Jaguar Land Rover ची सर्वात वेगवान आणि पॉवरफुल डिफेंड SUV भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 27, 2021 | 6:55 PM

जॅग्वार लँड रोव्हरने (Jaguar Land Rover) आपल्या लाइनअपमध्ये सर्वात वेगवान आणि शक्तिशाली डिफेंडर एसयूव्ही सादर केली आहे.

Jaguar Land Rover ची सर्वात वेगवान आणि पॉवरफुल डिफेंड SUV भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

मुंबई : या वर्षाच्या सुरुवातीला भारतात 90 आणि 110 या दोन व्हेरिएंटमध्ये नवीन डिफेंडर एसयूव्ही लाँच केल्यानंतर जॅग्वार लँड रोव्हरने (Jaguar Land Rover) आपल्या लाइनअपमध्ये सर्वात वेगवान आणि शक्तिशाली डिफेंडर एसयूव्ही सादर केली आहे. कंपनीने दोन्ही व्हेरिएंटमध्ये V8 पॉवर्ड मॉडेल लाँच केले आहे ज्याची प्रायमरी किंमत 1.82 कोटी रुपये आहे. (Jaguar Land Rover launches most powerful Defender SUV in India, know Price and features)

जॅग्वार लँड रोव्हरने अलीकडे अधिकृतपणे डिफेंडर एसयूव्ही त्यांच्या वेबसाइटवर सूचीबद्ध केली होती, जी व्ही 8 इंजिनवर चालते. व्ही 8 इंजिनसह, डिफेंडर एसयूव्ही स्टँडर्ड आणि कार्पेथियन एडिशन दोन्ही व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये कारमेकरने जागतिक बाजारात सादर केलेले हेच मॉडेल आहे. नवीन डिफेंडरचे व्ही 8 व्हेरिएंट अॅडव्हेंचर कॅटेगरीमध्ये अव्वल आहे आणि 90 (3-डोर) आणि 110 (5-डोर) दोन्ही व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

व्ही 8 इंजिनसह, डिफेंडर त्यांच्या डिझाइनद्वारे उर्वरित मॉडेल्सपेक्षा वेगळी आहे. कार्पेथियन व्हेरिएंटला कार्पेथियन ग्रे नावाचा एक बॉडी कलर मिळतो, जो काळ्या रंगाच्या हुड, छप्पर आणि टेलगेटच्या अपोझिट आहे. ही कार सॅटिन प्रोटेक्टिव फिल्मसह सुसज्ज आहे. तसेच समोरच्या दाराखाली V8 लोगो, चार टेलपाइप्स आणि 22 इंच अलॉय व्हील्स आणि 15 इंच डिस्क आणि ब्लू कॅलिपर मिळतात.

डिफेंडर एसयूव्हीमध्ये काय आहे खास?

डिफेंडर व्ही 8 ट्विन टेलपाइप्स, इबोनी विंडसर ब्लॅक लेदर अपहोल्स्ट्री आणि अलकेन्टारा-रॅप्ड स्टीयरिंग व्हील द्वारे देखील ओळखले जाऊ शकते. तसेच केबिनच्या आत कर्व्ड सेंटर 11.4-इंच टचस्क्रीन मिळते. एसयूव्ही सुपरचार्ज 5.0-लीटर व्ही 8 इंजिनद्वारे पॉवर्ड आहे, जे जॅग्वार लँड रोव्हर गटातील सर्वात शक्तिशाली आहे.

या कारमधील इंजिन 525 एचपी पॉवर आणि 625 एनएम पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ऑल-व्हील ड्राइव्ह एसयूव्हीचे इंजिन 8 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे आणि डिफेंडर फॅमिलीतील सर्वात वेगवान कार आहे. डिफेंडर 90 5.2 सेकंदात शून्यापासून 100 किमी प्रतितास वेग धारण करु शकते आणि 240 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने धावते.

यापूर्वी जॅग्वार लँड रोव्हरने तीन पॉवरट्रेन पर्यायांमध्ये डिफेंडर 90 लाँच केली होती. यामध्ये 2.0 लीटर पेट्रोल इंजिनचा समावेश आहे जी 296 एचपी पॉवर आणि 400 एनएम टॉर्क, 3.0 लिटर पेट्रोल इंजिन जी जास्तीत जास्त 394 एचपी आणि 550 एनएम टॉर्क निर्माण करते. हे 3.0-लीटर डिझेल युनिट व्हेरिएंटसह येते, जे 296 एचपी पॉवर आणि 650 एनएम टॉर्क जनरेट करते.

इतर बातम्या

Honda ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये 130 किलोमीटर रेंज

देशातील 400 शहरांमध्ये OLA 1 लाख इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट सुरु करणार

Simple One इलेक्ट्रिक स्कूटरला अवघ्या 4 दिवसात 30,000 बुकिंग्स, 1947 रुपये देऊन तुम्हीही करु शकता बुक

(Jaguar Land Rover launches most powerful Defender SUV in India, know Price and features)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI