Marathi News » Automobile » Komaki venice electric scooter launched in india know price and features
Ola S1 Pro, Simple One ला टक्कर देण्यासाठी Komaki Venice स्कूटर बाजारात, E-Scooter मध्ये काय आहे खास
भारतीय बाजारात सातत्याने नवनवीन इलेक्ट्रिक स्कूटर दाखल होत आहेत. आता आणखी एका इलेक्ट्रिक स्कूटरने भारतीय दुचाकी बाजारात एंट्री घेतली आहे, या स्कूटरचे नाव Komaki Venice असे आहे.
भारतीय बाजारात सातत्याने नवनवीन इलेक्ट्रिक स्कूटर दाखल होत आहेत. आता आणखी एका इलेक्ट्रिक स्कूटरने भारतीय दुचाकी बाजारात एंट्री घेतली आहे, या स्कूटरचे नाव Komaki Venice असे आहे. ही स्कूटर भारतातील Ola S1 Pro आणि Simple One या इलेक्ट्रिक स्कूटरशी स्पर्धा करेल.
1 / 5
Komaki Venice Price : Komaki Venice इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1.15 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. ही स्कूटर 26 जानेवारीपासून देशभरातील कोमाकी डीलर्सवर उपलब्ध होईल.
2 / 5
या कोमाकी स्कूटरमध्ये 3 kW ची मोटर आहे आणि ती 9 रंगांच्या पर्यायांमध्ये येते, ज्यामुळे युजर्सना त्यांच्या आवडीचा रंग निवडता येईल.
3 / 5
या स्कूटरमध्ये डायग्नोज सिस्टम आहे, ज्यामुळे ग्राहकांना मोबाईल चार्जिंग पॉइंट, रिव्हर्स असिस्ट, अतिरिक्त स्टोरेज बॉक्स यांसारखे फीचर्स मिळतील.
4 / 5
अधिकृत वेबसाईटवर मिळालेला व्हिडिओ पाहता असे दिसतेय की, या स्कूटरमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिले जाईल, ज्यामध्ये स्पीड आणि बॅटरी चार्जिंग इत्यादींची माहिती उपलब्ध असेल. तसेच, यात डबल डिस्क ब्रेक सिस्टम मिळेल.