बहुप्रतीक्षित Skoda Kushaq भारतात लाँच, दमदार फीचर्ससह SUV बाजारात, किंमत…

स्कोडाने (Skoda) आपली नवीन कार Kushaq भारतीय बाजारात लाँच केली आहे. भारतात या वाहनाची सुरूवातीची किंमत 10.50 लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.

बहुप्रतीक्षित Skoda Kushaq भारतात लाँच, दमदार फीचर्ससह SUV बाजारात, किंमत...
Skoda Kushaq
Follow us
| Updated on: Jun 28, 2021 | 6:22 PM

मुंबई : स्कोडाने (Skoda) आपली नवीन कार Kushaq भारतीय बाजारात लाँच केली आहे. भारतात या वाहनाची सुरूवातीची किंमत 10.50 लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे, ज्यामध्ये तुम्हाला बेस व्हेरिएंट मिळेल. दुसरीकडे, तुम्हाला टॉप मॉडेलसाठी 17.60 लाख रुपये मोजावे लागतील. या नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्हीची थेट येथे ह्युंदाय क्रेटा, किआ सेल्टॉस आणि रेनॉ डस्टर या गाड्यांशी स्पर्धा असेल. स्कोडा कुशक ही MQB-A0-IN प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलेली पहिली कार आहे. (Most awaited Skoda Kushaq launched in India at 10.49 lakh price, know features)

Skoda Kushaq खूपच स्लीक आणि दमदार कार आहे. कारचा लुकदेखील अट्रॅक्टिव्ह आहे. 2020 च्या ऑटो एक्स्पोमध्ये सादर करण्यात आलेल्या आणि आत्ता लाँच झालेल्या कुशक या कारमध्ये फारसा फरक नाही. LED हेडलॅम्प्स एसयूव्हीमध्ये देण्यात आले आहेत, जे एलईडी डेटाइम रनिंग लॅम्प्ससह येतात. त्याच वेळी, यात एक वेगळा Trapezoidal एलईडी फॉग्लॅम्प देण्यात आला आहे. एसयूव्ही येथे एलईडी टेललॅम्प्सदेखील आहेत. स्कोडाने ही कार हनी ऑरेंज आणि Tornado रेड या दोन रंगांमध्ये सादर केली आहे.

दमदार इंजिन

अंडर द हुड Skoda Kushaq SUV दोन पेट्रोल इंजिन पर्यायांसह सादर करण्यात आली आहे. यामध्ये 1.0 लीटर तीन सिलेंडर TSI आणि 1.5 लीटर चार सिलेंडर TSI इंजिन पर्याय आहेत. यामध्ये तुम्हाला 113bhp पॉवर आणि 175 Nm टॉर्क मिळेल. दुसरं इंजिन 148 bhp आणि 250Nm पीक टॉर्कसह येतं. ट्रान्समिसन ऑप्शनबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 6 स्पीड मॅनुअल गियरबॉक्स देण्यात आला आहे. जो 6 स्पीड ऑटोमेटिक ट्रान्समिशनसह येतो. यामधील 1.0 लीटर TSI, 1.5 लीटर TSI इंजिन 7 स्पीड DSG गियरबॉक्ससह येईल.

कसं असेल इंटीरियर?

कारच्या मध्यभागी इन्फोटेनमेंट डिस्प्ले आणि 2021 स्कोडा सुपर्बमध्ये दिसणारे स्टायलिश 2-स्पोक स्टीयरिंग व्हीलचा समावेश करण्यात आला आहे. या कारच्या केबिनचे मुख्य आकर्षण 10 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट स्क्रीन असेल, जी Apple कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो सारख्या फीचर्ससह मिळेल. कुशक एका मोठ्या डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि मोठ्या एअर-कॉन व्हेंट्ससह, प्रशस्त केबिनसह सादर करण्यात आली आहे.

भारतीय बनावटीची कार

ही कार 93 टक्के भारतीय बनावटीची आहे. कारण या कारमधील 93 टक्के भाग हे भारतात बनवण्यात आले आहेत, अगदीच काही भाग परदेशातून आयात करण्यात आले आहेत. कंपनीने या व्हीकलच्या इंजिन ऑप्शन्स आणि डायमेंशनसह कम्फर्टवर बरंच काम केलं आहे. स्कोडा कुशक MQB-IN प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. यामध्ये 2651 मिमीचं व्हीलबेस असेल जे स्कोडा कॉन्सेप्टच्या व्हीलबेसच्या तुलनेत 20 मिमी लहान आहे. कुशकच्या टॉप-एंड ट्रिम्समध्ये एलईडी हेडलाइट्स आणि डे टाईम रनिंग लाइट्सची (डीआरएलएस) सुविधा असेल. टेल आणि ब्रेक लाइट्सही देण्यात आल्या आहेत.

शानदार फिचर्स

ही भारतातील स्कोडाची पहिली कनेक्टेड कार आहे ज्यामध्ये MySkoda Connect टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. तसेच यामध्ये लेटेस्ट इन्फोटेन्मेंट सिस्टिमसह 12.3 इंचांची सेंट्रल टच स्क्रीन दिली आहे. यामध्ये ऑटोमॅटिक एयर कंट्रोल सिस्टिम, सनरुफ आणि अडॅप्टिव्ह लाईटसारखे फिचर्स दिले आहेत. कारच्या सुरक्षेबाबत बोलायचे झाल्यास, या कारमध्ये 6 एयरबॅग्स (ऑप्शनल फ्रंट साईड एयरबॅग आणि कर्टेन एयरबॅग) देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व ट्रिम्समध्ये स्टँडर्ड इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ईएससी) दिलं आहे. तर टॉप-वेरिएंटमध्ये हिल-होल्ड कंट्रोल, रेन-लाईट सेन्सर, एक क्रुझ कंट्रोल सिस्टिम आणि टायर प्रेशर मॉनिटरही दिले आहेत.

कुशक नावामागची कथा

स्कोडा कंपनीने कुशक या कारबाबत माहिती दिली आहे की, संस्कृत भाषा जगभरातील प्राचीन भाषांपैकी एक आहे. ही आता भारतातील 22 अधिकृत भाषांपैकी एक आहे. या नावाद्वारे कंपनी स्वतःला भारतीय उपमहाद्वीपाशी जोडू पाहतेय. तसेच ‘कुशक’ नावाचा अर्थ कंपनीच्या या मॉडलसाठी परफेक्ट आहे, असंही कंपनीने म्हटलं आहे. ‘स्कोडा कुशक’ या नावाची घोषणा करताना कंपनीने ‘Make way for the one true king’ ही टॅगलाइनही दिली आहे.

इंडिया 2.0 प्रोजेक्ट

चेक प्रजासत्ताक (Czech Republic) देशातील आघाडीची कार निर्माती कंपनी स्कोडाने भारतातील त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी इंडिया 2.0 प्रकल्पाची सुरुवात केली आहे. ‘कुशक’ ही स्कोडाची या प्रकल्पांतर्गत पहिली कार आहे. कंपनीने ही कार स्थानिक स्तरावरील Modulare Querbaukasten (MQB) A0 IN प्लॅटफॉर्मवर बनवली आहे.

हेही वाचा

अपडेटेड डिझाईन, जबरदस्त फीचर्ससह रेनॉ अधिकृत Dacia ची 2022 Duster बाजारात

5 नव्या फीचर्ससह Maruti Suzuki Baleno लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या कशी असेल नवी कार

लांचिंगआधीच Hyundai च्या ‘या’ SUV साठी 4000 हून अधिक बुकिंग्स, डिझेल व्हेरिएंटला पसंती

(Most awaited Skoda Kushaq launched in India at 10.49 lakh price, know features)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.