Mahindra कंपनी XUV500 चं उत्पादन बंद करणार, जाणून घ्या कारण

अक्षय चोरगे

| Edited By: |

Updated on: Apr 14, 2021 | 7:54 AM

महिंद्रा आणि महिंद्रा (Mahindra & Mahindra) कंपनी आपली नवीन फ्लॅगशिप एसयूव्ही लाँच करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.

Mahindra कंपनी XUV500 चं उत्पादन बंद करणार, जाणून घ्या कारण
Mahindra XUV500

मुंबई : महिंद्रा आणि महिंद्रा (Mahindra & Mahindra) कंपनी आपली नवीन फ्लॅगशिप एसयूव्ही लाँच करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. कंपनी या वर्षी एक्सयूव्ही 700 (XUV700) ही कार लाँच करू शकते. ही कार कंपनीच्या नवीन म्हणजेच W601 SUV प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आली आहे. XUV700 ही महिंद्राच्या लोकप्रिय 7 सीटर एसयूव्हीला रिप्लेस करणार आहे. एक्सयूव्ही 700 लाँच झाल्यानंतर XUV500 चं काय होणार, असा सवाल महिंद्राच्या प्रवक्त्यांना विचारला असता ते म्हणाले की, या एसयूव्हीचे उत्पादन पूर्णपणे बंद केले जाईल. (Mahindra XUV500 production to be ceased to make way for XUV700 launch)

महिंद्रा XUV500 कंपनीचं फ्लॅगशिप मॉडेल म्हणून 2011 मध्ये लाँच करण्यात आलं होतं. 15 लाख रुपयांखाली किंमत असलेल्या या एसयूव्हीने अल्पावधीतच लोकांना वेड लावलं होतं. परंतु क्रेटा, सेल्टॉस आणि जीप कंपास एसयूव्ही लॉन्च झाल्यानंतर एक्सयूव्ही 500 आउटडेटेड झाली. त्यामुळेच महिंद्रा कंपनी आता XUV700 ही शानदार कार लाँच करणार आहे.

वर्ल्ड क्लास सेफ्टी फीचर्ससह XUV700 लाँच होणार

महिंद्राची नवीन एसयूव्ही XUV700 मोनोकोक प्लॅटफॉर्मवर बनवली जाणार आहे. यात सर्वात लेटेस्ट वर्ल्ड क्लास सेफ्टी फीचर्स दिले जाऊ शकतात. याशिवाय कंपनी ही कार पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंजिनांसोबत भारतीय बाजारात उतरवू शकते. यात ग्राहकांना मॅन्यूअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्ही पर्याय मिळणार आहे. याशिवाय, यात ऑल व्हील ड्राइव्ह दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या एक्सयूव्हीमध्ये इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम देखील देण्यात येणार असल्याचे लीक झालेल्या फोटोंमधून स्पष्ट झालं आहे. या कारमधील इतर फीचर्सविषयी बोलायचे झाल्यास, यामध्ये 6 एअरबॅग, ईबीडीसह एबीएस, ISOFIX चाईल्ड सीट माउंट्स आणि 4 डिस्क ब्रेक दिले जाऊ शकतात.

इतर फीचर्स

या कारमध्ये फुल LED हेडलाइट्स, LED डेटाइम रनिंग लाइट्स, नवीन मोठे ग्रिल, स्पोर्टी अलॉय व्हील्स आणि नवीन हॉरिजॉन्टली माउंटेड LED टेललाइट्स मिळू शकतात. नवीन Mahindra XUV700 मध्ये Mercedes-Benz स्टाइल मोठी सिंगल यूनिट स्क्रीन दिली जाऊ शकते. ज्यात स्प्लिट इन्फोटेन्मेंट सिस्टिम आणि इंस्ट्रूमेंट कलस्टर मिळणार आहे. यात अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोचा सपोर्ट मिळणार आहे. याशिवाय यात ऑटोमॅ टिक क्लायमेट कंट्रोल, सनरूफ सारखे फीचर्स मिळू शकतात. या कारमध्ये लेदर सीट्स, फ्लॅट बॉटम स्टीयरिंग व्हील, सॅटिन फिनिश इंटीरियर ग्रॅब हँडल्स आणि क्रोम बेझल मिळेल. यामध्ये तुम्हाला वायरलेस चार्जिंगची सुविधादेखील मिळेल.

इतर बातम्या

भारतातील इलेक्ट्रिकल व्हेईकल सेगमेंटमध्ये Siemens ची एंट्री, हिंदुजा ग्रुपशी हातमिळवणी

सिंगल चार्जमध्ये 563 किमी धावणार, Hummer EV च्या लूकची चाहत्यांना भुरळ

सिंगल चार्जवर 500KM रेंज, Kia EV6 कार खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा

(Mahindra XUV500 production to be ceased to make way for XUV700 launch)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI