AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ही’ SUV क्रेटा आणि Scorpio, दोन्हींना मागे टाकेल, जाणून घ्या

गेल्या महिन्यात भारतात सर्वाधिक विकली जाणारी तीन एसयूव्ही मॉडेल्स कोणती होती, आज आम्ही तुम्हाला याविषयी माहिती देणार आहोत. जर तुम्हालाही नवीन एसयूव्ही घ्यायची असेल तर आधी तुम्हाला हे माहित असायला हवं की ग्राहकांमध्ये सर्वात जास्त ट्रेड होणारी वाहने कोणती आहेत.

‘ही’ SUV क्रेटा आणि Scorpio, दोन्हींना मागे टाकेल, जाणून घ्या
Image Credit source: TV9 bharatvasrh
| Edited By: | Updated on: Jun 18, 2025 | 10:33 AM
Share

तुम्हाला एसयूव्ही खरेदी करायची असेल तर त्यापूर्वी ही माहिती वाचा. कारण, वाहन खरेदी करण्यापूर्वी ट्रेंड कोणत्या वाहनांचा आहे, हे आधी माहिती असणं गरजेचं आहे. तसेच कोणती एसयूव्ही ही तुमच्या बजेटची आहे, तसेच फीचर्स देखील तुम्हाला हवे आहेत, तसेच आहे का? या सर्व गोष्टींची चाचपणी करूनच वाहन घ्या. आज आम्ही तुम्हाला अशाच काही एसयूव्हीची माहिती सांगणार आहोत, चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घ्या.

भारतीय बाजारपेठेत एसयूव्हीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे, वाहन कंपन्या दरमहा हजारो युनिट्सची विक्री करत आहेत. जर तुम्हीही नवीन एसयूव्ही घेण्याचा विचार करत असाल तर आधी जाणून घ्या कोणत्या वाहनांना बाजारात जबरदस्त मागणी आहे आणि हे मॉडेल्स कोणत्या किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत? हे जाणून घ्या.

मारुती सुझुकी ब्रेझा

गेल्या महिन्यात म्हणजे मे 2025 मध्ये मारुती सुझुकीच्या एसयूव्हीने धुमाकूळ घातला होता. गेल्या वर्षी मे महिन्यात या कारची विक्री 14,186 युनिट्सच्या तुलनेत 15,566 युनिट्स झाली होती. वार्षिक आधारावर या कारच्या विक्रीत 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

या कारच्या बेस व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 8.69 लाख रुपये आहे, तर टॉप व्हेरियंटची किंमत 14.14 लाख (एक्स-शोरूम) आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही कार पेट्रोलवर 17.80 किमी ते 19.80 किमी प्रति लीटर आणि सीएनजीवर 25.51 किमीपर्यंत मायलेज देते.

ह्युंदाई क्रेटा

ह्युंदाईची कार वर्षानुवर्ष सर्वाधिक विकली जाणारी मॉडेल आहे, या मध्यम आकाराच्या एसयूव्हीने गेल्या महिन्यात 14860 युनिट्सची विक्री केली आहे. या एसयूव्हीची किंमत 11.11 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते, तर इलेक्ट्रिक अवताराची किंमत 17.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. या एसयूव्हीमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, हवेशीर सीट, लेव्हल 2 एडीएएस, 6 एअरबॅग आणि 10.25 इंचाची टचस्क्रीन देण्यात आली आहे.

महिंद्रा स्कॉर्पिओ

विक्रीच्या बाबतीत महिंद्राच्या एसयूव्हीने तिसऱ्या स्थानावर स्थान मिळवले आहे, मे 2025 मध्ये या कारच्या एकूण 14,401 युनिट्सची विक्री झाली होती, तर गेल्या वर्षी मे महिन्यात कंपनीने या एसयूव्हीच्या 13,717 युनिट्सची विक्री केली होती.

विक्रीतील वाढीचा आलेख वर्षागणिक 5 टक्क्यांनी वाढला आहे. या विक्रीच्या आकड्यात स्कॉर्पिओ क्लासिक आणि स्कॉर्पिओ एन या दोन्ही मॉडेल्सच्या विक्रीचा समावेश आहे. क्लासिक मॉडेल केवळ डिझेल पर्यायात उपलब्ध आहे, तर एन व्हेरियंट 2.2 लीटर डिझेल आणि 2.0 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन पर्यायात खरेदी करता येईल.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.