काय बोलता! 22 वी Rolls Royce विकत घेणारे हे आहे तरी कोण?
भारतातील एका बड्या उद्योगपतीने देशातील सर्वात महागडी कार Rolls-Royce Phantom VIII EWB खरेदी केली आहे, त्याची किंमत २२ कोटी रुपये आहे आणि व्यावसायिकांच्या कार कलेक्शनमधील ही २२ वी रोल्स रॉयस आहे. या कारच्या मालकाने मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यासारख्या बड्या दिग्गज नावांनाही मागे टाकले आहे. जाणून घ्या ही कार कोणी खरेदी केली आणि त्यात काय आहेत फीचर्स.

जगातील सर्वात महागड्या कारबद्दल बोलायचे झाले तर रोल्स रॉयसचे नाव प्रत्येकाच्या तोंडातून येते. रोल्स रॉयस ही भारतातील सर्वात महागडी कार आहे. नुकतीच एका बड्या व्यावसायिकाने देशातील सर्वात महागडी कार ‘Rolls-Royce Phantom VIII Extended Wheelbase (EWB)’ खरेदी केली आहे. या कारची किंमत 22 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे मुकेश अंबानी किंवा गौतम अदानी नव्हे तर प्रसिद्ध उद्योगपती योहान पूनावाला या महागड्या कारचे मालक बनले आहेत.
अंबानी आणि अदानी यांच्याही पुढे योहान पूनावाला
मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यासारखे भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती लक्झरी कारचे शौकीन असताना योहान पूनावाला यांचे कार कलेक्शन आणखी खास आणि मोठे होत आहे. अंबानी आणि अदानी यांच्याकडेही रोल्स रॉयससारख्या महागड्या कार आहेत, पण पूनावाला यांनी यावेळी त्यांची २२ वी रोल्स रॉयस खरेदी केली आहे आणि यामुळे ते भारतातील सर्वात महागड्या कारचे मालक बनले आहेत.
22 वी रोल्स रॉयस, स्टायलिश
योहान पूनावाला यांच्या गॅरेजमध्ये आता २२ रोल्स रॉयस गाड्या उभ्या आहेत, पण ही Phantom VIII EWB त्याहूनही खास आहे. शानदार बोहेमियन रेड कलरमध्ये त्यांनी ही कार तयार केली आहे. या कारच्या इंटिरिअरमध्ये ड्युअल टोन फिनिशचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे ही कार आणखी स्टायलिश दिसत आहे. 22 इंचाची ब्रश सिल्व्हर व्हील्स आणि स्टारलाइट हेडलाइट्स यामुळे कारला खास रॉयल लुक मिळतो.
विशेष ‘प्रायव्हसी सूट’ फीचर
या रोल्स रॉयस फँटममध्ये खास प्रायव्हसी सूट देखील देण्यात आली आहे. ड्रायव्हर आणि मागच्या प्रवाशांमध्ये काचेची भिंत असते, ज्यामुळे प्रायव्हसी राखली जाते. हे प्रायव्हसी फीचर रोल्स रॉयसने नुकतेच बंद केले होते, पण योहान पूनावाला यांनी त्यांच्या कारमध्ये हे फीचर खास समाविष्ट केले आहे, ज्यामुळे ते आणखी अनोखे बनले आहे.
खास फीचर्स
ही रोल्स रॉयस स्टँडर्ड व्हीलबेस व्हर्जनपेक्षा २२० मिमी लांब आहे. त्यामुळेच फँटम हि कार उंच-मोठी असण्याबरोबरच खूपच दमदार दिसते. यात इलेक्ट्रिकली ऑपरेबल दरवाजे आहेत, जे सहज उघडता आणि बंद केले जाऊ शकतात. या दरवाजांबरोबरच डोर स्विच पॅनेलवर मसाज फंक्शन्सही देण्यात आले आहेत, ज्यामुळे प्रवास अधिक आरामदायी होतो.
पावरफुल इंजिन आणि परफॉर्मेस
Phantom VIII EWB मध्ये ६.७५ लीटर ट्विन-टर्बो व्ही १२ इंजिन आहे जे ५६३ बीएचपी पॉवर आणि ९०० एनएम टॉर्क जनरेट करते. ही कार ५.१ सेकंदात ० ते १०० किलोमीटर प्रतितास वेग पकडू शकते. या कारची टॉप स्पीड २५० किलोमीटर प्रति तास आहे.
