उत्तर प्रदेशाच्या निवडणुका संपल्या; आता पेट्रोल-डिझेल भडकणार; या दिवसांपासून दर वाढणार

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Mar 07, 2022 | 10:32 PM

भारतात चार महिन्यांनंतर प्रथमच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढणार आहेत. गेल्या आठवड्यात रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी आणि तिसरी अर्थव्यवस्था असलेल्या देशात तेल 80% आयात केले जाते.

उत्तर प्रदेशाच्या निवडणुका संपल्या; आता पेट्रोल-डिझेल भडकणार; या दिवसांपासून दर वाढणार
पेट्रोल-डिझेलवर केंद्र सरकार देणार नाही सवलत
Image Credit source: TV9

नवी दिल्लीः गेल्या आठवड्यात रशियाने युक्रेनवर (Russia-Ukraine) केलेल्या हल्ल्यानंतर जागतिक बाजारपेठेत (world market) कच्च्या तेलाच्या (crude oil) किंमती प्रचंड वाढल्या आहेत. आता भारतात पेट्रोल डिझेलच्या किंमती पुन्हा भडकणार आहेत. चार महिन्यानंतर आता पुन्हा पेट्रोल डिझेलचे दरवाढ होणार असून हे दर गगनाला भिडणार आहेत. त्यातच उत्तर प्रदेशाच्या निवडणूका संपल्याने आता सरकार 7 तारखेनंतर सगळ्या राज्यांतून टप्प्याटप्याने पेट्रोल डिझेलची दर वाढवणार करणार असल्याचे अधिकारी सांगत आहेत.

देशातील वाढत्या महागाईमुळे सगळा देश चिंतेत असतानाच आता भारतात चार महिन्यांनंतर प्रथमच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढणार आहेत. गेल्या आठवड्यात रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी आणि तिसरी अर्थव्यवस्था असलेल्या देशात तेल 80% आयात केले जाते. तेल कंपन्यांनी नोव्हेंबरपासून क्रूड ऑईलच्या किंमतीत जवळपास 40 टक्क्यांनी वाढवल्या आहेत.

किंमती स्थिर ठेवण्याची कारणं

देशांतर्गत बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सरकारी तेल कंपन्यांनी 4 नोव्हेंबरपासून किंमती वाढवल्या नाहीत. किंमती स्थिर ठेवण्याची कारणंही वेगळी होती, कारण 7 तारखेला उत्तर प्रदेशची निवडणूक संपणार आहे. उत्तर प्रदेश हे सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे. त्यामुळे या राज्यातील विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पक्षाला याची मदत व्हावी म्हणून या किंमती वाढवण्यात आल्या नव्हत्या असे सांगण्यात येत आहे.

टप्प्याटप्प्याने किंमती वाढवल्या जाणार

उत्तर प्रदेशमधील निवडणूक संपल्यानंतर तेल कंपन्यांकडून टप्प्याटप्प्याने किंमती वाढवल्या जाणार आहेत. याबाबत ऱॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार इंधनाच्या वाढत्या दरामुळे काही प्रमाणात नरेंद्र मोदींना विरोध झाला असला तरी महत्वाच्या राज्यातील निवडणूकांमध्ये असलेला धोका कमी झाला आहे. मात्र 14 मार्चपासून संसदेची बैठक होणार असून यावेळी इंधनावरील दर कमी करण्यासाठी विरोधक आक्रमक होण्याची चिन्हे दिसत असल्याचे म्हटले आहे.

रशियाने-युक्रेन युद्ध

रशियाने युक्रेनवर 24 फेब्रुवारी रोजी आक्रमण केल्यानंतर तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली. गुरुवारी ब्रेंट प्रति बॅरल 116 डॉलरच्या वर त्याच्या किंमती वाढल्या होत्या. तर पुरवठा खंडित झाल्यामुळे गहू, सोयाबीन, खते आणि तांबे, पोलाद आणि अॅल्युमिनियम यांसारख्या धातूंच्या जागतिक बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत या वस्तूंच्या किंमती आता प्रचंड वाढल्या आहेत.
रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील तेल कंपन्यांकडून सरकारला सांगण्यात आले आहे की, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये प्रति लिटर 10-12 रुपयांनी वाढविण्याची गरज आहे. तर काही सरकार कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी तेलाच्या किंमती कितीने वाढणार हे सांगण्यास नकार दिल्याचे रॉयटर्सने सांगितले आहे.

संबंधित बातम्या

BSF Jawan Firing : पंजाबपाठोपाठ बंगालमध्येही बीएसएफ जवानाचा गोळीबार; सहकार्‍यावर गोळ्या झाडून स्वतःलाही संपवले

UP Election Exit polls Result 2022 : उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपची सत्ता, एक्झिट पोलचा अंदाज, कुणाला किती जागा?

Goa Election Exit Poll Result 2022: स्पष्ट बहुमत कुणालाच नाही! मग सत्ता कुणाची? छोटे पक्ष ठरवणार

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI