कार, बाईकला पण रंगांची आंघोळ? चिंता नको, असे काढा डाग

धुळवडीत काही जण घराबाहेरील कार, बाईक, स्कूटरला पण रंगात न्हाऊन टाकतात. वास्तविक हा सण कोरड्या रंगाने खेळणे सर्वात चांगले. पण सणाच्या उत्साहात काही जण धुंद असतात. ते वाहनांना पण रंग लावण्याचा आचरटपणा करतातच. अशावेळी चिडून उपयोग नसतो. हे डाग अशा पद्धतीने काढता येतात.

कार, बाईकला पण रंगांची आंघोळ? चिंता नको, असे काढा डाग
कारवरील डाग असे हटवाImage Credit source: गुगल
Follow us
| Updated on: Mar 24, 2024 | 4:44 PM

होळी हा रंगाचा उत्साव आहे. या दिवशी अनेक कलाकार मूर्ती, उत्सव मूर्ती बाहेर बागडतात. त्यांना कशाचेच भान नसते. ते गल्लीत, खुल्या मैदानावरील, रस्त्यावरील वाहनांना टार्गेट करतात. त्यावर रंगाच्या पिचकाऱ्या मारतात. रंग टाकतात. त्यांना वाहनांना रंग लावण्यात कसला आनंद मिळतो, हे न सूटलेले गणित आहे. पण यामुळे वाहनांचे नुकसान होण्याची शक्यता असते. काही रंग घट्ट बसतात. हा रंग काढताना एखाद्यावेळी पेंट पण निघण्याची भीती असते. त्यामुळे वाहनावरील रंग काढताना काळजी घ्या. या पद्धतीने तुम्ही हा रंग काढू शकता.(Remove Holi Colour Stains from Vehicle )

रंगांचे डाग कसे धुऊन काढणार?

कपड्यावरील रंग काढण्यासाठी आपण एकतर ते कपडे बदलून टाकतो. अथवा काही रसायनांचा वापर करतो. पण कार, बाईकवरील रंग काढताना अडचण येते. ते काही सोपे काम नाही. वाहनांवरील डाग लवकरात लवकर काढणे आवश्यक आहे. जास्त काळ हा रंग राहिल्यास तो काढणे जिकरीचे होते. हार्ड क्लीनिंग मटेरियल तेव्हा वापरावे लागेल. पण यामुळे कारवरील पेंट पण हटवावे लागू शकतो.  तेव्हा कारवरील डाग काढताना घिसडघाई तुम्हाला अजून नुकसान पोहचवू शकते. सावधगिरीने हे रंग तुम्ही काढू शकतात. अथवा त्यासाठी कोणाचा सल्ला पण घेऊ शकता. या टिप्स तुम्हाला कारवरील डाग काढण्यासाठी उपयोगी ठरु शकते.

हे सुद्धा वाचा

रंगाचे डाग काढण्यासाठी उपाय

  1. स्टेप 1: डाग काढण्यासाठी क्लीनिंग सोल्यूशन्सचा वापर करण्यापूर्वी त्यावर पाणी मारा. त्यामुळे रंगाचे डाग थोड्याफार प्रमाणात निघून जातील.
  2. स्टेप 2 : रंगांचे डाग हटविण्यासाठी नरम कपडा वापरा. कोणताही ब्रश अथवा हार्ड स्क्रबचा प्रयोग करु नका. त्यामुळे वाहनाला स्क्रॅच पडण्याची भीती असते.
  3. स्टेप 3 : कारवरील रंग वारंवार कपडा आणि पाण्याने धूत राहा. अनेकवेळा धुतल्यानंतर हा रंगाचा डाग निघू शकतो.
  4. स्टेप 4 : रंगाचे डाग निघतील. तेव्हा कारला एकदा वॅक्स अथवा पॉलिश कोटींग करुन घ्या. वॅक्सिंगमुळे वाहनाला कोणत्याही डागापासून वाचविता येते. तर हवा, पाणी, उन्हामुळे होणाऱ्या नुकसानीपासून तुमच्या वाहनाला वाचविता येते.
Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.