अर्टिगा, इनोव्हाला टक्कर, Renault Dacia Jogger लाँचिंगसाठी सज्ज, 7-सीटर कारमध्ये काय आहे खास?

रेनॉल्टची सबब्रँड कंपनी असलेल्या डॅसिया (Dacia) ने नवीन 7-सीटर एमपीव्ही लाँच केली आहे, या कारला रेनॉल्ट डॅसिया जॉगर (Renault Dacia Jogger) असे नाव देण्यात आले आहे.

अर्टिगा, इनोव्हाला टक्कर, Renault Dacia Jogger लाँचिंगसाठी सज्ज, 7-सीटर कारमध्ये काय आहे खास?
Renault Dacia Jogger
Follow us
| Updated on: Sep 04, 2021 | 5:09 PM

मुंबई : रेनॉल्टची सबब्रँड कंपनी असलेल्या डॅसिया (Dacia) ने नवीन 7-सीटर एमपीव्ही लाँच केली आहे, या कारला रेनॉल्ट डॅसिया जॉगर (Renault Dacia Jogger) असे नाव देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी कारचे अधिकृत नाव उघड झाले आहे. हे नवीन चारचाकी वाहन जागतिक बाजारात दाखल झाले आहे. Dacia फेमस SUV Duster साठी ओळखली जाते. सध्या ही कार यूके मार्केटमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. कंपनीने दावा केला आहे की, ते बाजारात अनेक जॉगर वाहने सादर करणार आहेत. (Dacia Jogger is new seven-seater Renault Duster MPV)

ही कार रेनॉल्ट लॉजीवर आधारित आहे, जी भारतात बऱ्याच अपेक्षांसह लॉन्च करण्यात आली होती, पण या MPV ला छाप पाडण्यात अपयश आले. आता डॅसिया जॉगरने हायब्रीड इंजिनच्या एक्स्ट्रा बेनिफिटसह स्टाईलिश आणि तुलनात्मकदृष्ट्या परवडणारी कार म्हणून निवडक जागतिक बाजारपेठांमध्ये स्वतःचं एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. जॉगर ही एसयूव्हीसारखी दिसणारी मात्र एमपीव्ही असलेली कार आहे.

जॉगरचा लुक डेसिया द्वारे ऑफर केलेल्या इतर मॉडेल्स सारखाच आहे. परंतु ही कार थोड्या लांब डिझाइनसह येते. जॉगर अनेक बाजारांमध्ये लॉजीची जागा घेईल, जिथे ती कार अजूनही उपलब्ध आहे. यामध्ये बसण्यासाठी तीन-रो आहेत आणि यामध्ये 160 लीटर बूट स्पेस देण्यात आली आहे. एक्स्ट्रा कार्गो स्पेससाठी मागच्या सीट्स पूर्णपणे हटवता येतील. ज्याद्वारे बूट स्पेस 708 लीटरपर्यंत वाढवता येईल. तसेच मधल्या रोमधील सीट पुढे सरकवता येईल

Dacia Jogger चे फीचर्स

Dacia Jogger मध्ये आठ इंचांचे मुख्य इन्फोटेनमेंट युनिट मिळते जे अँड्रॉइड ऑटो आणि Apple कारप्लेला सपोर्ट करतं. उपग्रह आधारित नेव्हिगेशन आणि सहा-स्पीकर युनिटसह. स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी डॉकिंग स्टेशन देखील आहे.

Dacia Jogger तीन इंजिन ऑप्शन्ससह सादर केली जाऊ शकते. 1.0-लीटर टर्बो युनिट जे 108 बीएचपी पॉवर जनरेट करते आणि 200 एनएम टॉर्क मिळते. योबतच एक 99 बीएचपी एलपीजी युनिट 1.6-लीटर हाइब्रिड पेट्रोल इंजिनसह येतं. ही कार 2023 मध्ये उपलब्ध केली जाऊ शकते.

Dacia Jogger 2022 मध्ये यूकेसह निवडक युरोपियन बाजारात अधिकृतपणे लॉन्च होण्याची अपेक्षा आहे आणि प्लग-इन हायब्रिड मॉडेल सादर करण्याची कोणतीही योजना नसताना, कंपनीला विश्वास आहे की, ही कार ग्राहकांना आकर्षित करेल. अशी अपेक्षा आहे की, ही कार अर्टिगा आणि इनोव्हा सारख्या 7 सीटर गाड्यांना जोरदार टक्कर देईल.

इतर बातम्या

अपडेटेड Mahindra Scorpio पुढच्या वर्षी बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Renault कडून सर्व गाड्यांवर 80,000 रुपयांची सूट, KWID च्या बेस मॉडेलमध्ये नवं सेफ्टी फीचर

Tokyo Paralympics मधील सुवर्णपदक विजेत्या सुमित अंतिलला Mahindra कस्टम मेड स्पेशल XUV गिफ्ट करणार

(Dacia Jogger is new seven-seater Renault Duster MPV)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.