास सुरुवात झाली आहे. नवीन C5 Aircross SUV चे डिझाईन आणि लूकमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत.

डिझाइनमध्ये बदल

Citroen C5 Aircross फेसलिफ्टचे स्टाइलिंग खूप अत्याधुनिक करण्यात आले आहे. व्हर्टिकल एअर इंटेकसह कारला डिझाइन केलेला फ्रंट बंपर देण्यात आला आहे. नवीन एसयुव्हीला नवीन क्रोम फिनिश्ड ग्रिल आणि एलईडी डीआरएल सह रीडिझाइन केलेले हेडलॅम्प दिले आहेत. कारचा लुक आणि डिझाईनमध्ये बदल करण्यासोबतच कारला टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टमसारखे फीचर्स मिळतात.

C5 एअरक्रॉसचे इंटिरियर

कारच्या इंटीरियरमध्येही बरेच बदल करण्यात आले आहेत. सिट्रोएनने C5 एअरक्रॉस फेसलिफ्टमध्ये मॅट ब्लॅक कलर स्कीमसह रुफ रेल दिले आहे. त्याच वेळी, मिरर कॅप्स आणि एलईडी टेल लॅम्प देखील ग्लॉस ब्लॅक फिनिशिंगसह दिसतात. एसयुव्हीला 18 इंच डायमंड कट अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. C5 Aircross चार सिंगल टोन कलर पर्यायांमध्ये ऑफर केले असून त्यात, पर्ल नेरा ब्लॅक, पर्ल व्हाइट, एक्लिप्स ब्लू आणि कम्युलस ग्रेचा समावेश आहे.

C5 एअरक्रॉसचे फीचर्स

लेटेस्ट एसयुव्हीमध्ये अधिक स्पेस देण्यात आली आहे. नवीन कारमध्ये 12.3 इंचाच्या डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह 10-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. कारमधील एसी वेंट्सची पोजिशन बदलली आहे. यात सेफ्टीच्या दृष्टीने ट्रॅक्शन कंट्रोल मोड नॉब, पॅनोरामिक सनरूफ आणि 6 एअरबॅग्ज सारखे फीचर्स आहेत.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.