Electric Two Wheeler : काय बोलता! 30 दिवसांत तब्बल 3779 इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री, जाणून घ्या

मार्च 2022 मध्ये एथर एनर्जीने 2,591 युनिट्स विकल्या. एथर एनर्जीची भारतीय बाजारपेठेतील सर्वात नवीन इलेक्ट्रिक दुचाकी Ather 450X आहे.

Electric Two Wheeler : काय बोलता! 30 दिवसांत तब्बल 3779 इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री, जाणून घ्या
Ather EnergyImage Credit source: social
Follow us
| Updated on: May 04, 2022 | 10:26 AM

मुंबई : अलीकडेच इलेक्ट्रिक (Electric) दुचाकीची (Two Wheeler) विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच इलेक्ट्रिक कार देखील विक्रीसाठी आल्या आहेत. त्यामुळे आता इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ वाढत असल्याचं दिसतंय. एथर एनर्जीने (Ather Energy) एप्रिल महिन्याचा विक्री रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. कंपनीने गेल्या महिन्यात 3,779 इलेक्ट्रिक दुचाकी विकल्या आहेत. हा आकडा गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यापेक्षा 255 टक्के जास्त आहे. कंपनीचे म्हणणे आहे की आतापर्यंतच्या कोणत्याही महिन्यातील ही सर्वाधिक विक्री आहे. मार्च 2022 च्या तुलनेत कंपनीच्या विक्रीत 45 टक्के वाढ झाली आहे. मार्च 2022 मध्ये एथर एनर्जीने 2,591 युनिट्स विकल्या. एथर एनर्जीची भारतीय बाजारपेठेतील सर्वात नवीन इलेक्ट्रिक दुचाकी Ather 450X आहे . ज्याचे वजन 108 किलो आहे. ही त्याच्या सेगमेंटमधील सर्वात हलकी इलेक्ट्रिक स्कूटर आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर 26 Nm टॉर्क जनरेट करते. तुम्ही हे अशा प्रकारे समजू शकता की तुम्हाला Apache 200 4V आणि Bajaj Dominar 250 मध्येही इतका टॉर्क मिळत नाही.

चार राइडिंग मोड

Ather 450X मध्ये चार राइडिंग मोड उपलब्ध आहेत. भिन्न मोड भिन्न श्रेणी आणि गती देतात. त्याचा बेसिक मोड ECO 85 किमीची रेंज देतो. त्याच वेळी राइडमध्ये 70 किमी, स्पोर्ट्समध्ये 60 ते 65 किमी आणि वार्प मोडमध्ये 45 किमीची रेंज उपलब्ध आहे. जेव्हा ही दुचाकीची क्विलिटी बघितली गेली किंवा त्याची टेस्ट घेण्यात आली. त्यावेळी Ather 450X चालवताना त्यात 90kmph ची स्पीड दिसून आली. त्याचा टॉप स्पीड त्याच्या वार्प मोडवर आहे. या मोडमध्ये Ather 450X फक्त 3.3 सेकंदात 40 किमी प्रतितास वेग वाढवते. त्यामुळे हे एक या इलेक्ट्रिक दुचाकीचं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल.

किती चार्जींग होते?

Ather 450X होम चार्जिंगद्वारे 3 तास 35 मिनिटांत 0-80 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते. त्याचवेळी पूर्ण चार्ज करण्यासाठी 5 तास 45 मिनिटे लागतात. पण जर तुम्ही ती फास्ट चार्जिंगद्वारे चार्ज केली तर ही इलेक्ट्रिक स्कूटर 1 मिनिटाच्या चार्जिंगवर 1.5 किमीची रेंज देते. म्हणजेच Ather 450X तुम्हाला फास्ट चार्जरद्वारे 10 मिनिटांच्या चार्जवर 15 किलोमीटरची रेंज देईल.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.