Mahindra Thar कडून विक्रीचे अनेक रेकॉर्ड्स मोडित, गाडीसाठी तब्बल ‘इतक्या’ महिन्यांचं वेटिंग

अक्षय चोरगे

|

Updated on: Feb 06, 2021 | 6:49 PM

‘सेकंड जनरेशन महिंद्रा THAR 2020’ ची किंमत 9.8 लाख रुपयांपासून सुरु होते. तर महिंद्रा थारचे एलएक्स ट्रिम हे टॉप मॉडेल 13 लाख रुपयांपर्यंत बाजारात विक्रीस उपलब्ध आहे.

Mahindra Thar कडून विक्रीचे अनेक रेकॉर्ड्स मोडित, गाडीसाठी तब्बल 'इतक्या' महिन्यांचं वेटिंग

Follow us on

मुंबई : भारतातील आघाडीची कार उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने (Mahindra & Mahindra) गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी त्यांची लोकप्रिय एसयूव्ही महिंद्रा ‘THAR 2020’ भारतात लाँच केली होती. या ‘सेकंड जनरेशन महिंद्रा THAR 2020’ ची किंमत 9.8 लाख रुपयांपासून सुरु होते. तर महिंद्रा थारचे एलएक्स ट्रिम हे टॉप मॉडेल 13 लाख रुपयांपर्यंत बाजारात विक्रीस उपलब्ध आहे. ही कार भारतीयांच्या पसंतीस उतरली असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. गेल्या चार महिन्यांपासून या कारची जोरदार विक्री होत आहेच, सोबतच या कारसाठी मोठा वेटिंग पिरियडही आहे. तरीदेखील डिसेंबरमध्ये या कारच्या 6500 युनिट्ससाठी बुकिंग्स मिळाल्या आहेत. दरम्यान लाँचिंग झाल्यापासून महिंद्रा थार (Mahindra Thar 2020) यशाची नवनवी शिखरं पदाक्रांत करत आहे. आतापर्यंत या कारच्या 39000 युनिट्ससाठी बुकिंग्स आल्या आहेत. याबाबत कंपनीने अधिकृतपणे माहिती जाहीर केली आहे. (Mahindra Thar crossed 39000 bookings, waiting period more than 10 months)

महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) कंपनीने दिलेल्या माहितीनुसार केवळ जानेवारी महिन्यात थारच्या 6000 युनिट्सचे बुकिंग झाले आहे. तर डिसेंबरमध्ये 6500 युनिट्सचं बुकिंग झालं होतं. दरम्यान, कंपनीने काही दिवसांपूर्वी AX STD आणि AX वेरिएंट बंद केलं आहे. त्याऐवजी कंपनीने AX OPT आणि LX वेरिएंट लॉन्च केलं आहे. नव्या वेरिएंटसह कंपनीने कारच्या किंमतीतही बदल केला आहे. आता महिंद्रा थारची भारतातील एक्स शोरुम किंमत 12.10 लाख रुपये इतकी आहे. तर या कारच्या टॉप वेरिएंटची किंमत 14.15 लाख रुपये इतकी आहे. मीडिया रिपोर्ट्समधील माहितीनुसार आता महिंद्रा थारसाठी तब्बल 10 महिन्यांचा वेटिंग पिरियड आहे. याचाच आर्थ तुम्ही आत्ता कार बुक केली तर तब्बल 10 महिन्यांनी म्हणजेच नोव्हेंबर 2021 मध्ये तुम्हाला या कारची डिलिव्हरी मिळेल.

मोठा वेटिंग पिरियड, तरिही डिसेंबरमध्ये Thar च्या 6500 युनिट्सचं बुकिंग

महिंद्राच्या या सेकेंड जनरेशन थारसाठी (Mahindra Thar 2020) लाँचिंगपूर्वीच 9000 बुकिंग्स आल्या होत्या. दरम्यान, ग्बोबल NCAP (New Car Assessment Programme) द्वारे टेस्ट केल्यानंतर महिंद्रा थारला सुरक्षिततेच्या बाबतीत 4 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. ग्लोबल NCAP ‘सेफ कार फॉर इंडिया’ क्रॅश टेस्टमध्ये या कारला 4 स्टार रेटिंग दिलं आहे तसेच मुलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीतही या कारला 4 स्टार्स मिळाले आहेत. क्रॅश टेस्ट रिपोर्ट पाहिल्यानंतर या कारला ग्राहकांकडून अधिक पसंती, मिळू लागल्याचे बोलले जात आहे.

सेकंड जनरेशन महिंद्रा ‘THAR 2020’ची वैशिष्ट्ये

जुन्या महिंद्रा थारच्या तुलनेत नवीन महिंद्रा ‘THAR 2020’मध्ये बऱ्यापैकी कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. ग्राहक त्यांच्या पसंतीनुसार पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांसह नवी महिंद्रा ‘THAR 2020’ खरेदी करू शकतात. या नव्या ‘THAR 2020’मध्ये 4 सीट आणि 6 सीट, असे सीटिंग लेआउट पर्याय देण्यात आले आहेत.

सेकंड जनरेशन महिंद्रा थारमध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिन, असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. ज्यामध्ये 2.0 लीटर 4 सिलिंडर पेट्रोल इंजिन, 150 बीएचपी पॉवर आणि 300 एनएम टॉर्क जनरेट करते. तर, 2.2 लीटर डिझेल इंजिनने 130 बीएचपीची पॉवर आणि 300 एनएम टॉर्क जनरेट केले जाते. या नव्या ‘THAR 2020’मध्ये बीएस 6 इंजिन देण्यात आले असून, 6 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

सेकंड जनरेशन महिंद्रा थारच्या उर्वरित वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, 9 वेरियंटसह रेड रेज, गॅलेक्सी ग्रे, मिस्टिक कॉपर, रॉकी बेज, नेपोली ब्लॅक आणि अ‍ॅक्वामरीन या वेगवेगळ्या रंगात ‘THAR 2020’ लाँच केली गेली आहे.

महिंद्रा ‘THAR 2020’मध्ये 7 इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट, अ‍ॅडजेस्टेबल सीट, रूफ माउंट स्पीकर्स, क्रूझ कंट्रोल, ड्युअल एअरबॅग, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल, एबीएस, ईबीडी, हिल कंट्रोल, डिजिटल ओडोमीटर, इलेक्ट्रॉनिक मल्टी ट्रिप मीटर, असे फीचर्स देण्यात आले आहेत. महिंद्रा ‘THAR 2020’मध्ये खास चौकोनी एलईडी टेललाईट्स, स्पोक अ‍ॅलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

Mahindra Thar 2020 खरेदी करताय? ‘इतके’ महिने वाट पाहावी लागेल

Mahindra THAR चा मार्केटमध्ये धुमाकूळ, तरीही कंपनी कार बंद करण्याच्या विचारात?

Mahindra THAR चा जलवा कायम, दिवाळीच्या मुहूर्तावर रेकॉर्डब्रेक विक्री

क्रॅश टेस्टमध्ये Mahindra THAR पास की नापास?

मोठा वेटिंग पिरियड, तरिही डिसेंबरमध्ये Thar च्या 6500 युनिट्सचं बुकिंग; या कारमध्ये काय आहे खास?

Mahindra Thar च्या इंजिनमध्ये मोठा बिघाड, कंपनीने गाड्या परत मागवल्या

(Mahindra Thar crossed 39000 bookings, waiting period more than 10 months)

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI