Komaki Venice Electric Scooter बाजारात दाखल, आजपासून डिलीव्हरी सुरु

भारतीय बाजारात सातत्याने नवनवीन इलेक्ट्रिक स्कूटर दाखल होत आहेत. आता आणखी एका इलेक्ट्रिक स्कूटरने (Electric Scooter) भारतीय दुचाकी बाजारात एंट्री घेतली आहे, या स्कूटरचे नाव कोमाकी व्हेनिस (Komaki Venice) असे आहे.

Komaki Venice Electric Scooter बाजारात दाखल, आजपासून डिलीव्हरी सुरु
Komaki Venice Electric Scooter
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 7:00 AM

मुंबई : भारतीय बाजारात सातत्याने नवनवीन इलेक्ट्रिक स्कूटर दाखल होत आहेत. आता आणखी एका इलेक्ट्रिक स्कूटरने (Electric Scooter) भारतीय दुचाकी बाजारात एंट्री घेतली आहे, या स्कूटरचे नाव कोमाकी व्हेनिस (Komaki Venice) असे आहे. ही स्कूटर भारतातील Ola S1 Pro आणि Simple One या इलेक्ट्रिक स्कूटरशी स्पर्धा करेल. Komaki Venice इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1.15 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. ही स्कूटर 26 जानेवारीपासून देशभरातील कोमाकी डीलर्सवर (Komaki) उपलब्ध होईल.या कोमाकी स्कूटरमध्ये 3 kW ची मोटर आहे आणि ती 9 रंगांच्या पर्यायांमध्ये येते, ज्यामुळे युजर्सना त्यांच्या आवडीचा रंग निवडता येईल.या स्कूटरमध्ये डायग्नोज सिस्टम आहे, ज्यामुळे ग्राहकांना मोबाईल चार्जिंग पॉइंट, रिव्हर्स असिस्ट, अतिरिक्त स्टोरेज बॉक्स यांसारखे फीचर्स मिळतील.

अधिकृत वेबसाईटवर मिळालेला व्हिडिओ पाहता असे दिसतेय की, या स्कूटरमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिले जाईल, ज्यामध्ये स्पीड आणि बॅटरी चार्जिंग इत्यादींची माहिती उपलब्ध असेल. तसेच, यात डबल डिस्क ब्रेक सिस्टम मिळेल.

कोमाकीची इलेक्ट्रिक क्रूझर बाईक लाँच

भारतातील पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाईक कोमाकी रेंजर (Komaki Ranger) लाँच करण्यात आली आहे. ही बाईक हार्ले डेविडसनसारखी दिसते. ही इलेक्ट्रिक बाइक सिंगल चार्जवर 180-220 किमीची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते, असा दावा कंपनीनेच केला आहे. यात 4000 वॅटची मोटर देण्यात आली आहे. कंपनीने ही Garnet Red, Deep Blue आणि Jet Black या तीन कलर व्हेरियंटमध्ये सादर केली आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.68 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

या बाइकमध्ये आयसी इंजिन क्रूझरचा वापर करण्यात आला आहे, जे याआधी हार्ले डेव्हिडसन आणि रॉयल एनफिल्ड इत्यादींमध्ये वापरण्यात आलं आहे. या बाईकमध्ये बिग ग्रॉसर व्हील, क्रोम एक्सटीरियर्स आणि फाइन पेंट जॉबचा वापर करण्यात आला आहे. या मोटरसायकलमध्ये 4kW बॅटरी वापरली आहे, जी भारतातील सर्वात मोठी दुचाकी बॅटरी आहे. त्यामुळे ही बाइक सिंगल चार्जवर 180-200 किमी ड्रायव्हिंग रेंज देते.

या मोटरसायकलला ब्लूटूथ साउंड सिस्टीम, साइड स्टँड सेन्सर, क्रूझर कंट्रोल फीचर्स, अँटी थेफ्ट लॉकिंग सिस्टीम आहे. तसेच, यात ड्युअल स्टोरेज बॉक्सचा पर्याय समाविष्ट आहे. युजर्सची व्यवस्था लक्षात घेऊन यामध्ये आरामदायी सीट बसवण्यात आली आहे. तसेच यामध्ये ट्रिपल हेड लॅम्पचा वापर करण्यात आला आहे. कोमाकी रेंजर क्रूजर मोटारसायकल 26 जानेवारीपासून कोमाकी डीलरशिपवर उपलब्ध होईल. या बाईकची एक्स शोरुम किंमत 1.68 लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.

तर बातम्या

शानदार ऑफर! Maruti Suzuki Alto कार अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी

टोयोटा किर्लोस्कर मोटर्सची Toyota Hilux भारतात लाँच, फॉर्च्यूनर आणि इनोव्हा क्रिस्टाचा मिक्स अवतार

Mahindra ची Hero Electric सोबत भागीदारी, दरवर्षी 10 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणार

(Komaki Venice Electric Scooter delivery starts from today onwards, know price and features)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.