नव्या ढासू अवतारात Kia Seltos लाँच होणार, कंपनीकडून टीझर जारी

किआ मोटर्सने (Kia Motors) सोशल मीडियावर एका नवीन प्रॉडक्टबद्दल माहिती जाहीर केली आहे. कंपनीने त्यासंबंधी एक टीझर जारी केला आहे

नव्या ढासू अवतारात Kia Seltos लाँच होणार, कंपनीकडून टीझर जारी

मुंबई : किआ मोटर्सने (Kia Motors) सोशल मीडियावर एका नवीन प्रॉडक्टबद्दल माहिती जाहीर केली आहे. कंपनीने त्यासंबंधी एक टीझर जारी केला आहे. या टीझरमध्ये, सफरचंदाचा फोटो आणि पुस्तक दाखवलं आहे आणि त्यासोबत “The one who asked “why?” असा मजकूर लिहिला आहे. तसेच सोबत “coming soon” असं कॅप्शन दिलंय. (Kia Seltos Gravity Edition is going to launch in India, Kia Motors released a teaser)

या टीझर इमेजमध्ये न्यूटनच्या डिस्कव्हरी ऑफ ग्रॅव्हिटीचा संदर्भ देण्यात आला आहे, हा संदर्भ असे सूचित करतो की, हा टीझर किआ सेल्टॉस ग्रॅव्हिटी एडिशनचा (Kia Seltos Gravity Edition) असू शकतो, ही किआ मोटर्सची नवीन कार आहे. कंपनीने जुलै 2020 मध्ये दक्षिण कोरियामध्ये हे एडिशन लाँच केलं होतं. ही कार टॉप-ऑफ-द-लाइन व्हेरिएंट असू शकते. तसेच या कारच्या डिझाईन किंवा एक्सटीरियरमध्ये बदल केले जाऊ शकतात. या कारमध्ये काही सेफ्टी फीचर्सची भर घातली जाईल.

Kia Seltos Gravity च्या फीचर्सविषयी बोलायचे झाल्यास, यामध्ये बेस्पोक, थ्री-डायमेंशनल डिझाईन एलिमेंटसह क्रोम्ड फ्रंट ग्रिल मिळेल. तसेच यामध्ये 18 इंचांचे मशीन्ड अलॉय व्हील्स मिळतील. कंपनीने या कारच्या ORVM, डोर गार्निश आणि रियर स्किड प्लेटमध्ये सिल्व्हर फिनिश दिले आहे.

फीचर्स

या कारच्या केबिनमध्ये एक्सक्लुझिव्ह ग्रे कलर फिनिश आहे आणि कोरियन मॉडेलमध्ये हाय-एंड सेफ्टी आणि सिक्योरिटी फीचर देण्यात आलं आहे. ज्यामध्ये फॉर्वर्ड कोलिजन प्रिवेंशन असिस्टेंस सिस्टम आणि रियर पॅसेंजर नोटिफिकेशनचा समावेश आहे. किआ सेल्टॉस ग्रॅव्हिटी एडिशनमध्ये (Kia Seltos Gravity Edition) 10.25 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे जी स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, UVO कनेक्ट कार टेक, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, प्रीमियम बोस साऊंड सिस्टम, ऑटोमॅटिक एसी, वायरलेस फोन चार्जर आणि रिमोट इंजिन स्टार्टसह येते. यासह, एसयूव्हीला लेन केम असिस्ट आणि हाय-बीम असिस्ट फंक्शन मिळेल.

या महिन्यात लाँच होणार?

माध्यमांच्या अहवालांवर विश्वास ठेवल्यास कंपनी ही कार 27 एप्रिल 2021 रोजी लाँच करु शकते. एसयूव्ही पॅनारोमिक सनरूफसह येईल आणि 1.53 लीटर पेट्रोल इंजिनद्वारे 113bhp, 1.58 लीटर डिझेल इंजिनद्वारे 138bhp ची ऊर्जा उत्पादन करते, यात 1.4-लीटरचे टर्बो-पेट्रोल इंजिन दिले जाईल जे 138bhp शक्ती उत्पन्न करते. याला स्टँडर्ड व्हेरिएंटमध्ये 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळेल, तर इतर सर्व इंजिनसह ऑटोमॅटिक ऑप्शन देण्यात येईल.

संबंधित बातम्या

किआ कंपनीचा नवा विक्रम; भारतात इतक्या कार्सची विक्री

अवघ्या 17 महिन्यांमध्ये 2 लाख कार्सची विक्री, KIA Motors ने रचला इतिहास

(Kia Seltos Gravity Edition is going to launch in India, Kia Motors released a teaser)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI