कोरोना रुग्णांसाठी Hyundai India कडून 20 कोटी रुपयांचं मदत पॅकेज, महाराष्ट्रासह पाच राज्यांना लाभ

Hyundai Cares 3.0 मदत उपक्रमाचा एक भाग म्हणून दक्षिण कोरियन वाहन निर्माता कंपनी कोरोना प्रभावित राज्यांना पायाभूत सुविधा पुरवणार आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:40 PM, 3 May 2021
कोरोना रुग्णांसाठी Hyundai India कडून 20 कोटी रुपयांचं मदत पॅकेज, महाराष्ट्रासह पाच राज्यांना लाभ
Hyundai India

मुंबई : COVID-19 च्या विरोधात सुरु असलेल्या लढाईत सहभागी होणारी ह्युंदाय इंडिया (Hyundai India) एक नवीन वाहन निर्माता कंपनी बनली आहे. देशात कोव्हिड-19 च्या केसेसेमध्ये अचानक वाढ होऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर ह्युंदाय इंडियाने 20 कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले असून ते Hyundai Motor India Foundation (HMIF) च्या माध्यमातून डोनेट केलं जाईल. म्हणजेच हे मदत पॅकेज कोरोना रुग्णांसाठी खर्च केलं जाईल. (Hyundai India Announces Rs 20 Crore Relief Package To Fight against COVID-19)

Hyundai Cares 3.0 मदत उपक्रमाचा एक भाग म्हणून दक्षिण कोरियन वाहन निर्माता कंपनीने महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा, तेलंगणा आणि तामिळनाडू या कोरोना प्रभावित राज्यांना पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनेक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. या मदत कार्यक्रमांतर्गत वाहन निर्माता कंपनी रूग्णालयात ऑक्सिजन उत्पादन करणारे प्लांट स्थापित करुन आपली संसाधने तैनात करेल, ज्यामुळे गंभीर रूग्णांना मदत होईल. यामुळे रुग्णालयांना ऑक्सिजनमध्ये स्वावलंबी होण्यास मदत होईल.

ह्युंदाय वैद्यकीय सुविधा देणार

ह्युंदाय वैद्यकीय सुविधासुद्धा स्थापित करेल आणि विविध रुग्णालयांमध्ये सहाय्यक कर्मचारी उपलब्ध करुन देईल. तसेच पुढील तीन महिन्यांपर्यंत त्यांचा परिचालन खर्च (ऑपरेशनल कॉस्ट) पूर्ण करेल. COVID-19 ची मालिका खंडित करण्यासाठी ते ग्रामीण भागात मोबाईल मेडिकल युनिट आणि टेलिमेडिसिन क्लिनिक विकसित करणार आहेत.

मदत उपायांबद्दल ह्युंदाय मोटर इंडिया लिमिटेडचे ​​एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एसएस किम म्हणाले, COVID-19 च्या दुसर्‍या लाटेमुळे देशासमोर अभूतपूर्व संकट निर्माण झाले आहे. अशा काळात आपण एकत्रितपणे खंबीर होऊन या संकटाला तोंड दिलं पाहिजे. सर्वाधिक बाधित शहर आणि राज्यांना सार्थक मदत देण्यासाठी, ह्युंदायने आपली संसाधने पुन्हा तयार केली आहेत. या कठीण परिस्थितीत गरजूंना मदत पुरवली जाईल. आम्ही युद्धपातळीवर संसाधने आयोजित करीत आहोत.

ह्युंदायची लसीकरण मोहीम

सर्वाधिक बाधित शहरांना आवश्यक ती मदत पुरविली जावी आणि या स्रोतांच्या उपाय योजनांची गती वाढवण्यासाठी कंपनी विविध पर्यायांचे मूल्यांकन करत आहे. याव्यतिरिक्त, ह्युंदायने 45 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या कर्मचार्‍यांसाठी श्रीपेरंबुदूर शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यालयामार्फत उत्पादन सुविधेमध्ये लसीकरण मोहीम आयोजित केली होती.

इतर बातम्या

वाहन धारकांसाठी खूशखबर! रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ट्रान्सफर करणे झाले सोपे

रस्ते बांधकामासाठी 15 लाख कोटी खर्च करणार; नितीन गडकरींची मोठी घोषणा

(Hyundai India Announces Rs 20 Crore Relief Package To Fight against COVID-19)