AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वस्तात खरेदी करा ड्रीम कार; सोडू नका ही संधी

Car Price Hike | 1 जानेवारीपासून देशातील अनेक मोठ्या कंपन्यांच्या कारचे भाव वाढणार आहेत. काही आलिशान कारचे नाव पण या यादीत आहे. पण तुमची ड्रीम कार तुम्हाला अगदी स्वस्तात पण खरेदी करता येणार आहे. काही कारवर तर 60-70 टक्के डिस्काऊंट मिळेल. पण ही संधी मिळणार तरी कुठे?

स्वस्तात खरेदी करा ड्रीम कार; सोडू नका ही संधी
| Updated on: Dec 29, 2023 | 11:19 AM
Share

नवी दिल्ली | 29 डिसेंबर 2023 : वर्ष 2023 संपायला आजचा दिवस धरुन तीन दिवस उरले आहेत. नवीन वर्षात अनेक बदल होतील. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर पडणार आहे. 1 जानेवारीपासून देशातील अनेक कारचे भाव वाढणार आहेत. अनेकांना नवीन वर्षांत स्वतःची चारचाकी खरेदी करायची आहे. पण त्यांना खिशाचा विचार करावा लागणार आहे. खिशावर ताण येईल अशी खरेदी करण्याऐवजी जर स्वस्तात कार मिळत असेल तर कोणाला नकोय, नाही का? तुम्हाला महागड्या कारची आवड असेल तर त्यावर पण घसघशीत डिस्काऊंट मिळेल. तर याठिकाणी ग्राहकाला कार खरेदीवर 60-70 टक्के डिस्काऊंट मिळेल.

जप्त केलेल्या कार स्वस्तात मिळवा

अनेक जण महागड्या कार खरेदी करतात. पण आर्थिक अडचण येते. त्यामुळे त्यांचे हप्ते थकतात. संधी देऊन ही या कारचे हप्ते भरल्या जात नाही. अशावेळी बँका अशा कार जप्त करतात. त्यातील काही कार ताज्या दमाच्या असतात. यामध्ये महागड्या कारचा पण भरणा असतो. अशा कार तुम्हाला अगदी स्वस्तात मिळू शकतात.

लिलावात घ्या भाग

जप्त केलेल्या कारचा सातत्याने लिलाव सुरु असतो. तुम्ही या निलामीत सहभागी होऊन स्वस्तात कार मिळवू शकता. e auction India या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या जप्त केलेल्या कारच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी होता येते. या ठिकाणी चांगल्या कार स्वस्तात मिळण्याची संधी असते. तुम्ही योग्य वेबसाईट निवडली की नाही, हे तपासून पुढे लिलाव प्रक्रियेत सहभागी होता येईल.

या कंपन्यांची दरवाढ

  1. होंडा – कंपनीने मायक्रो एययुव्ही एलिव्हेटसह स्थानिक बाजारात सर्वाधिक स्पर्धा असलेल्या सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. या सप्टेंबर महिन्यात ही कार 11 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीवर लाँच करण्यात आली होती. नवीन वर्षांत कंपनी कारच्या किंमतीत वाढ करण्याची शक्यता आहे.
  2. टाटा –  टाटाने पण त्यांच्या व्यावसायिक उपयोगाच्या वाहनांची किंमत वाढविण्याचे जाहीर केले आहे. या वाहनाच्या किंमती 3 टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  3. मारुती – कार उत्पादनाचा खर्च वाढल्याने मारुतीने पण नवीन वर्षात किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसाधारण कारच्या किंमतीत 2-3 टक्क्यांपर्यंत वाढ होईल. तर लक्झरी सेगमेंटमधील कारची किंमत जास्त वाढू शकते.
  4. ऑडी – आलिशान कार कंपन्यांचा विचार करता, ऑडी पण नवीन वर्षात त्यांच्या कारच्या किंमतीत वाढ करणार आहे. ऑडी त्यांच्या कारच्या किंमतीत 2 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची शक्यता आहे.
  5. मर्सिडीज –ऑडी व्यतिरिक्त मर्सिडीजने पण नवीन वर्षात वाहनांच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनांच्या किंमतीत 2 टक्क्यांपर्यंत वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 जानेवारीपासून या नवीन किंमती लागू होतील.
  6. महिंद्रा – SUV तयार करणारी महिंद्रा अँड महिंद्रा ही कंपनी कारच्या किंमतीत वाढ करण्याची शक्यता आहे. कंपनीने नवीन वर्षात, 1 जानेवारीपासून त्यांच्या वाहनांच्या किंमतीत वाढीचा निर्णय घेतला आहे. महिंद्राची कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जादा दाम मोजावे लागणार आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.