मारुती सुझुकी न्यू जनरेशन एस-क्रॉस सादर करणार, या महिन्यात डेब्यू, जाणून घ्या नव्या कारमध्ये काय असेल खास?

मारुती सुझुकी नवीन जनरेशन एस-क्रॉस कार बाजारात सादर करणार आहे, अशी अटकळ अनेक वर्षांपासून सुरू आहे. दरम्यान, इंटरवेबवर समोर आलेल्या अलीकडील अहवालानुसार, लवकरच या कारचे जागतिक पदार्पण होणार आहे.

मारुती सुझुकी न्यू जनरेशन एस-क्रॉस सादर करणार, या महिन्यात डेब्यू, जाणून घ्या नव्या कारमध्ये काय असेल खास?
Maruti S Cross
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 5:57 PM

मुंबई : मारुती सुझुकी नवीन जनरेशन एस-क्रॉस कार बाजारात सादर करणार आहे, अशी अटकळ अनेक वर्षांपासून सुरू आहे. दरम्यान, इंटरवेबवर समोर आलेल्या अलीकडील अहवालानुसार, लवकरच या कारचे जागतिक पदार्पण होणार आहे. भारत आणि जपानसह युरोप आणि इतर बाजारपेठांसाठी सुझुकी आपल्या भविष्याचा विचार करुन अनेक नवीन कार लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. (Maruti Suzuki going to launch New Generation S Cross)

S-Cross चे तिसरे जनरेशन व्हेरिएंट नवीन उत्पादनाला आक्रमक बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असे कंपनीला वाटते. नाताळच्या आसपास ही कार डीलरशिपपर्यंत पोहोचेल. तत्पूर्वी या कारचा जागतिक प्रीमियर या महिन्यात युरोपमध्ये आयोजित केला जाईल. त्यानंतर लवकरच ही कार भारतातदेखील लाँच केली जाईल.

सुझुकी इबेरिकाचे अध्यक्ष जुआन लोपेझ फ्रेड यांनी नोव्हेंबर 2021 च्या अखेरीस कारच्या लॉन्चची पुष्टी केली आहे. ते पुढे म्हणाले की, “जर सर्व काही ठीक राहीले आणि आम्हाला या मॉडेलसाठी पुरवठ्याची समस्या आली नाही, तर मला आशा आहे की, ज्यांना चांगली कार हवी आहे त्यांच्यासाठी नाताळच्या दिवशी एक छान भेट म्हणून ही कार डीलरशिपपर्यंत पोहोचेल.”

सुझुकी आगामी एस-क्रॉसमध्ये आपले हायब्रिड तंत्रज्ञान वापरणे सुरू ठेवेल, कारण ते एकूण उत्सर्जन (एमिशन) पातळी कमी करण्यास मदत करेल. दरम्यान, अशी माहिती मिळाली आहे की, या कारमध्ये डिझेल इंजिन उपलब्ध नसेल.

अपडेटेड एस-क्रॉसमध्ये काय असेल खास

ही कार 48V पॉवर सिस्टमशी जोडलेल्या नवीन 1.5 लीटर फोर-सिलेंडर पेट्रोल इंजिनद्वारे सुसज्ज असेल. एक 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन एक पर्याय म्हणून कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गियरबॉक्ससह स्टँडर्ड फिटमेंटच्या रुपात दिलं जाईल.

2022 सुझुकी एस-क्रॉसच्या एक्सटीरियरमध्ये हेडलॅम्प्सची नवीन जोडी, पुन्हा डिझाइन केलेले ग्रिल सेक्शन आणि बंपरसह इव्होल्यूशनरी अपग्रेड मिळण्याची शक्यता आहे. अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो कंपॅटिबिलिटीसह नवीन टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, इन-कार कनेक्टिव्ह अॅपचा यात समावेश असेल.

या कारच्या वर्ल्ड प्रीमियरनंतर, आपण आशा करु शकतो की, ही क्रॉसओव्हर पुढील वर्षी कधीही भारतात लाँच केली जाईल. मारुती सुझुकीची सेकेंड जनरेशन सेलेरियो 10 नोव्हेंबरला लाँच होणार आहे. त्यानंतर येत्या काळात अनेक अपडेटेड मॉडेल्स लॉन्च केले जातील.

इतर बातम्या

कावासकीने भारतात लॉन्च केली मोटरसायकल, जाणून घ्या किती आहे या बाईकची किंमत

ऑलिम्पियन सुमित अंतिलला महिंद्राचं शानदार गिफ्ट, XUV700 ची पहिली Javelin Gold Edition भेट

PHOTO | ही आहे जगातील पहिली इलेक्ट्रिक टू-सीटर फॉर्म्युला रेस कार, जाणून घ्या काय आहे खास

(Maruti Suzuki going to launch New Generation S Cross)

Non Stop LIVE Update
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.