AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय बाजारात MG Motor चा धुमाकूळ, विक्रीत 215 टक्क्यांची वाढ

एमजी मोटर इंडियाने त्यांचा फेब्रुवारी 2021 चा सेल रिपोर्ट (विक्री अहवाल) जाहीर केला आहे. (MG Motor 215 percent sales growth)

भारतीय बाजारात MG Motor चा धुमाकूळ, विक्रीत 215 टक्क्यांची वाढ
MG-Motors
| Updated on: Mar 03, 2021 | 2:47 PM
Share

मुंबई : एमजी मोटर इंडियाने (MG Motor India) त्यांचा फेब्रुवारी 2021 चा सेल रिपोर्ट (विक्री अहवाल) जाहीर केला आहे. कंपनीने या महिन्यात एकूण 4,329 वाहनांची विक्री केली आहे. हा सेल फेब्रुवारी 2020 च्या तुलनेत 215 टक्के जास्त आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये, कंपनी भारतीय बाजारात केवळ एमजी हेक्टर (MG Hector) आणि एमजी झेडएस ईव्ही (MG ZS EV) सारख्या वाहनांची विक्री करीत होती. कंपनीने गेल्या वर्षभरात अजून काही वाहनं भारताता लाँच केली आहे. कंपनीला त्याचा फायदा झाल्याचे विक्री अहवालावरुन दिसून येत आहे. कंपनी आता भारतात Hector आणि ZS सह एमजी हेक्टर प्लस (MG Hector Plus) आणि एमजी ग्लॉस्टर (MG Gloster) या वाहनांचीदेखील विक्री करत आहे. (MG Motor India witness 215 percent growth in sales in India in February 2021)

आपण जर एमजीच्या या अगोदरच्या महिन्यातील विक्रीबाबतचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की, कंपनीच्या महिना दर महिना विक्रीत 20 टक्क्यांची वाढ होत आहे. कंपनीने गेल्या महिन्यात म्हणजेच जानेवारी 2021 मध्ये भारतीय बाजारात एकूण 3,602 वाहने विकली होती. फेब्रुवारी महिन्यात त्यात 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. याव्यतिरिक्त, जर आपण कंपनीच्या 2020 च्या विक्रीबद्दल चर्चा केली तर कंपनीने MG Gloster, MG Hector Plus आणि MG ZS EV च्या ऑर्डरसह संपूर्ण वर्षात 80000 पेक्षा जास्त वाहने विकली होती. यात लोकांनी एमजी हेक्टरला सर्वात जास्त पसंती दर्शवली. या व्यतिरिक्त कंपनीची एसयूव्ही एमजी ग्लॉस्टर देखील लोकांना चांगलीच आवडल्याचे दिसून येत आहे.

फेब्रुवारीत रेकॉर्डब्रेक विक्री

दरम्यान लॉकडाऊन संपल्यानंतर पर्सनल व्हीकल्सच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. 2021 मध्ये ह्युंदाय (Hyundai), मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आणि टाटा मोटर्सच्या (Tata Motors) वाहनांची जोरदार विक्री झाली आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये या तिन्ही कंपन्यांनी मोठा नफा कमावला आहे. टोयोटा (Toyota), महिंद्रा आणि महिंद्रा (Mahindra and Mahindra), होंडा (Honda) या कंपन्यांच्या विक्रीतही लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मारुती सुझुकीच्या विक्रीत 11.8 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

Maruti Suzuki च्या विक्रीत 11.8 टक्क्यांची वाढ

मारुती सुझुकी इंडियाने (Maruti Suzuki India) 2021 च्या फेब्रुवारी महिन्यातील वाहनांच्या विक्रीबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. या काळात कंपनीची एकूण 1,52,983 वाहनांची देशांतर्गत विक्री केली आहे. 2020 मध्ये याच महिन्यात विक्री झालेल्या 136,849 वाहनांच्या तुलनेत यामध्ये 11.8 टक्के वाढ झाली आहे. दुसरीकडे, मारुती सुझुकीची फेब्रुवारी 2021 मधील एकूण (देशांतर्गत विक्री आणि परदेशी निर्यात) विक्री 1,64,469 इतकी नोंदवण्यात आली आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीत कंपनीने एकूण 147,110 वाहनांची विक्री केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा यात 11.8 टक्क्यांची वाढ झाली आहे.

देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती सुझुकीने जानेवारी 2020 मध्ये 1 लाख 54 हजार 123 वाहनांची विक्री केली होती. त्यामध्ये यंदा 4.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मारुतीने यंदा जानेवारी महिन्यात 1 लाघ 60 हजार 752 वाहनांची विक्री केली आहे. मारुतीच्या प्रवासी व्हेईकल्सची विक्री 6.9 टक्क्यांनी घसरून 103,435 वाहनांवर आली आहे. कंपनीच्या देशांतर्गत विक्रीत 0.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर निर्यातीत 29.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

बजाज ऑटोच्या विक्रीत 6 टक्क्यांची वाढ

दुचाकी वाहन उत्पादक कंपनी बजाज ऑटोने सोमवारी सांगितले की फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या वाहनांची एकूण विक्री 6 टक्क्यांनी वाढून 3,75,017 वाहनांवर पोहोचली आहे. एक वर्षापूर्वी याच महिन्यात त्यांनी 3,54,913 वाहने विकली होती. फेब्रुवारी महिन्यात कंपनीची देशांतर्गत बाजारात होणारी विक्री 2 टक्क्यांनी घसरून 1,64,811 वाहनांवर गेली, गेल्या वर्षी कंपनीने याच महिन्यात 1,68,747 वाहनांची विक्री केली होती.

कंपनीने म्हटले आहे की, फेब्रुवारीत त्याचा निर्यात व्यवसाय 13 टक्क्यांनी वाढून 2,10,206 वाहनांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांनी 1,86,166 वाहने निर्यात केली होती. बजाज ऑटो कंपनीची दुचाकींची विक्री फेब्रुवारीमध्ये 7 टक्क्यांनी वाढून 3,32,563 वाहनांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये कंपनीने 3,10,222 दुचाकींची विक्री केली होती. कंपनीच्या व्यावसायिक वाहनांची एकूण विक्री 5 टक्क्यांनी घसरून 42,454 वाहनांवर गेली आहे, त्या तुलनेत एक वर्षापूर्वी फेब्रुवारी महिन्यात कंपनीने 44,691 व्यावसायिक वाहनांची विक्री केली होती.

अशोक लेलँडच्या विक्रीत 19 टक्क्यांनी वाढ

हिंदुजा समूहाची अग्रणी कंपनी अशोक लेलँडकडून सोमवारी सांगण्यात आले आहे की, की फेब्रुवारी महिन्यात त्यांची विक्री 19 टक्क्यांनी वाढून 13,703 वाहनांवर गेली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार एका वर्षापूर्वी याच महिन्यात त्यांनी 11,475 वाहनांची विक्री केली होती. या कालावधीत कंपनीची एकूण देशांतर्गत विक्री 12,776 वाहनांची होती, जी मागील वर्षी 10,612 वाहने इतकी होती. यात एकूण 20 टक्के वृद्धी पाहावयास मिळाली आहे.

कंपनीने म्हटले आहे की मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहनांची विक्री देशांतर्गत बाजारात 5 टक्क्यांनी वाढून 7,114 वाहनांवर गेली आहे, तर मागील वर्षी ती 6,745 वाहने इतकी होती. फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात हलक्या व्यावसायिक वाहनांची विक्री 5,662 वाहने इतकी नोंदवण्यात आली आहे, तर फेब्रुवारी 2020 मध्ये ती 3,867 वाहने इतकी होती. यात 46 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

ह्युंदायच्या विक्रीत वाढ

ह्युंदाय मोटर इंडियाने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी महिन्यात निर्यातीसह त्यांच्या एकूण विक्रीत 26.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये विक्री झालेल्या 48,910 युनिट्सच्या तुलनेत कंपनीने फेब्रुवारी 2021 मध्ये एकूण विक्री 61,800 वाहनांची विक्री केली आहे. त्याचप्रमाणे कंपनीच्या देशांतर्गत विक्रीतही या महिन्यात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात विक्री झालेल्या 40,010 युनिट्समध्ये यंदा 29 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. कंपनीने यंदा 51,600 वाहनांची देशांतर्गत बाजारात विक्री केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात कंपनीनी निर्यात 14.6 टक्क्यांनी वाढली आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये कंपनीने 8,900 युनिट्स वाहनांची निर्यात केली होती. तर यंदा कंपनीने 10,200 युनिट्स वाहनांची निर्यात केली आहे.

संबंधित बातम्या

वाहन उत्पादक कंपन्यांचे ‘अच्छे दिन’ सुरु? फेब्रुवारीत रेकॉर्डब्रेक विक्री

Toyota Sales Report | टोयोटा किर्लोस्करचा धडाका, वाहनांच्या विक्रीत 36 टक्क्यांची वाढ

Maruti, Hyundai, Bajaj Auto ची फेब्रुवारीत रेकॉर्डब्रेक विक्री, वाहन कंपन्यांचा Sales Report जारी

(MG Motor India witness 215 percent growth in sales in India in February 2021)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.