Bajaj : बजाज पल्सर 250 ची रेकॉर्डब्रेक कामगिरी… सहा महिन्यांत 10000 गाड्यांची विक्री

ही बाईक देशातील सर्वात जलद विक्री होणारी 250 सीसी मोटरसायकल बनली आहे. सहा महिन्यात 10 हजार गाड्या विक्रीचा विक्रमी पल्ला कंपनीने गाठला आहे. पल्सर 250 बाजारात दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आली आहे.

Bajaj : बजाज पल्सर 250 ची रेकॉर्डब्रेक कामगिरी... सहा महिन्यांत 10000 गाड्यांची विक्री
बजाज पल्सर 250Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 04, 2022 | 10:38 PM

Bajaj : बजाज  (Bajaj)ऑटोच्या नवीन पल्सर 250 ने रेकॉर्डब्रेक कामगिरी करीत लाँच झाल्याच्या काही महिन्यांमध्येच 10,000 युनिट्स विक्रीचा टप्पा गाठला आहे. बजाज ऑटोने (Bajaj Auto) गेल्या ऑक्टोबर 2021 मध्ये देशात नवीन पल्सर 250 श्रेणीची बाइक लाँच केली होती. कंपनीच्या दाव्यानुसार, ही बाईक देशातील सर्वात जलद विक्री होणारी 250 सीसी मोटरसायकल बनली आहे. केवळ सहा महिन्यात 10 हजार गाड्या विक्रीचा विक्रमी पल्ला कंपनीने गाठला आहे. पल्सर 250 बाजारात दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आली आहे. त्यात, पल्सर एन 250 (Pulsar N250) आणि पल्सर एफ 250 (Pulsar F250) यांचा समावेश आहे. दोन्ही पल्सर 250 बाईकना समान ऑइल कूल्ड 249.07 सीसी इंजिन मिळते जे जास्तीत जास्त 24.5 पीएस पॉवर आणि 21.5 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत पाच स्पीड गिअरबॉक्स उपलब्ध आहेत.

लाँचच्या वेळी, दोन्ही बाइक्स रेसिंग रेड आणि टेक्नो ग्रे या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये ऑफर केल्या होत्या. आता कंपनीने बाइक्सचा कलर पॅलेट वाढवण्यासाठी नवीन ग्लॉसी ब्लू पेंट स्कीम देखील समाविष्ट केली आहे. रंगा व्यतिरिक्त पल्सर 250 मध्ये इतर कोणतेही बदल केले गेले नाहीत. पल्सर 250 च्या वैशिष्ट्यांबाबत बोलायचे झाल्यास यात एलईडी लाइटिंग, असिस्ट आणि स्लिपर क्लच, गियर इंडिकेटर, युएसबी मोबाइल चार्जिंग पोर्ट यांसारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे.

काय आहे किंमत?

पल्सर एन 250 ची सुरुवातीची किंमत 1.38 लाख रुपये आणि पल्सर एफ 250 ची किंमत 1.40 लाख रुपये ठेवण्यात आली होती. दोन्ही किंमती एक्सशोरूम आहेत. दरवाढीनंतर, त्याच्या नवीन किमती अनुक्रमे 1.44 लाख रुपये आणि 1.45 लाख रुपये करण्यात आल्या आहेत. दरम्यान, Suzuki Gixxer 250 twins, KTM 250 Duke आणि Yamaha FZ25 यांसारख्या इतर 250 सीसी दुचाकींशी पल्सरची स्पर्धा होत आहे.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, बजाज ऑटो यूके आधारित बाइक निर्माता ट्रायम्फ मोटरसायकल्ससोबत नवीन प्रीमियम उत्पादने विकसित करत आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.