सिंगल चार्जवर 130 किमी रेंज, होंडाची किफायतशीर इलेक्ट्रिक स्कूटर U-GO लाँच

Electrek ने सादर केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, सिटी रायडिंगसाठी तयार करण्यात आलेल्या या लाइटवेट ई-स्कूटरचे दोन प्रकार आहेत जे स्पीड आणि पॉवरसह येतात.

सिंगल चार्जवर 130 किमी रेंज, होंडाची किफायतशीर इलेक्ट्रिक स्कूटर U-GO लाँच
Honda U GO

बीजिंग : Honda ने त्यांची चीनी ब्रँच Wuyang Honda च्या माध्यमातून U-GO ही इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. Electrek ने सादर केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, सिटी रायडिंगसाठी तयार करण्यात आलेल्या या लाइटवेट ई-स्कूटरचे दोन प्रकार आहेत जे स्पीड आणि पॉवरसह येतात. Honda U GO चे स्टँडर्ड मॉडेल 1.2 kW कंटीन्यूअस रेटेड हब मोटरसह येईल जे 1.8 kW चे पीक आउटपुट देईल. (Honda U GO an affordable new electric scooter launched)

या व्हर्जनचा टॉप स्पीड 53 kmph इतका आहे. लो स्पीड मॉडेलबद्दल बोलायचे झाल्यास, हे 1.2 kW पॉवरसह 800 W कंटीन्यूअस हब मोटरसह येते. त्याचं टॉप स्पीड 43 किमी प्रतितास इतकं आहे. दोन्ही मॉडेल्स 1.44 kWh क्षमतेच्या 48V आणि 30Ah रिमूवेबल लिथियम-आयन बॅटरीसह सज्ज आहेत. याचं पॉवरट्रेन 65 किमीची रेंज देतं, जे दुसऱ्या बॅटरीच्या जोडणीसह 130 किमीपर्यंत वाढवता येते.

Honda U-GO मध्ये LCD स्क्रीन सारखी वैशिष्ट्ये आहेत, ज्याद्वारे युजर्सना स्कूटरचा स्पीड, रेंज, चार्जिंग आणि रायडिंग मोडची माहिती दिली जाते. स्कूटर फ्रंट एप्रनवर ट्रिपल बीमसह एलईडी हेडलाइटला सपोर्ट करते. मेन क्लस्टरभोवती एलईडी डीआरएल स्ट्रिप देखील आहे. ई-स्कूटरमध्ये 12-इंच फ्रंट आणि 10-इंच रियर अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत, तसेच यात 26 लीटर अंडर सीट स्टोरेज स्पेस आहे.

होंडाने ही इलेक्ट्रिक स्कूटर चीनी बाजारपेठेत सादर केली आहे आणि त्याची किंमत 7,499 RMB ($ ​​1,150) पासून सुरू होते, म्हणजेच भारतीत रुपयांमध्ये ही रक्कम अंदाजे 85,000 रुपये इतकी आहे. अहवालात असे म्हटले आहे की, होंडा ही इलेक्ट्रिक स्कूटर इतर बाजारांमध्येदेखील सादर करणार आहे.

देशात अनेक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटारसायकल लॉन्च झाल्यामुळे Honda U-GO लवकरच भारतात लॉन्च केली जाऊ शकते. तथापि, होंडाकडून अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

इतर बातम्या

जीप 2023 मध्ये आणणार आपली पहिली ऑल-इलेक्ट्रिक SUV, जाणून घ्या यात काय असेल खास

‘ही’ आहे भारताची पहिली इलेक्ट्रीक सुपरकार; फिचर्स, लूक पाहून तुम्हीही थक्क व्हाल

मारुती स्विफ्ट आणि डिझायरच्या सीएनजी मॉडेल्सची ही आहेत खास वैशिष्ट्ये; लॉन्चपूर्वीच झाला हा मोठा खुलासा

(Honda U GO an affordable new electric scooter launched)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI