Driving Course : कार घ्यायचीय, पण चालवता येत नाही? मारुती सुझुकीनं आणलेत नवीन कोर्स, फीस किती? वाचा

Driving Course : कार घ्यायचीय, पण चालवता येत नाही? मारुती सुझुकीनं आणलेत नवीन कोर्स, फीस किती? वाचा
मारुती सुझुकी

कार (Car) निर्माता कंपनी मारुती सुझुकी ड्रायव्हिंग कोर्स (Maruti Suzuki Driving Cource) ऑफर करत आहे. इथं प्रवेश घेऊन तुम्ही पूर्णपणे व्यावसायिक पद्धतीनं कार चालवायला शिकू शकता.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रदीप गरड

Jan 05, 2022 | 3:02 PM

मुंबई : तुम्हालाही कार (Car) घ्यायचीय? पण चालवता (Driving) येत नाही? जर तुम्हाला गाडी चालवता येत नसेल तर तुम्हाला आधी स्वत: चालवायला शिकावं लागेल. तुमची ही अडचण दूर होणार आहे. देशातली सर्वात मोठी कार (Car) निर्माता कंपनी मारुती सुझुकी ड्रायव्हिंग कोर्स (Maruti Suzuki Driving Cource) ऑफर करत आहे. इथं प्रवेश घेऊन तुम्ही पूर्णपणे व्यावसायिक पद्धतीनं कार चालवायला शिकू शकता. तुम्ही इथं रहदारीचे नियम नीट शिकू शकता. कंपनीनं यासाठी खास ड्रायव्हिंग स्कूल सुरू केलंय.

या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये चार प्रकारचे अभ्यासक्रम चालवले जातात. ज्यांना अजिबात गाडी चालवता येत नाही, तसेच ज्यांना गाडी चालवता येते पण एकट्यानं गाडी चालवण्याचा आत्मविश्वास नाही अशांसाठी मारुती सुझुकीनं ड्रायव्हिंग स्कूलची स्थापना केलीय.

मारुती सुझुकी ड्रायव्हिंग कोर्सबद्दल संपूर्ण माहिती – लर्नर स्टँडर्ड ट्रॅक कोर्स फी 5,500 रुपये – लर्नर एक्स्टेंडेड ट्रॅक कोर्ससाठीचं शुल्क 7,500 – लर्नर डिलेल्ड ट्रॅक कोर्स 9,000 – त्यानंतर तुम्हाला अॅडव्हान्स्ड अभ्यासक्रमासाठी 4000 रुपये द्यावे लागतील.

लर्नर एक्स्टेंडेड ट्रॅक कोर्स ज्यांनी अजून ड्रायव्हिंग केलेले नाही त्यांच्यासाठी हा कोर्स आहे. हा २६ दिवसांचा कोर्स आहे. मारुती सुझुकीच्या ड्रायव्हिंग स्कूलच्या अधिकृत वेबसाइटनुसार, दुसरा लर्नर तपशीलवार ट्रॅक कोर्स 31 दिवसांचा आहे. 20 प्रात्यक्षिक सत्रे, 5 सिम्युलेटर सत्रं आणि 4 थिअरी सत्रं असतील.

अॅडव्हान्स्ड कोर्स हा कोर्स अशा लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे पण एकट्यानं गाडी चालवण्याचा आत्मविश्वास नाही. हा कोर्स अशा लोकांसाठी आहे. या कोर्समध्ये एक प्रात्यक्षिक चाचणी, 6 प्रात्यक्षिक सत्रं आणि 2 थिअरी सत्रं असतील.

लर्नर स्टँडर्ड ट्रॅक कोर्स हा कोर्स त्यांच्यासाठी आहे ज्यांनी कधीही कार चालवली नाही. या कोर्समध्ये तुम्हाला ट्रॅफिकचे संपूर्ण नियम आणि ऑन-रोड ड्रायव्हिंगचा व्यावहारिक अनुभव मिळू शकतो. यामध्ये 10 प्रात्यक्षिक सत्रं असतील. याशिवाय 4 थिअरी आणि 5 सिम्युलेटर सेशन्स असतील. हा लर्नर स्टँडर्ड ट्रॅक कोर्स 21 दिवसांचा आहे.

लर्नर तपशीलवार ट्रॅक कोर्स 31 दिवसांत तुम्हाला वाहतुकीचे मूलभूत नियम जाणून घेता येतील आणि सिम्युलेटर आणि ऑन-रोड ड्रायव्हिंगचा व्यावहारिक अनुभवही मिळेल. याशिवाय, कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी तुम्ही RTO ड्रायव्हिंग परीक्षा देखील देऊ शकता.

SUV खरेदी करताय? 5 किफायतशीर कार पाहा, किंमत 5.49 लाख रुपयांपासून सुरु

Piaggio लवकरच 150cc इंजिनवाली स्कूटर लाँच करणार, जाणून घ्या फीचर्स

ढासू फीचर्स आणि शानदार लूकसह भारतातली पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाईक लाँचिंगसाठी सज्ज

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें