#BoycottHyundai होतोय ट्रेन्ड! ह्युंदाईनं काश्मीरबाबत नेमकं असं काय म्हटलं, की लोकं भडकली?

#BoycottHyundai हा वाद नेमका काय आहे? भारतात ह्युंदाईची विक्री ही पाकिस्तानमधील विक्रीच्या तुलनेच तीनपट जास्त आहे. असं असताना अनेक भारतीयांच्या भावना ह्युंदाईने दुखावल्या असल्याचं ट्वीट अनेकांनी केलंय.

#BoycottHyundai होतोय ट्रेन्ड! ह्युंदाईनं काश्मीरबाबत नेमकं असं काय म्हटलं, की लोकं भडकली?
वादग्रस्त ट्वीटमुळे युजर्स भडकले!
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 5:19 PM

नवी दिल्ली : ह्युंदाई या कार (Automobile Company Hyndai) तयार करणाऱ्या कंपनीविरोधात ट्विटरवर प्रचंड रोष पाहायला मिळतोय. बॉयकॉट ह्युंदाई असा ट्रेड ट्विटरवर सुरु आहे. अनेक भारतीयांसह दिग्गज व्यावसायिकांनीही या ट्रेन्डला समर्थन दिलंय. ह्युदाई पाकिस्तानकडून टाकण्यात आलेल्या काश्मिराबाबतच्या (Post on Kashmir) एका ट्वीटमुळे हा सगळा वाद सुरु झाला होता. याप्रकरणी ह्युदाई कंपनीनं आपलं स्पष्टीकरणं देणारं एक पत्रकही जारी केलं होतं. मात्र तरिही हा वाद काही थांबायचं नाव घेत नाही आहे. काश्मिरातील बंधूभगिनींचं बलिदान आठवून त्यांनी स्वतंत्र काश्मीरसाठी दिलेल्या लढ्याला समर्थन देत असल्याचं ह्युंदाई पाकिस्तानच्या (Hyndai Pakistan) एका ट्विटमध्ये म्हणण्यात आलं होतं. सोबत त्यांनी #HyndaiPakistan आणि #KashmirSolidarityDay असे हॅशटॅगही वापरलेत. या सगळ्या वादात आता मनसेनंही उडी घेतली आहे. मनसेच्या संदीप देशपांडे आणि गजानन काळेंनीही याप्रकरणी ह्युंदाईवर निशाणा साधलाय.

ह्युंदाईनं आपल्या ट्वीटमध्ये काय म्हटलं होतं?

Hyndai Twitter Post

याच पोस्टमुळे वादाला सुरुवात

भारतात ह्युंदाईची विक्री ही पाकिस्तानमधील विक्रीच्या तुलनेच तीनपट जास्त आहे. असं असताना अनेक भारतीयांच्या भावना ह्युंदाईने दुखावल्या असल्याचं ट्वीट अनेकांनी केलंय. ह्युंदाईच्या असंवेदनशीलतेवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, या संपूर्ण वादाची दखल घेत अखेर ह्युंदाईन इंडियाने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरुन एक अधिकृत पत्रक जारी केलंय. या पत्रकार त्यांनी गेल्या 25 वर्षांपासून भारतासोबत असलेल्या नात्याचा उल्लेख ह्युंदाईनं केलाय. भारतीयांच्या भावना दुखावल्या जात असतील, तर त्याबाबतची कोणतीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान, ह्युंदाई पाकिस्तानकडून आता हे ट्विट डिलीट करण्यात आलंय. पण त्यानंतरही याबाबतचा रोष भारतीय ट्विटर युजर्समध्ये कायम असल्याचं पाहायला मिळतंय.

पाहा मनसे नेते संदीप देशपांडे यांचं ट्वीट

ह्युंदाईनं दिलेल्या स्पष्टीकरणावरही अनेकजण भडकले आहेत. काहींनी ह्युंदाईन केलेलं पाऊल हे राष्ट्रविरोधी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकंच काय तर स्पष्टीकरण देताना त्यांनी माफी मागितली नसल्यानं अनेकांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. भारताला सेकंड होम म्हणणारं ह्युंदाई, भारतालाच नुकसान पोहोचवण्याचा अजेंडा राबवत असल्याचा दावा करत अनेकांनी संताप व्यक्त केलाय.

ह्युंदाईनं दिलेलं स्पष्टीकरण काय आहे?

संबंधित बातम्या :

Fact Check : मेटा भारतात Facebook आणि Instagram बंद करणार?

सावधान! चुकूनसुद्धा डाउनलोड करू नका अशाप्रकारचे ॲप्स, अन्यथा लागेल लाखो रुपयांचा चुणा !

सोशल मीडियावर Reels हिरोंचा डंका, मनोरंजनासोबत पैसे कमावण्याचा काय आहे फंडा? जाणून घ्या!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.