AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मारुती सुझुकीची 6 एअरबॅग असलेली ‘ही’ सर्वात स्वस्त कार, किंमत फक्त 5.64 लाख

कार घ्यायची पण बजेट कमी आहे का? मग चिंता न करता ही बातमी वाचा. 6 लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये आतापर्यंत साधारणपणे दोन एअरबॅग असलेली वाहने मिळत होती, पण आता वाहन कंपन्यांनी लोकांच्या सुरक्षेसाठी स्वस्त कारच्या बेस व्हेरियंटमध्ये 6 एअरबॅग देण्यास सुरुवात केली आहे. या किंमतीत तुम्हाला 6 एअरबॅग्सच्या सुविधेसह कोणती वाहने मिळतील? चला तर मग जाणून घेऊया.

मारुती सुझुकीची 6 एअरबॅग असलेली ‘ही’ सर्वात स्वस्त कार, किंमत फक्त 5.64 लाख
| Edited By: | Updated on: Feb 12, 2025 | 3:46 PM
Share

तुम्हाला कार घ्यायची आहे का? असं असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खास पर्याय घेऊन आलो आहोत. कुटुंबाची सुरक्षितता ही पहिली बाब लक्षात घेऊन आता ऑटो कंपन्यांनी कमी बजेटच्या स्वस्त वाहनांच्या बेस व्हेरियंटमध्ये 6 एअरबॅग देण्यास सुरुवात केली आहे. जर तुमचे बजेट 6 लाख रुपयांपर्यंत असेल तर आज आम्ही तुम्हाला या प्राईस रेंजमधील कोणती वाहने आहेत जी तुम्हाला 6 एअरबॅगसह मिळतील. याविषयी माहिती देणार आहोत.

नुकतीच मारुती सुझुकी सेलेरियो अपडेट करण्यात आली असून आता या कारच्या सर्व व्हेरियंटमध्ये सुरक्षेसाठी 6 एअरबॅग देण्यात आल्या आहेत. या कारची किंमत किती आहे आणि या रेंजमध्ये कोणती कार या कारला टक्कर देते? चला तर मग जाणून घेऊया.

मारुती सुझुकी सेलेरियो किंमत

मारुतीच्या हॅचबॅकच्या बेस व्हेरियंटची किंमत 5,64,000 रुपये (एक्स-शोरूम) आहे, तर या कारच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 7,37,000 रुपये (एक्स-शोरूम) आहे.

मारुती सुझुकी सेलेरियो मायलेज

मारुती सुझुकीची स्वस्त हॅचबॅक एक लिटर ऑईल उत्तम मायलेज देते, पेट्रोल व्हेरियंटबद्दल बोलायचे झाले तर ही कार 25.24 किमी ते 26.०० किमी पर्यंत मायलेज देते. तर या गाडीचे सीएनजी व्हेरियंट एका किलोमध्ये 34.43 किमी धावू शकते.

सुरक्षा फीचर्स कोणते आहेत?

6 लाख रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या या कारच्या सर्व व्हेरियंटमध्ये 6 एअरबॅग्ज सह हिल होल्ड असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, ईबीडीसह एबीएस आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स सारखे खास सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.

ह्युंदाई ग्रँड E10 निओस किंमत

ह्युंदाईकडे 6 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत 6 एअरबॅगसह स्वस्त हॅचबॅक देखील आहे, जी मारुती सुझुकी सेलेरियोला टक्कर देते. विशेष म्हणजे ह्युंदाई ग्रँड i10 निओसचे बेस व्हेरियंट खरेदी करण्यासाठी तुम्हाला 5 लाख 98 हजार 300 रुपये (एक्स-शोरूम) खर्च करावे लागतील.

टॉप मॉडेलची किंमत किती?

तर टॉप मॉडेलची किंमत 8 लाख 38 हजार 200 रुपये (एक्स-शोरूम) आहे. दोन्ही वाहनांच्या बेस व्हेरियंटमधील किंमतीत 34,300 रुपये (एक्स-शोरूम) तर टॉप व्हेरियंटची किंमत 1,01,200 रुपये (एक्स-शोरूम) आहे. ह्युंदाई ग्रँड i10 एनआयओएसमध्ये 6 एअरबॅगव्यतिरिक्त हिल असिस्ट कंट्रोल, ड्रायव्हर रियर व्ह्यू मॉनिटर आणि इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल सारखे सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.