बाबारे… ! सुरक्षा आहे की काय .. मुकेश अंबानींच्या ताफ्यात सुरक्षेसाठी आहेत 15 कार्स, एकेकाची किंमत ऐकाल तर…
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना झेड प्लस सिक्युरिटी देण्यात आली असून त्यांच्या ताफ्यात 15 गाड्या आहेत.

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani)हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. त्यांची संपत्ती 8,400 कोटी डॉलर्सहून अधिक असल्याचे सांगितले जाते. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये नुकतेच नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर उघडणारे मुकेश अंबानी (NMACC) त्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतात. त्यांना झेड प्लस सिक्युरिटी ( security) देण्यात आली असून एकाहून एक सरस अशी लक्झरी आणि बुलेटप्रूफ वाहने आहेत. जेव्हा जेव्हा मुकेश अंबानी किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणतेही सदस्य बाहेर पडतात, तेव्हा त्यांचा ताफा मुंबईच्या रस्त्यावर दिसतो. त्यातील वाहने पाहून लोक आश्चर्यचकित होतात.
अंबानींच्या ताफ्यातील प्रमुख कार
अंबानी कुटुंबाच्या सुरक्षा ताफ्यात 5 रेंज रोव्हर व्होग एसयूव्ही, 2 रेंज रोव्हर डिस्कव्हरी एसयूव्ही, एक मर्सिडीज-बेंझ एस-क्लास, एक मर्सिडीज-बेंझ एएमजी जी63 एसयूव्ही, 3 एमजी ग्लोस्टर एसयूव्ही, एक महिंद्रा एसयूव्ही, एक मर्सिडीझ-बी-बीचा समावेश आहे. क्लास प्रीमियम एमपीव्ही आणि टोयोटा फॉर्च्युनर एसयूव्ही दिसते. गेल्या वर्षी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये अंबानींच्या ताफ्याची झलक दिसली होती. मुकेश अंबानींकडे बुलेटप्रूफ BMW 760Li देखील आहे, जी त्यांच्या सुरक्षेसाठी वापरली जाते. या चिलखती वाहनाची किंमत सुमारे 8.50 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
अनेक लग्झरी कारचे आहेत मालक
मुंबईत मुकेश अंबानींच्या अँटिलिया या घराच्या 27व्या मजल्यावर एक मोठे गॅरेज आहे आणि अंबानी कुटुंबाकडे 160 पेक्षा जास्त आलिशान गाड्या असल्याचे सांगितले जाते. अंबानी कुटुंबाकडे दोन रोल्स रॉयस कार तसेच मर्सिडीज मेबॅच बेंझ एस660 गार्ड, मर्सिडीज मेबॅक 62, लॅम्बोर्गिनी उरुस, बीएमडब्ल्यू 760Li, अॅस्टन मार्टिन रॅपाइड, बेंटले बेंटेगा, बेंटले कॉन्टिनेंटल फ्लाइंग स्पर, कॅडिलॅक रॉईस, लॅंड रॉईस, लॅंड रॉईस, या कार आहेत. तसेच ऑडी आणि लेक्सससह इतर कंपन्यांच्या अनेक महागड्या आणि आलिशान गाड्या आहेत.
मुकेश अंबानी यांची लाइस्टाइल कशी आहे ?
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेतच पण जगभरातील श्रीमंतांच्या यादीतही त्यांचा वरचा क्रमांक लागतो. प्रचंड संपत्तीचे धनी असलेले मुकेश अंबानी हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अत्यंत साधे आहेत. तसेच धार्मिक प्रवृत्तीचे आहेत. पूजाअर्चा करतानाचे त्यांचे फोटो वरचे वर व्हायरल होत असतात. मुकेश अंबानी यांचे कधी कार्पोरेट जगतातील फोटो व्हायरल होतात, तर कधी कौटुंबीक सोहळ्यातील तर कधी मंदिरात पूजाअर्चा करतानाचे. त्यामुळे अंबानी यांचा लोकसंपर्कही दिसून येतो.
मुकेश अंबानी यांची लाइफस्टाईल अत्यंत साधी आहे. मात्र, स्वयंशिस्तीवर त्यांचा अधिक भर असतो. सकाळी 5.30 वाजता ते उठतात. हलका नाश्ता घेतात. नाश्त्यात ताजे फळ आणि पपयाचा ज्यूस घेतात. त्यानंतर ते मेडिटेशन करतात. मुकेश अंबानी अत्यंत साधं आणि सात्विक अन्न घेतात. दिवसभर ते हलका आहार घेतात. शिवाय थोडे थोडे खातात. त्यांच्या जेवणात सूप, सॅलड, घरी बनवलेली डाळ, चपाती आणि गुजराती पदार्थ असतात. सकाळी योगा आणि द्नायधारणा केल्यानंतर मुकेश अंबानी रात्रीही आपल्या आरोग्याची काळजी घेतात. रात्री जेवणानंतर ते नियमितपणे फिरायला जातात. त्यामुळे 66 व्या वर्षातही त्यांनी स्वत:ला फिट ठेवलं आहे.
