दरमहा 3,555 रुपये भरा आणि TATA ची ‘ही’ लोकप्रिय कार घरी न्या, जाणून घ्या संपूर्ण ऑफर

अक्षय चोरगे

|

Updated on: Apr 22, 2021 | 3:59 PM

टाटा मोटर्स कंपनीची टाटा टियागो ही कार 2016 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. लाँचिंगपासूनच या कारला भारतीय मार्केटमध्ये लोकप्रियता मिळाली आहे.

दरमहा 3,555 रुपये भरा आणि TATA ची 'ही' लोकप्रिय कार घरी न्या, जाणून घ्या संपूर्ण ऑफर
Tata Tiago

मुंबई : तुम्ही जर स्वत: साठी एक उत्तम कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. टाटा मोटर्स कंपनी (Tata Motors) आपली लोकप्रिय हॅचबॅक कार टाटा टियागोवर (TATA Tiago) उत्तम ऑफर देत आहे, ज्यामध्ये आपण सहजपणे फायनॅन्स करुन ही कार घरी घेऊन जाऊ शकता आणि उर्वरित किंमत दरमहा लहान हप्त्यांमध्ये देऊ शकता. (Pay EMI of Rs 3555 every month and bring TATA Taigo to your home)

टाटा मोटर्स कंपनीची टाटा टियागो (TATA Tiago) ही कार 2016 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. लाँचिंगपासूनच या कारला भारतीय मार्केटमध्ये लोकप्रियता मिळाली आहे. दरम्यान, भारतीयांच्या पसंतीस उतरलेल्या टियागोला ग्लोबल NCap सुरक्षा टेस्टमध्ये चार स्टार रेटिंग मिळलं आहे. त्यामुळे सुरक्षेच्या बाबतीत टाटा टियागो पास झाली आहे, असं म्हणता येईल. या कारमध्ये सेफ्टीसाठी अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन, कॉर्नर स्टेबिलिटी कंट्रोल, डुअल फ्रंट एयरबॅग्स, रियर पार्किंग सेंसर आणि स्पीड अलर्ट सिस्टिमसारखी कमालीचे फीचर्स देण्यात आले आहेत.

TATA Tiago वरील ऑफर

TATA Tiago या कारची किंमत 4.85 लाख रुपये ते 6.84 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम, दिल्ली) दरम्यान आहे. cars.tatamotors.com या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार फायनॅन्स केल्यास ही कार ग्राहक केवळ 3555 रुपयांच्या मंथली (दरमहा) ईएमआयवर घरी घेऊन जाऊ शकता. याबातची अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही टाटा मोटर्सच्या कोणत्याही डीलरशिप्सकडे जाऊन चौकशी करु शकता.

TATA Tiago चं लिमिटेड एडिशन सादर

टाटा कंपनीने फेब्रुवारी महिन्यात TATA Tiago चं लिमिटेड एडिशन आणि AMT व्हेरिएंट मार्केटमध्ये सादर केलं आहे. टाटा मोटर्सने (Tata Motors) टियागो लिमिटेड एडिशन (Tiago Limited Edition) कार गेल्या महिन्यात 5.79 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) या प्राईस टॅगसह सादर केली होती. ही हॅचबॅक कार आता टाटाच्या डीलरशिप्सकडे दिसू लागली आहे. हे लिमिटेड एडिशन मॉडल डेटोना ग्रे रंगात पाहायला मिळू शकतं. याशिवाय गाडी दोन रंगांमध्ये सादर केली जाऊ शकते. ज्यामध्ये फ्लेम रेड आणि पर्लसेंट व्हाईट या रंगांचा समावेश आहे.

लिमिटेड एडिशन टियॅगोमध्ये 14 इंचांचे एलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. रेग्युलर ट्रिमशिवाय Tiago लिमिटेड एडिशनमध्ये रियर पार्सल ट्रे आणि वॉईस कमांड सिस्टिमसह पाच इंचांची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम देण्यात आली आहे. अडंर द हुड गाडीत 1.2 लीटरचं रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. जे 85 bhp पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करतं. याची मोटर 5 स्पीड मॅनुअल युनिटद्वारे जबरदस्त पॉवर देते.

इतर बातम्या

बंपर ऑफर : Renault KWID ते Tata Nexon, या 8 गाड्यांवर 85,800 रुपयांपर्यंतची सूट

देशातील 5 सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक हॅचबॅक कार्स, 23KMPL मायलेज, जाणून घ्या किंमती आणि फीचर्स

(Pay EMI of Rs 3555 every month and bring TATA Taigo to your home)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI